मुखपृष्ठ
Modi 2.0 Amulagra Rajkiy Badalachi Nandi

माझे शेल्फ

Modi 2.0 Amulagra Rajkiy Badalachi Nandi

इंग्रजी शीर्षक
Modi 2.0 Amulagra Rajkiy Badalachi Nandi
सारांश

देशाच्या राजकीय इतिहासात एक लक्षवेधी वळण २०१४च्या लोकसभा निवडणुकांनी आणलं. या निवडणुकांनी आणलेले बदल हा काही त्याआधीच्या सरकारला कंटाळलेल्या लोकांनी दिलेल्या कौलामुळं झालेला तात्पुरता बदल नव्हता. ज्या धारणा त्याआधीची सहा दशकं प्रमाण मानल्या जात होत्या त्याला हादरे देण्याची ही सुरुवात होती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा भाजपनं बहुमतासह दिल्लीचं तख्त राखलं. या दोन्ही विजयाचे नायक मोदी हेच होते. त्यांच्या पहिल्या कारकिर्दीतील अखेरच्या दोन वर्षांत भाजपचा सहभाग असलेल्या किंवा भाजपच्या आधीच्या सरकारहून आपला रंग वेगळा असल्याचं ठसवण्याची सुरुवात केली. मोदी नावाची राजकीय यशकथा ठसवणारीही ही वर्षं होती. त्यात प्रतिमानिर्मितीचा काळजीपूर्वक विणलेला खेळ महत्त्वाचा होता. 'अच्छे दिन'चा वायदा करून सत्तेत आलेले त्यावर पुढची निवडणूक आली असताना बोलतही नव्हते, मात्र नवी स्वप्नं दाखवण्याचा उत्साह आणि ती लोकांच्या नजरेत, मनात उतरवण्याची हातोटी या बळावर मागचं आठवूही नये, असं नेपथ्य उभं करणं हे मोदीकाळातील भाजपचं यश. ते 'नया भारत'चं स्वप्न दाखवताना देशाच्या वाटचालीला नव्या मार्गावर घेऊन जायचा प्रयत्न करत होतं. आमूलाग्र राजकीय बदलांची कहाणी या पुस्तकात या अत्यंत महत्त्वाच्या कालखंडात देशात चाललेल्या राजकीय घुसळणीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.



A significant turning point in India’s political history came with the 2014 Lok Sabha elections. The changes brought about by these elections were not a temporary shift driven by public frustration with the previous government. Rather, they marked the beginning of a challenge to assumptions that had held sway for six decades. In the 2019 Lok Sabha elections, the BJP once again retained power in Delhi with a clear majority. The central figure behind both these victories was Narendra Modi.



During the last two years of his first term, Modi began to assert a distinct identity for the BJP, differentiating it from previous governments, even those in which the BJP had participated. These years also established Modi as a political success story, where careful image-building played a key role. The promise of “Achhe Din” had brought him to power, but even before the next elections arrived, the focus was on creating new dreams and embedding them in the hearts and minds of the people—a strategic backdrop to Modi-era BJP’s success.



By presenting the vision of a “New India,” the government sought to guide the nation’s journey onto a new path. This book attempts to chronicle these sweeping political changes, providing an account of the political upheavals that took place during this crucial period in India.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
204
भाषा
मराठी
किंमत
260.00