परीक्षण
निशाणी ( साधलेला) डावा अंगठा
भारत तसा अजब देश आहे. या देशात अनेक फार्स रंगतात. सरकारच्या या कोपर्यापासुन ते समाजाच्या त्या कोपर्या पर्यंत इतकी नाटके रंगतात की, बापरे बाप! असा एक फार्स मध्यंतरी रंगला. ''साक्षरता अभियानाचा !तसा फार्स किंवा फार्सिकल नाटक हा मनोरजंनाचा भाग. पण, या भारतात काही फार्स हे आपल्या खुप जवळचे असतात,कधीतरी आपण नकळत त्यात सहभागीही असतो. असाच हा एक फार्स. हे एक अजब नाटक होत.एखादा कवी आपल्या काव्यातुन विविध जसा कल्पनांना जन्म घालतो तसा या फार्सात अक्षरश: नवनवीन माणंसाना कागदोपत्री जन्माला घातलं गेलं .नाटक संपल, पण, या फार्सनं शिक्षकांच्या मनावर ओरखडे उमटले आणि याच ओरखडयातुन जन्मला एक नवा फार्स ! रमेश इंगळे या सच्या शिक्षकाने या ''साक्षरतेच्या'' फार्साला, नाटकाला म्हणू हवतर झोडपले. आपले ओरखडे त्यावर ओढले तेही फार्सिकलच! ''निशाणी डावा अंगठा'' म्हणजेच तो फार्स, त्याचीच ती कहाणी.
हे पुस्तक वाचताना पहिल्यापासुनच स्पष्ट होते ती लेखकाची तळमळ !एखाद्याविषयी आपल्या भावना व्यक्त करायला आपण वेगवेगळी माध्यमे वापरतो. लेखकाने फार्स वापरला आणि आपला मेसेज अत्यंत योग्य तर्हेने पोहोचवला ..एखाद नाटक उभा करणं, ही तितकशी सोपी गोष्ट नाही.त्यातल्या त्यात फार्स तर खुपच अवघड ! पण, हा फार्स उभा करण्यात लेखक अगदी संपुर्णपणे यशस्वी झालेला आहे.
या फार्सात असंख्य कलाकार आहेत. काही चेहरा असणारे तर काही नसणारे, प्रत्येकाला स्वभाव आहे.,प्रत्येकाचे वैषिष्ट्य आहे आणि मग असे सगळे शिक्षक्,सरकारी नोकर ,हवसे नवसे गवसे एका सरकारी कामासाठी एकत्र आल्यावर जे नाटय घडते. ते ''डावा अंगठा'' दाखवते. जिथे घरातल्या माणसांचे पटणे अवघड मग असे मारुन मुटकुन एकत्र आणलेल्या वेगवेगळ्या माणसांचे पटणे नक्की अवघडच आणि .मग जी मजा निर्माण होते ती औरच. पण, हे जितके वाचायला सोपे आहे तितकेच लिहायला अवघड. वीस -तीस पात्रे उभे करणे, तीही वेगवेगळया भागातील, वेगवेगळे पुर्वायुष्य असणारी हे नक्कीच साधे काम नाही. पण, लेखकाने या सगळयांच्या सर्व खुबी अतिशय व्यवस्थितपणे रंगवलेल्या आहेत. प्रत्येकाचा स्वभाव, बोलण्याची लकब सगळे इतके ,छान जमले आहे की, जणु तो माणूस आपल्यासमोरच उभा आहे, असे वाटते. त्याच्यांत उडणारे खटके, वैचारिक मतभेद सगळ्याचीच भट्टी जमुन आलेली आहे . कदाचित त्यामुळेच बेर्डेना या पुस्तकावर चित्रपट काढावा वाटला असेल.
फार्साचे वैशिष्टय असे की आपण ज्या विषयाबद्दल बोलतो, त्याचे गुण दोष आपण स्वत: सांगत नाही. तर समोरच्या व्यक्तीला ते ओळखण्यास मदत करतो क्लू देतो.. हे काम लेखकाने चोख केले आहे. अगदी अवघ्या ३-४ मोठया प्रसंगातुन हे ''साक्षरता अभियान'' काय चीज आहे,त्यात काय घोळ आहेत ते लोकांना समजावून दिलेले आहे.
हे अभियान ही काही साधी गोष्ट नव्हती. या सगळयातुन शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या कुटुंबिंयाच्या मनावर परिणाम झाला .साक्षरता अभियानाचे गुणदोष सांगताना हे परिणाम दाखवले तरच त्या अभियानाने झालेला घोळ जास्त प्रभाविपणे, प्रकर्षाने जाणवणार ना! त्यांनी असे प्रसंग इतक्या उत्कटतेने साकारलेले आहेत की बास!आणि, त्याचप्रमाणे इतक्या सहजपणे त्याने ते यात समाविष्ट केलेले आहेत की वाचक अंतर्मुख होतोच.प्रत्यक्षात शिक्षकांना आणि समाजाला काय भोगावे लागले असेल ते जाणतो आणि हे सर्व विनोदाच्या फोडणीत जमवलेले.त्यामुळे लेखकाचे याबाबत विशेष अभिनंदन केलेच पाहिजे. ''ज्याचं जळतं त्यालाच कळतं'' हे खरे आहेच. पण, जेंव्हा जळताना दिसतानाच लोक घाबरतात, तेंव्हा तो प्रसंग रंगवनार्याचा विजय असतो. तसचं काहीसं इथं होत!
खरतरं हे पुस्तक आणि हे नाटक देखील त्या अभियानापुरता मर्यादित नाहीच. आपणही आपल्या आयुष्यात असे फार्स खेळतो. कधी अडखळतो, फजिती होते, तर कधी जिंकतो. त्यामुळे या फार्सातल्या एखाद्या व्यक्तिरेखेत आपणही बसु शकतो. जरा बॅकग्राउंड बदलली की झालं! त्यामुळं पुस्तक वाचताना बर्याचशा ठिकाणी, ''अरे, हे तर आपल्याबाबतीत पण घडतं.'' असं वाटतं. ''निशाणी'' एवढयावरच थांबत नाही. या पुस्तकातील मध्ये-मध्ये येणारे काही परिच्छेद अत्यंत बोलके आहेत. ते आपल्याला जाता जाता काही खडे बोल सांगुन जातात काही शिकवण देऊन जातात .किंवा
''साहेबाला फक्त कागदाची भाषा कळते''
अशा सत्यांची जाणीव करून देतात.
वर म्हटल्याप्रमाणे ''निशाणी'' हा एक संपूर्ण फार्स आहे. ''साक्षरता अभियान'' या विषयावर रंगवलेला फार्स.लेखकाचा उद्देश साक्षरता अभियान किती चुकिच्या पद्धतीने पार पडले ,कागदी घोडे कसे रंगवले गेले हे विनोदातुन सांगायचा तर आहेच पण, साक्षरता अभियानापेक्षा अनेक जटिल प्रश्न या समाजात देखील आहेतच की लेखकाने त्याकडेही आपली नजर वळवली आहे. मग, ते जातीपातीविषयक असो वा गरिबीविषयी किंवा मग व्यवसनाधिनतेविषयी.या नाटकाचा वापर करुन त्याने त्या सर्वांवर आपले भाष्य केले आहे. थोडक्यात हा फार्स १०० % जमलेला आहे. या फार्सात दलित, मुस्लिम, ब्राम्हण सगळे आहेत. आनंदाने राहत आहेत. आपापसातील दरी मिटवत आहेत. खेडेगावाचे असे चित्रण हे नक्कीच काळाच्या पुढचे आहे असे म्हणायला हरकत नाही.
फार्स उत्तम रंगलाय हे खरं! त्यातुन घटनेचे योग्य विश्लेषण झालेले आहे ,सर्व संबधित गोष्टींवर प्रकाश पाडलेला आहे. पण या नाटकात इतकी पात्रे आहेत की, त्यामुळे पुढेपुढे जाताना बराच घोळ होतो व शेवटी माणूस त्या पात्राकडे जास्त लक्ष न देताच पुस्तक वाचतो त्यामुळे होणारा परिणाम मात्र काहीसा कमी होतो, व्यक्तिरेखा रंगवताना घेतलेले कष्ट वाया जातात. या लेखनात येणारे शब्द आणि बोलीभाषा हा अजुन एक प्रश्न! सरकारदप्तरी वापरले जाणारे ''पूवेका'' वगैरे शब्द आपल्याला माहित नसतात. त्याचप्रमाणे वैदर्भीय बोलीभाषाही समजण्यास अवघड जाते. त्यामुळे ''शाब्दिक कोटयां'' ना फारसा वाव उरत नाही. अर्थात कदाचित लेखकाला या गोष्टीची जाणीव असावी कारण अश्लील कोटया, बोलीभाषा व प्रमाणभाषा यांचा अत्यंत चपखल वापर करुन त्यांनी ही पोकळी भरायची प्रयत्न केला आहे. पण, तरी उणीव राहतेच. कदाचित यामुळेच व पहिल्यांदा केलेल्या टोकदार लिखाणामुळेच पुस्तकाला वाचकाच्या मनावर पकड घ्यायला वेळ लागतो. नंतर साधलेल्या अनेक प्रसंगाच्या मानाने सुरवात थोडी कमकुवत वाटते.
थोडक्यात काय तर, रमेश इंगळेंनी ''साक्षरता'' हा विषय घेऊन रंगवलेला हा फार्स उत्तम रंगला आहे. काही उणिवा वगळल्यास उत्तम व्यक्तीचित्रण, भन्नाट प्रसंग आणि भन्नाट विनोद, उत्तम संवाद चित्रण या सगळयांनी हे नाटक जेव्हा कळसाध्याय गाठते तेव्हा सोंगांनी आपापली कामे चोख बजावलेली असतात. आणि, हे अभियान म्हणजे केवढा मोठा घोळ होता हे आपल्याला समजलेले असतेच. पण, जाता जाता जीवनभर उपयोगी पडतील असे चार उपदेशही आपल्या वळचणीला लागलेले असतात. आणि, नकळत आपण म्हणतो, ''रमेशभाई, तुमच्या अंगठयानं चांगलाच निशाणा साधला बरं कां!''
विनायक
अभिप्राय
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Fri, 4 Jun 2010 - 18:28
मी पुस्तक वाचलं नाही.. पण त्यावर आधारित चित्रपट पाहिलाय.. कॉमेडी म्हणून ठिक आहे पण बर्याच ठिकाणी तो कमी पडतो.. कदाचित ते दिग्दर्शकाचे अपयशही असू शकेल.
अवांतरः लेख लिहिल्यानंतर एकदा वाचून त्यातील शुद्धलेखन सुधारून मग प्रकाशित करत जा!!!
विनायक पाचलग
विनायक पाचलग · Fri, 4 Jun 2010 - 18:45 · उत्तर
नक्कीच
सध्या अंमळ गडबडीत आहे
वेळ मिळाला की करीनच
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Fri, 4 Jun 2010 - 18:59
निशाणी डावा अंगठा या पुस्तकाचे लेखक रमेश इंगळे आहेत. या शैलजा काळे कोण? दुरूस्ती करा आणि प्रतिसाद उडवा.
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Fri, 4 Jun 2010 - 19:18 · उत्तर
बदल केलेला आहे. एकाच नावाचे दोन पुस्तके असल्यावर असा गोंधळ होउ शकतो. तो टाळण्यासाठी खाली एक उपाय सुचवत आहे.
पुस्तक परिचय तयार करताना पुस्तकाचे नाव सिलेक्ट केल्यानंतर तिथे बाजुलाच डोळ्याचे चित्र असलेले बटन आहे. त्यावर क्लिक केल्यास नव्या खिडकीत पुस्तकाचे पान पाहता येईल.
(मोडकः- हा उपप्रतिसाद तुम्हाला नाही तर जनरल सुचना म्हणुन राहु देत आहे.)
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 4 Jun 2010 - 20:03
पुस्तक वाचलेले नहि.. चित्रपट डाऊनलोड केला आहे.. तो तितकासा आवडला नाहि (कथेत दम असला तरी नीट फुलवली नाहि आहे)
बघु पुस्तक सहज मिळाल्यास जरूर वाचू
विनायक पाचलग
विनायक पाचलग · Sat, 5 Jun 2010 - 07:41
जास्तीत जास्त शुद्धलेखन चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे
तसदीबद्दल क्षंमस्व
विनायक