परीक्षण
जगात टिकुन रहायचय?
कृष्ण म्हटल की आपल्याला आठवते ते महाभारत,भगवद्गीता आदि.
कृष्णाला जस प्रेमाच प्रतिक मानल जात तसच तो एक उत्तम रणनिती कार होता हे आपल्याला मान्य करायलाच लागत.
उत्तम व्युहरचना कशी करावी, नैतिकतेचे मार्ग वापरुन योग्य कृती कशी करावी दुरदृष्टी चा उपयोग करुन येणारे संभव्य प्रश्न कसे सोडवावेत अथवा होवु नयेत म्हणुन कशी काळजी घ्यावी या बद्दल हे पुस्तक आहे. या पुस्तकात कृष्णाची व्युह रचना त्याची रणनितीची चर्चा केली आहे तसेच त्याचा उपयोग आपण आपल्या रोजच्या जीवनात कसा करुन घ्यावा या बद्दल सांगितल आहे. थोडक्यात सांगायचे तर या जगात जगण्यासाठी आवश्यक असणारे अनेक गुण कृष्णामध्ये होते त्याचा उपयोग कायम आपल्याला होणार आहे अश्या वागण्याच्या पद्धती यात सांगितल्या आहेत.
तसेच आजचे नेते किंवा आयडल यांच्या गुणाची तुलना केली आहे. थोडक्यात कृष्णाची अनेक रुपे या पुस्तकात वाचायला मिळत आहेत.
मला हे पुस्तक विशेष भावल त्याच कारण आजच्या काळात आपण कृष्णाची तत्वे कशी वापरु शकतो याचे उत्तम विश्लेषण या पुस्तकात दिल आहे. तात्विक दृष्ट्या कृष्ण समजायला खुप कठिण आहे पण यात सहज सुंदर प्रकारे यात समजावले आहे. हे पुस्तक अनुवादित असुन सुद्धा उत्तम मांडणीमुळे ते अनुवादित आहे ते कळुन येत नाही.
हे पुस्तक नक्की जरुर वाचा. प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक जरुर असावे.
पुस्तकाचे नावः कृष्णनीती
लेखकः डॉ. गिरीश प. जाखोटिया
अनुवादः माधवी कुंटे
प्रकाशकः राजेंद्र प्रकाशन, मुंबई
किंमतः रू.२२५/- फक्त.
अभिप्राय
आनंदयात्री
आनंदयात्री · Fri, 14 May 2010 - 21:08
मस्तच.
या लेखकाची अजुन कोणते बरे पुस्तक प्रसिद्ध आहे ?
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Fri, 14 May 2010 - 21:10
कृष्णाच्या जिवनावर अश्या स्वरुपाचे पुस्तक वाचण्यात आलेले नाही. त्यात कृष्णाच्या नितीची आजच्या नेत्यांसोबत तुलना नक्कीच वाचनीय असावी असे वाटते...
पुस्तक वाचायला आवडेल..
परिचय अजुन थोडा मोठा असता तर बरे झाले असते
ऋषिकेश
ऋषिकेश · Sat, 15 May 2010 - 07:06 · उत्तर
सहमत आहे.
राधा१
राधा१ · Sat, 15 May 2010 - 09:00
वंश आणि एका मारवाड्याची गोष्ट..ही मला माहित असलेली