मुखपृष्ठ
Chavhata

माझे शेल्फ

Chavhata

इंग्रजी शीर्षक
Chavhata
सारांश

चार वाटा किंवा रस्ते जिथे एकत्र येतात, ती जागा म्हणजे चव्हाटा. सार्वजनिक हिताचे विषय चर्चेसाठी येणारे सामूहिक चर्चाविश्व (पब्लिक स्फीअर) असा त्याचा अधिक गंभीर अर्थ. भारतीय निसर्ग-पर्यावरणाचा असा चव्हाटा त्याबाबतच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शास्त्रीय अंगांच्या वाटांनीच साकारतो. आपला भवताल समग्र समजून घेण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. अशा चव्हाट्यावरील चर्चा रोखठोक असतात. विषयाच्या एरवी कुणीतरी, कुठेतरी लपवू पहात असलेल्या काही बाजू तिथे निश्चित उमटतात. चारही रस्त्यांमार्गे आलेल्या माहितीची तिथे देवाणघेवाण होऊन प्रश्नांचे वस्तुनिष्ठ आकलन होते. त्यातल्या प्रश्नांचे सहजी न कळणारे काही पैलू चव्हाट्यावर भीडभाड न बाळगता सामोरे येतात. हे पुस्तक भारतीय निसर्ग-पर्यावरणातील काही ज्वलंत प्रश्न, त्यांच्यामागील आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शास्त्रीय गुंतागुंत अशाच रोखठोक पद्धतीने चव्हाट्यावर आणते. भारतीय निसर्गातील बऱ्याच सकारात्मक गोष्टी, सौन्दर्यही सामोरे आणते. सजग वाचकांना आणखी विचारप्रवृत्त आणि कृतीशील होण्यासाठी महत्वाचे संदर्भ पुरवते.



A “chavhata” is a place where four paths or roads converge. More seriously, it can be understood as a collective forum for public discussion (public sphere) where matters of public interest are debated. In the Indian context, such a chavhata emerges through the intersections of economic, social, political, and scientific dimensions of nature and environment. It becomes useful for gaining a comprehensive understanding of our surroundings.



Discussions at such a chavhata are direct and straightforward. Aspects of a topic that someone might otherwise try to hide or obscure surface clearly here. Information flowing from all four directions is exchanged, leading to an objective understanding of the issues. Some facets of the issues that are otherwise difficult to grasp come forward openly, without the crowding or confusion of everyday life.



This book brings key pressing issues of India’s natural environment, along with their economic, social, political, and scientific complexities, into such an open forum in a clear and straightforward manner. It also presents the many positive aspects and beauty of India’s nature. For attentive readers, it provides important perspectives to encourage deeper thinking and practical action.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
150
भाषा
मराठी
किंमत
225.00