Amazon Neeti
'अॅमेझॉन नीती' या पुस्तकात 'अॅमेझॉन' आणि जेफ बेझोस यांची कामगिरी मांडताना लेखिका वसुधा जोशी यांनी वेचक गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्यांचा अर्थ उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
'जंगली.कॉम' या संकेतस्थळाच्या माध्यमातून २०१३ मध्ये या व्यवसायाने भारतामध्ये पदार्पण केले. आज 'अॅमेझॉन.इन' या नावाने विस्तार करून भारतातील बाजारपेठेवर अॅमेझॉनने वर्चस्व प्रस्थापित केले आहे, ते कसे हे सांगणारे पुस्तक!
कंपनीने २०१५ मध्ये भारतात 'अॅमेझॉन चहाची गाडी' ही मोहीम उघडली. त्याद्वारे ३१ शहरांतील १० हजार छोट्या व्यावसायिकांना एकत्र करून 'ई-कॉमर्स'चे फायदे त्यांना पटवून दिले. यांसारख्या व्यावसायिक पण रंजक कथा पुस्तकामध्ये मांडल्या आहेत.
भारतात स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिन यांच्या निमित्ताने वर्तमानपत्रात पानभर जाहिराती देण्याचे तंत्र कंपनीने अवलंबिले; तर थेट ग्राहकांपर्यंत माल पोहोचविण्यासाठी डिलिव्हरी बॉईजची व्यवस्था केली. उद्योग विस्तारासाठी स्थानिक बाजारपेठांचा अभ्यास अॅमेझॉनने कसा केला याची माहिती यामधून मिळते.
'अॅमेझॉन' उद्योगजगताच्या विस्ताराची थोडक्यात माहिती साध्या-सोप्या भाषेत मराठी वाचकांना यामधून मिळते. तरुणांना, विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य वाचकांना उपयोगी ठरेल अशी अद्ययावत माहिती पुस्तकामधून दिली आहे.
In the book “Amazon Niti”, while presenting the achievements of Amazon and Jeff Bezos, author Vasudha Joshi focuses on selected key aspects and attempts to interpret their deeper meaning.
Through the website Junglee.com, the company entered India in 2013. Today, under the name Amazon.in, Amazon has expanded and established a strong presence in the Indian market—this book explains how that happened.
In 2015, the company launched the “Amazon Chai Cart” campaign in India. Through this initiative, around 10,000 small business owners across 31 cities were brought together and introduced to the benefits of e-commerce. Such professional yet engaging stories are presented in the book.
The company adopted strategies like publishing full-page advertisements in newspapers on occasions such as Indian Independence Day and Republic Day. It also established a system of delivery personnel to ensure direct delivery of goods to customers. The book provides insights into how Amazon studied local markets to expand its business.
Overall, the book offers a concise overview of Amazon’s growth in simple language for Marathi readers. It provides up-to-date information that will be useful for young people, students, and general readers alike.