मुखपृष्ठ
Mi Kamlesh Kothurkar

माझे शेल्फ

Mi Kamlesh Kothurkar

इंग्रजी शीर्षक
Mi Kamlesh Kothurkar
सारांश

'मी कमलेश कोठुरकर' या कादंबरीत लेखक शिवराज गोर्ले यांनी एका महत्त्वाकांक्षी युवकाचे आत्मकथन रेखाटले आहे.



कादंबरीचा नायक कमलेशने 'माझा जन्म सामान्य म्हणून जगण्यासाठी झालेला नाही,' अशी नोंद आठवीत असताना आपल्या डायरीत केली होती. तो त्याचा जीवनप्रवास युवकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.

सबुरी, चिकाटी, आत्मविश्वास, लोकांना प्रभावित करण्याची क्षमता आणि भांडवलाचा पुरवठा ह्या यशस्वी उद्योजकासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी कादंबरीत चपखलपणे मांडल्या आहेत.

'पैसा, पॉवर, प्रतिष्ठा' या तीन गोष्टींना महत्त्व देऊन जगणारा कमलेश शेवटी प्रेम आणि इतर जीवनमूल्यांचे महत्त्व जाणतो, ते वाचकाला आपलेसे वाटतात.

माहिती तंत्रज्ञान, मार्केटिंग, फायनान्स यांसारख्या संकल्पनांचे साध्या-सोप्या भाषेत कादंबरीच्या माध्यमातून केलेले विश्लेषण रंजक आहे.

रंजक कथानक आणि व्यवस्थापनशास्त्र यांचा योग्य समन्वय या कादंबरीत साधला आहे. ही जमेची बाजू आहे.

आपल्या मुलानेही ‘कमलेश कोठुरकर’ व्हावे असे वाटणारे पालक, मुले-मुली, तरुण-तरुणी आणि चाळिशीतल्या काही प्रौढांनाही ही कादंबरी आपलीशी वाटेल.



शिवराज गोर्ले यांनी एम.ए. (अर्थशास्त्र) आणि एम.बी.ए.ची पदवी संपादन केली आहे. फिलिप्स इंडिया लि., किर्लोस्कर कन्सल्टंटस् लि. व स्टॅटफिल्ड इक्विपमेंट्स या उद्योगसंस्थांमध्ये पर्सोनेल व मार्केटिंग क्षेत्रात ते कार्यरत होते. ‘कुर्यात सदा टिंगलम’, ‘गोलमाल’, ‘बुलंद’, ‘अनैतिक’, ‘भांडा सौख्यभरे’ या नाटकांचे त्यांनी लेखन केले आहे. त्यांनी ‘थरथराट’, ‘खतरनाक’, ‘धुमाकूळ’, ‘बंडलबाज’, ‘बाप रे बाप’, ‘बजरंगाची कमाल’, ‘सवाल माझ्या प्रेमाचा’, ‘सूडचक्र’, ‘चिमणी पाखरं’ या चित्रपटांसाठी पटकथा व संवादलेखन केले आहे. ‘घरकुल’ या दूरदर्शन मालिकेचे लेखन तसेच ‘दुरंगी’, ‘सर्वस्व’ या कादंबऱ्या, ‘नग आणि नमुने’ हा विनोदी व्यक्तिरेखासंग्रह, ‘मेख’, ‘फिट्टम् फाट’ हे विनोदी कथासंग्रह यांचे लेखन केले आहे. ‘मजेत जगावं कसं?’ या पुस्तकाला महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा पुरस्कार, ‘नग आणि नमुने’साठी विमादी पटवर्धन व राज्यशासनाचा पुरस्कार, तसेच ‘सुजाण पालक व्हावं कसं?’ या पुस्तकासाठी मराठी साहित्य परिषद आणि शिक्षण मंडळ, कऱ्हाड यांचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.



In the novel “Mi Kamlesh Kothurkar”, author Shivraj Gorle portrays the autobiographical journey of an ambitious young man. The protagonist, Kamlesh, had written in his diary as early as the eighth grade, “I was not born to live an ordinary life.” His life journey serves as a source of inspiration for young readers. The novel effectively presents the essential qualities required for a successful entrepreneur—patience, perseverance, self-confidence, the ability to influence people, and access to capital. Kamlesh, who initially values “money, power, and prestige” above all, eventually realizes the importance of love and other core values of life, making his journey relatable and meaningful to readers. The book also explains concepts like information technology, marketing, and finance in a simple and engaging manner through the narrative. A strong blend of an interesting storyline and management principles is one of the novel’s greatest strengths. This novel will appeal to parents who wish their children to become like Kamlesh Kothurkar, as well as to students, young adults, and even individuals in their forties.



Shivraj Gorle holds an M.A. in Economics and an MBA degree. He has worked in the fields of personnel and marketing at companies such as Philips India Ltd., Kirloskar Consultants Ltd., and Statfield Equipments. He has written several plays including Kuryat Sada Tingalam, Golmaal, Buland, Anaetik, and Bhanda Saukhyabhare. He has also contributed screenplays and dialogues for films such as Thartharat, Khatarnaak, Dhumakul, Bandalbaaz, Baap Re Baap, Bajrangachi Kamal, Sawal Majhya Premacha, Soodchakra, and Chimani Pakharan. Additionally, he has written the television serial Gharkul, novels like Durangi and Sarvasva, the humorous character collection Nag ani Namune, and humorous story collections such as Mekh and Fittam Faat. His book “Majet Jagava Kasa?” received the Maharashtra Tattvajnana Parishad Award, while Nag ani Namune earned the Vimadi Patwardhan Award and a State Government Award. His book “Sujan Palak Vhava Kasa?” was honored by the Marathi Sahitya Parishad and the Shikshan Mandal, Karhad.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
295
भाषा
मराठी
किंमत
399.00