Adhunik Krushi Avajare Wa Yantre
जमीन मशागत, पेरणी, पुनर्लागवड आणि पीक काढणीसाठी विविध प्रकारची अवजारे आणि यंत्रे शेतकऱ्यांच्या रोजच्या वापरात असतात. सध्या शेतीत जाणवणाऱ्या मजुरांच्या कमतरतेमुळे ही अवजारे वापरली जातात. त्यामुळेच शेतीमधले यांत्रिकीकरण महत्त्वाचे ठरत आहे. तरीही, शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यात अनेक आव्हाने आहेत. अवजारांबद्दलचे अज्ञान हे त्यातले प्रमुख आव्हान आहे. ऊस, कपाशी, सोयाबीन, फळबागा यांसाठी उपयुक्त ठरणारी अवजारे आणि यंत्रे तसेच महिलांचे श्रम कमी करणारी अवजारे अशा विविध प्रकारच्या अवजारांविषयीची माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल. शेष म्हणजे, शेतकऱ्यांना आता एकाच ठिकाणी विविध कृषी अवजारे, यंत्रे, याविषयीची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. अवजारांची देखभाल आणि ट्रॅक्टरची कार्यक्षमता याविषयीची माहितीही या पुस्तकात सविस्तर वाचायला मिळेल. त्यादृष्टीने सर्वसामान्य शेतकरी ते प्रगतिशील शेतकऱ्यांपर्यंत सर्वांसाठीच हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. अवजारांविषयीचे अज्ञान दूर व्हावे म्हणूनच डॉ. तुळशीदास बास्टेवाड यांचे आधुनिक कृषी अवजारे व यंत्रे हे पुस्तक महत्त्वाचे ठरते.
Land preparation, sowing, replanting, and crop harvesting involve the use of various tools and machines in farmers’ daily work. With the current shortage of labor in agriculture, the use of these tools has become even more necessary, making mechanization in farming increasingly important. However, adopting mechanization in agriculture comes with several challenges, the primary one being the lack of awareness about the tools. This book provides detailed information about tools and machines useful for crops like sugarcane, cotton, soybean, and orchards, as well as tools that reduce women’s labor.
In short, farmers can now access comprehensive information about various agricultural tools and machines all in one place. The book also provides detailed guidance on tool maintenance and tractor efficiency. From ordinary farmers to progressive cultivators, this book is important for everyone. To bridge the gap in knowledge about agricultural tools, Dr. Tulshidas Bastewad’s Adhunik Krushi Avjare va Yanre (Modern Agricultural Tools and Machines) proves to be a valuable resource.