परीक्षण
`पुवि'वरील मित्र-मैत्रीणंकरिता...
परीक्षण मजकूर
ह्या पुस्तकाचा परिचय लोकसत्ता-लोकरंग-पुस्तकांचे पान येथे १ फेब्रुवारी २००९ साली प्रसिध्द झाला होता. `पुवि'च्या मित्र-मैत्रीणींकरता तो इथे देत आहे. तो वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा....
http://www.loksatta.com/old/daily/20090201/lr09.htm
अभिप्राय
आरागॉर्न
आरागॉर्न · Tue, 1 Mar 2011 - 06:25
परिचयाबद्दल आभार. कादंबरीचा विषय नेहेमीपेक्षा वेगळा वाटला. पाडळकर यांचे लेख बरेचदा वाचले आहेत. त्यांनी कादंबर्याही लिहील्या आहेत हे ठाउक नव्हते.
चित्रा राजेन्द्र जोशी
चित्रा राजेन्द… · Tue, 1 Mar 2011 - 09:28
आरागॉर्न,
विजय पाडळकरांची ही पहिलीच स्वतंत्र कलाकृती आहे. त्यांची इतरही अनेक पुस्तके आहेत. त्यांनी वाचलेली पुस्तके, बघितलेले चित्रपट ह्यांचे आस्वादक समीक्षणपर लेख लिहिलेली पुस्तके जास्त आहेत. मला त्यांचे लिखाण आवडते. त्यांच्या इतर पुस्तकांचा परिचयही करून देण्याचा विचार आहे. `पुवि'प्रेमींना ती आवडतील.
यशोधरा
यशोधरा · Tue, 1 Mar 2011 - 09:19
चित्रा, परिचयाबद्दल धन्यवाद. लिंकवर जाऊन लेख वाचेन आता.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Tue, 1 Mar 2011 - 11:15
नांदेडच्या यक्ष प्रकाशनतर्फे प्रसिद्ध झालेल्या 'गर्द रानात भर दुपारी' या विजय पाडळकर लिखित 'राशोमोन' चित्रपटावरील पुस्तकात त्यांच्या आगामी 'अल्पसंख्य' बद्दल वाचले होतेच, पण ते प्रकाशित झाल्याचे माहीत नव्हते. श्री.विजय पाडळकर यांच्या लिखाणाची झलक 'जी.ए. पत्रव्यवहार' ग्रंथांच्या संपादन कार्यात पाहायला मिळाली होतीच. 'सिनेमाचे दिवस' हेदेखील त्यांचे एक सुंदर पुस्तक वाचले आहे.
आता तुम्ही 'अल्पसंख्य' चा दिलेला (आणि लिहिलेला) धागा वाचला, त्यामुळे कादंबरी मिळवून वाचण्याची उत्सुकता वाढली इतकेच म्हणतो.
इन्द्रा