Management Mafia
या कादंबरीमध्ये कंपनीचा पर्सोनेल मॅनेजर कथेचा नायक आहे. त्याच्याभोवती फिरणारे अनेक प्रसंग, तणावपूर्ण घटना यांतून कॉर्पोरेट विश्वातील घडामोडींची आपल्याला माहिती मिळते.
अधिकारी, कर्मचारी, मालक यांच्यातील गुंतागुंत, कामगारांच्या अपेक्षा, मालकाची व्यावसायिक यश मिळविण्याची धडपड या सर्वांचा मेळ या कादंबरीमध्ये शब्दबद्ध झाला आहे. त्यामुळे ती वाचकाला गुंतवून ठेवते.
या पुस्तकातून वाचकाला कॉर्पोरेट विश्वाची ओळख होते. तसेच नोकरीमध्ये यश मिळविण्याची जिद्द, ते मिळविल्यानंतरही त्याची क्षणभंगुरता, मालकांची असहाय्यता वाचक अनुभवतो. एकीकडे आरोग्यदायी स्पर्धा म्हणताना दुसऱ्या बाजूला एकमेकांचे खच्चीकरण करण्यासाठी सुरू असलेली चढाओढ, कामगार नेतृत्वाचे अपयश किंवा युनियनचा स्वार्थासाठी केला जाणारा वापर यांतून एक व्यापक पट किंवा बुद्धिबळाचा खेळ वाचकाला वाचनाचा वेगळा आनंद देईल.
लेखकाने सोप्या आणि कामगार व कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या भाषेत ही कादंबरी लिहिली आहे. त्यामुळे वाचकाला ती गुंतवून ठेवते. ही कादंबरी चित्ररूपाने वाचकाच्या डोळ्यांसमोरून सरकत जाते. हे लेखकाच्या लेखनशैलीचे यश आहे.
लेखक संजय सुखटणकर हे व्यवस्थापन आणि कामगार कायदे या विषयातील तज्ञ आहेत. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात विविध ठिकाणी अधिकारी पदावर काम केले आहे. ते करत असताना त्यांना अनेक अनुभव आले. ते त्यांनी कादंबरीच्या रूपाने लिहिले आहेत. त्यांनी यापूर्वी लिहिलेल्या कामगार कायदे या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.
In this novel, the protagonist is the Personnel Manager of a company. Through the many incidents and tense situations revolving around him, the reader gains insight into developments in the corporate world.
The complexities between officers, employees, and owners; the expectations of workers; and the owner’s struggle to achieve business success—all these elements are woven together in the narrative, making it engaging for the reader.
Through this book, readers become familiar with the corporate world. It also conveys the determination needed to achieve success in a job, the fleeting nature of that success, and the helplessness of employers. On one hand, there is healthy competition, while on the other, there is a race to undermine one another. The failure of labor leadership and the use of unions for selfish interests create a broad canvas—almost like a game of chess—that offers a unique reading experience.
The author has written the novel in simple language, reflecting the style used by workers and corporate officers, which keeps the reader deeply engaged. The story unfolds vividly like a visual sequence before the reader’s eyes—this is a testament to the author’s writing style.
The author, Sanjay Sukhatankar, is an expert in management and labor laws. He has worked in various positions as an officer in the corporate sector and has drawn from his many experiences to shape this novel. His earlier book on labor laws has been published in two editions.