मुखपृष्ठ
Dilkhulas

माझे शेल्फ

Dilkhulas

इंग्रजी शीर्षक
Dilkhulas
सारांश

चंदेरी दुनियेतले हे चमचमणारे तारे... कोणी एका रात्रीत 'स्टार' होतो, तर कोणाला वर्षानुवर्षं झगडूनही यश हुलकावणी देत राहतं. रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनयाचा 'शहेनशाह' इथे जन्माला येतो, तर 'किंग खान' बनून कोणी तरुण-तरुणींना भुरळ घालतो.



कोणाची कारकीर्द दशकानुदशकांची असते, तर कोणाची काही आठवड्यांची. चेहरे आणि मुखवटे यांचं इतकं बेमालूम नातं असतं की खरं काय आणि खोटं काय, हे कोणीच सांगू शकत नाही. या मायावी दुनियेतल्या म्हणजे बॉलीवूडमधल्या तारे-तारकांचं वलयांकित आयुष्य आभासी भासत असलं, तरी तितकंच वास्तववादी आणि हवंसं वाटणारं असतं.



त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यात सर्वांनाच रस असतो. 'एंटरटेनमेंट'च्या नावाखाली त्यांच्या 'गॉसिप'च्या चर्चा सर्वत्र रंगतात.



उमेदीच्या काळात रुपेरी पडदा गाजवणारे दिग्गज कलाकार आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणारी तरुणाई अशा जुन्या-नव्या कलाकारांशी मुलाखतकार पूजा सामंत यांनी साधलेला हा संवाद!



These glittering stars of the silver screen… some become “stars” overnight, while others struggle for years and still find success elusive. Here, a “Shahenshah” of acting is born who rules the hearts of audiences, while someone else becomes a “King Khan,” captivating the youth. Some enjoy careers that span decades, while others last only a few weeks. The relationship between faces and masks is so seamless that it becomes impossible to distinguish what is real and what is not.



This magical world of Bollywood may appear glamorous and unreal, yet it is equally real and fascinating. Everyone is curious to know about the lives of these stars. In the name of “entertainment,” their “gossip” becomes a topic of widespread discussion everywhere.



This book presents engaging conversations by interviewer Pooja Samant with both veteran actors who once ruled the silver screen in their prime and young artists striving to create their own distinct identity.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
149.00