परीक्षण
मायकल आणि हाना
परीक्षण मजकूर
‘माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मी माझ्याबाहेर उभा राहून स्वत:ला निरखीत होतो.’ असं म्हणत जगणार्या मायकलची ही कहाणी ----
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=112&Itemid=125
अभिप्राय
टण्या
टण्या · Sun, 10 Apr 2011 - 15:26
सुरेख परिक्षण.. दोन-चार महिन्यामागे The Pianist आणि The Reader ही दोन्ही पुस्तके योगायोगाने एका पाठोपाठ एक वाचली.. दोन्ही सिनेमे आधीच बघितलेले होते.. एक वेगळाच अनुभव होता तो..
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Mon, 11 Apr 2011 - 04:42 · उत्तर
टण्या,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
The Pianist आणि The Reader हे दोन्ही सिनेमा मी बघितले नाहीत अजून. पण आता मात्र ह्या लेखाच्या निमित्ताने बोलताना काही जणांनी The Reader बघितला आणि आवडला असल्याचे सांगितले. त्यामुळे मलाही आता कधी एकदा तो सिनेमा बघेन असे झाले आहे.
The Pianist चा देखील एका मैत्रीणीने उल्लेख केला. आणि मी लग्गेच्च ते पुस्तक flipkart च्या wishlist मध्ये नोंदवले.
आनंदयात्री
आनंदयात्री · Sun, 10 Apr 2011 - 16:41
छान, सकाळी सकाळीच एक उत्तम परिचय वाचायला मिळाला.
टण्या, The Reader अश्यान नावाने चित्रपट आहे का ?
टण्या
टण्या · Sun, 10 Apr 2011 - 17:13 · उत्तर
होय, The Reader अश्याच नावाने चित्रपट आहे. Kate Winslet ला ह्या चित्रपटातील कामाबद्दल २००८ सालचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे ऑस्कर्स मिळाले होते
आनंदयात्री
आनंदयात्री · Mon, 11 Apr 2011 - 04:51 · उत्तर
धन्यवाद टण्या. आपल्यामुळे आणि चित्रामुळे आज एक नितांतसुंदर चित्रपट पाहिला. रविवार कारणी लागला.
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Mon, 11 Apr 2011 - 05:08 · उत्तर
आनंदयात्री,
किती नशीबवान आहेस रे...... मनोकामना इतक्या झटक्यात पूर्ण व्ह्यायला नशीबाची साथ हवीच!!!!
आरागॉर्न
आरागॉर्न · Sun, 10 Apr 2011 - 17:25
सुरेख परिचयाबद्दल अनेक आभार. पुस्तक वाचायच्या यादीत टाकले आहे.
सागर
सागर · Mon, 11 Apr 2011 - 10:33 · उत्तर
सुरेख परिचयाबद्दल अनेक आभार. पुस्तक वाचायच्या यादीत टाकले आहे.
छान लिहिले आहेस चित्रा.
परिचय आवडला एकदम.
खास करुन परिचयाच्या शेवटच्या ओळींमुळे तर पुस्तक वाचणारच आहे.
आपण कुणाच्या सहवासात होतो हे कळल्यानंतर अपराधीपणाच्या भावनेनं काळवंडून गेलं असेल.
अशा परिस्थितीशरण माणसांच्या जगण्याचं वास्तवदर्शी चित्रण करणारी ही कादंबरी वाचून संपते त्यावेळी आपलं मन सुन्न होऊन गेलेलं असतं, कोण चूक कोण बरोबर हे ठरवणं अवघड झालेलं असतं!
हा फील हे पुस्तक देऊ शकते यातच पुस्तकाची ताकद दिसते :)
कविता महाजन
कविता महाजन · Mon, 11 Apr 2011 - 12:53
अनुवाद अत्यंत सकस आहे. पण मला मूळ पुस्तकच विशेष आवडले नाही.
त्यातील बहुसंख्य पाने पौगंडावस्थेतील लैंगिक संबंधांच्या कथेने व्यापली आहेत आणि नंतरचा भाग मात्र ( या पृष्ठसंख्येच्या तुलनेत ) त्रोटकपणे, कमी पानांमध्ये उरकला गेला आहे असे जाणवते. केवळ शब्दसंख्या वा पृष्ठसंख्या कमी असल्याने काही फरक पडत नसतो, असा विचार करायचा झाला तरी कमी शब्दांमध्ये जितके प्रभावी सांगता येते तसे सांगण्यात जे लेखकीय कर्तृत्व असायला लागते ( उदा. पु.शि.रेगे यांच्या कादंबर्या ) त्याचा इथे अभाव जाणवतो. आधीची स्पष्ट, मोकळे सांगण्याची शैली व नंतरची धुसरता राखलेली शैली यामुळेही प्रभाव एकसंध राहत नाही.
टण्या
टण्या · Mon, 11 Apr 2011 - 13:46 · उत्तर
ह्या पुस्तकावर आणि विशेषतः चित्रपटावर ही टिका झालेली आहे. एक प्रकारची सॉफ्ट पोर्नोग्राफी वा चाइल्ड अॅबुझ ला चालना देणारा वा त्याचे कलात्मक चित्रण करणारा सिनेमा/पुस्तक (आणि असे करताना कथेत फारसा गाभा नसलेली कादंबरी) असे मत आहे (माझे नाही, काही टिकाकारांचे).
मी सुरुवातीला सिनेमा बघितला तेव्हा खूप आवडला होता. मग पुस्तक वाचले. 'नमनाला जरा जास्तच घडाभर तेल' असे ह्या शब्दात एका ओळखीतल्या व्यक्तीने ह्या पुस्तकाचे/सिनेमाचे चपखल वर्णन केले ते तेव्हा पटले. कविताच्या म्हणण्यास दुजोरा.
अवांतरः कमी पृष्ठसंख्येच्या उल्लेखाबाबात, पु शि रेग्यांची सावित्री की मातृका? सावित्री मला जाम फसलेली वाटते तर मातृका माझी अत्यंत आवडती कादंबरी.
यशोधरा
यशोधरा · Mon, 11 Apr 2011 - 13:32
सुरेख परिचय चित्रा, आवडला.
हे पुस्तक नकीच पाहीन व आवडले तर घेईनही. धन्यवाद.
मणिकर्णिका
मणिकर्णिका · Mon, 11 Apr 2011 - 16:29
चित्रा,
मी पुस्तक वाचलेले नाहीये पण पिक्चर बघितलाय. आणि तो इतका आवडला की तो मूळ कुठल्या पुस्तकावरुन घेतलाय वगैरे असे विचार डोक्यात यायचे काही कारणच नव्हते. अर्थात हे माझे अज्ञान आहे. तुझ्या लेखामुळे असे मूळ पुस्तक आहे याचा साक्षात्कार होतोय मला.
पण एक मात्र आहे. ( पिक्चर बघून) कोणालाही चूक/बरोबरच्या तागडीत नाही तोलावेसे वाटले मला. आहे हे असं आहे. हे असं नसतं तर कसं असत? ते असावं यासाठी काय केलं असतं म्हणजे तसं असलं असतं-अशा प्रकारचा एक स्वतःशीच मांडलेला प्रश्नोत्तरांचा खेळ वाटला 'द रीडर'.
पुस्तक नक्की मिळवून वाचेन. :)