मुखपृष्ठ
Suhrud Jyoti

माझे शेल्फ

Suhrud Jyoti

इंग्रजी शीर्षक
Suhrud Jyoti
सारांश

ज्योतीने आपल्या जन्मजात आजाराचे भांडवल न करता नृत्य, ट्रेकिंग, कुकिंग हे आपले छंद जोपासले. 'येणार असेल मरण तेव्हा येऊ द्यावं!' हे आयुष्याचे सूत्र ठरवून ज्योती जीवन कशी जगली, याचे कथन म्हणजे हे पुस्तक!



मरण आज येईल की उद्या येईल, हे सांगता येत नसताना मरणाला हुलकावणी देत ४६ वर्षांचे आयुष्य ज्योती जगली; ते केवळ तिच्या सकारात्मक विचारांवर! हे तिचे प्रेरणादायी आयुष्य येथे मांडले आहे.

कुटुंबीय, शिक्षक, मैत्रिणी, डॉक्टर या सर्वांना तिने आपलेसे केले. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी हसत हसत आयुष्य कसे जगावे याचा आदर्शच तिने घालून दिला.

अभिनेते स्व. डॉ. श्रीराम लागू, दीपा लागू यांची ती मानस कन्या होती! प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ तिची जगण्याची जिद्द पाहून तिला 'लढवय्या' म्हणत! तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका नसीमा हुरजूक या ज्योतीच्या स्फूर्तिस्थान होत्या! या सर्वांचे हृदयस्पर्शी वर्णन यामध्ये आहे.

आपल्यासारख्याच हृदयरोगाने ग्रस्त असणाऱ्यांना मदत व्हावी, यासाठी 'हृदय-ज्योत' संस्थेची तिने स्थापना केली. दुःख, वेदना बाजूला सारून आनंदी आयुष्य ज्योती जगली! खऱ्या अर्थाने इतरांना प्रेरणा देणारा तिचा जीवनप्रवासाविषयीचे हे पुस्तक!

डॉ. प्रतिभा देशपांडे यांनी सहज, सुंदर शब्दांत ज्योतीचे आयुष्य चितारले आहे.



डॉ. प्रतिभा देशपांडे यांनी 'समुपदेशन मानसशास्त्र' (Counseling Psychology) या विषयात एम.ए. केले आहे. यासंबंधी ऑस्टिन, प्रिन्सटन आणि स्टॅनफोर्ड या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधून अनेक ऑनलाइन अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले आहेत. समुपदेशन हे डॉ. प्रतिभा यांचे आवडते काम असल्याने त्यांनी 'मानसशास्त्रीय प्रथमोपचार' यामध्ये पीएच.डी. संपादन केली. कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित ११ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.



Without capitalizing on her congenital illness, Jyoti nurtured her passions for dance, trekking, and cooking. Guided by the philosophy, “If death comes, let it come when it must,” this book narrates how she lived her life with courage and acceptance.



Though no one can predict whether death will come today or tomorrow, Jyoti lived for 46 years, constantly defying it—purely on the strength of her positive mindset. This inspiring journey of her life is presented in the book.

She built warm and loving relationships with family members, teachers, friends, and doctors. No matter how many difficulties she faced, she showed how to live life with a smile, becoming a true role model.

She was the spiritual daughter of renowned actor Shreeram Lagoo and Deepa Lagoo. Eminent cardiologist Jagdish Hiremath admired her determination and called her a “fighter,” while senior social worker and writer Nasima Hurzuk was a source of inspiration for her. The book includes heartfelt descriptions of all these relationships.

To help others suffering from similar heart conditions, she established the organization “Hriday-Jyot.” Setting aside pain and suffering, Jyoti lived a joyful life. This book truly captures her inspiring life journey.

Dr. Pratibha Deshpande has portrayed Jyoti’s life in simple, beautiful, and expressive words.

Dr. Pratibha Deshpande holds an M.A. in Counseling Psychology and has completed several online courses from international universities such as Austin, Princeton, and Stanford. With a deep passion for counseling, she earned a Ph.D. in Psychological First Aid. She has also authored 11 books based on family relationships.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
भाषा
मराठी
किंमत
399.00