परीक्षण

शहाण्यांचा सायकीअ‍ॅट्रीस्ट आणि IPH

परीक्षण मजकूर

डॉ. आनंद नाडकर्णी ह्यांचे शहाण्यांचा सायकीअ‍ॅट्रीस्ट नुकतेच संपवले. डॉ. आनंद नाडकर्णी आणि IPH (Institute For Psychological Health) ह्याच्या गेल्या दोन दशकातील वाटचालीचे हे पुस्तक आहे. Mental Health For All हे IPH चे Vision Statement आहे. गंमत म्हणहे IPH चे स्वप्न डॉ. आनंद नाडकर्णी विद्यार्थी असतांनाच पाहिले होते. आज IPH चा अवाका आणि एकुण कामकाज बघता त्यांच्या दुरदृष्टीचे कौतुक वाटते.

हे पुस्तक त्यांच्या गेल्या २० वर्षातल्या वाटचालीचा, अडचणींचा आणि यशा-अपयशाचा लेखाजोखा म्हणजे हे पुस्तक. स्वतः डॉ. आनंद नाडकर्णी हे युनिव्हर्सिटीचे gold medal मिळालेले psychiatrist. त्यांचा REBT पद्धतीचा अभ्यास आणि त्या उपचार पद्धतीवरील विश्वास ह्यांचा प्रत्यक्ष अनुभव आहेच, पण ह्या पुस्तकाच्या निमित्ताने ते विचार त्यांनी खरच किती आत्मसात केलेत हे लक्षात येते. त्यांणि ह्या पुस्तकात स्वतःच्या खाजगी आयुष्यातल्या काही अप्रिय घटनांविषयी लिहिले आहे, जसे त्यांचा घटस्फोट आणि त्यांचे आईशी बिघडते संबंध - ते वाचतांना (खास करून त्यांच्या पत्नीविषयी) खरच आश्चर्य वातते की किती संयतपणे कुठेही दोषारोप न करता त्यांनी ते लिहीले आहे...त्यांची वेदना दिसते, पण विखार किंवा कडवटपणाचा नाही. स्वतःच्या चुकांबद्दलही प्रांजळपणे लिहीले आहे.

हे पुस्तक वाचतांना प्रकर्षाने जाणवणारी दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टरांचे बहुआयामी, ऑलराउंडर व्यक्तिमत्व. एका उत्कृष्ट psychiatrist बरोबरच ते अतिशय उत्तम वक्ते, ललित लेखक, थोडेसे कवी, नाट्यलेखक आणि सर्वात मह्त्वाचे म्हणजे एक उत्तम संयोजक आणि motivator आहेत. त्यांचा लोकसंग्रह अफाट आणि चकीत करणार आहे - त्यात एका बिल्डर पासून तर मग हेमंत करकरे, अमोल गुप्ते सारखी विविध क्षेत्रातील लोकं आहेत. IPH सारख्या एका सतत व्यस्त आणि विविध कार्यक्रम करणार्‍या संस्थेला अतिशय झोकून दिलेले कार्यकर्ते (तिथले लोक employee कमी आणि कार्यकर्तेच जास्त आहेत) मिळण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे स्वतः डॉ. आनंद नाडकर्णी. ६०+ लोकांची टीम ते खूपच उत्तमरीत्या सांभाळतात - आणि तितकीच तोलामोलाची साथ मिळते त्यांना सगळ्याच टीम कडून - मग त्या थत्ते मॅडम असो की मारुती. त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे IPH मधे मानधनाचे चेक महिन्याला encash करण्याचे प्रमाण फक्त ५०% आहे. बहुतेक लोक तिथे काम करता ते पैशासाठी नाही तर त्यांना मिळणार्‍या समाधानासाठी. तिथे मिळणारे work satisfaction & work culture हे वेगळेच आहे. आणि हे फक्त तज्ञांसाठीच नाही तर सगळ्याच टीमसाठी.

IPH ही अतिशय vibrant & happening place आहे, आणि त्याच्या विविध activities दिवसेंदिवस वाढतातच आहे. मग तो वेध सारखा अतिप्रसिद्ध "event" असो किंवा 'त्रिदल' (Schizophrenia rehabilitation), 'मैत्र' (phone helpline run by volunteers) सारखा उपक्रम. IPH मन झोकून काम करते आणि जे होते ते उत्तमच - हे मी स्वतःही अनुभवले आहे. mental disorder, distress ते development ह्या पुर्ण spectrum मधे IPH अतिशय मोलाचे आणि दूरगामी काम करत आहे. ह्या पुस्तकात लक्षात येते ती ह्या सगळ्या मागची अथक मेहनत आणि commitment. त्याचबरोबर प्रांजळपणे वर्णन केलेल्या चुका आणि त्यामुळे आलेल्या प्रचंड अडचणी आणि कर्ज ह्याबद्दलही त्यांनी सविस्तर लिहिले आहे. त्यातही जाणवत राहते ती त्यांची खोलवर रुजलेली जाण - factors within control आणि factors beyond control मधला फरक त्यांना नेमका लक्षत येतो आणि तो फरक ते स्वीकारतात. मग दिसते ती त्यांची अथकपणे आणि कल्पकपणे factors within control वर काम करण्याची इच्छाशक्ती आणि जिद्द. वेगवेगळ्या अडचणीतून आणि वेगवेगळ्या गैरसोयीच्या जागांमधून आजची देखणी आणि भव्य IPH आकरली आहे ती ह्याच स्वभावामुळे.

अर्थात ह्याबरोबरच त्यांच्या टीमलाही तितकेच सबल, विकसित करण्याचे त्यांचे खास उपक्रमशील, "उद्योजक" कौशल्यही खासच आहे! नुसते REBT counselling करणे वेगळे आणि REBT समजून, उमजून आत्मसात करून जगणे हे वेगळे - डॉ. आनंद नाडकर्णी असे जगत असे वाटते, आणि म्हणूनच त्यांचे counselling किंवा पुस्तके इतकी प्रभावी होतात.

डॉ. आनंद नाडकर्णी ह्यांचे अनिल अवचट आणि सुनंदा अवचट ह्यांच्याशी असलेले नातेही असेच खास. M.D. च्या वेळेस एका paper presentation च्या वेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे डॉ. आनंद नाडकर्णी यांची सुनंदा अवचट ह्यांच्याशी ओळख झाली आई पुढे 'गर्द' च्या संदर्भात ती वाढतच गेली. डॉ. आनंद नाडकर्णी अवचटांच्या पुण्यतल्या मुक्तांगणशी जोडलेले आहेत - म्हणजे अनिल अवचट 'बाबा' तर डॉ. आनंद नाडकर्णी 'काका'! इतक्याव्या पातूनही ते मुक्तांगणसाठी वेळ काढतात आणि त्यांच्याच भाषेत सांगयचे तर 'गोष्टी सांगेन युक्तिच्या चार' असा सल्लाही देतात. तसेच सुनंदा अवचट ह्यांच्या स्मॄती निमित्त देण्यात येणार्‍या 'जिद्द' पुरस्कारालाही ते असतातच.

बरेच exceptionally intelligent, gifted आणि all rounder लोकं असतात, पण स्वतःपलीकडे जाऊन समाजासाठी इतके काम करणारे बोटावर मोजण्याइतकेच. त्यातही psychiatry ला असणार्‍या stigma ला जवळ, जवळ घालवून IPH ला एक "आपली" संस्था बनवणारे डॉ. आनंद नाडकर्णी भावतात ते ह्याचमुळे.मनोविकारत़ज्ञ आणि मनोविकासतज्ञ घडवणार्‍या IPH चा हा २ दशकांचा प्रवास नुसताच वाचनीय नाही तर त्याहीपलीकडे अनुकरणीय आणि प्रेरणा देणारा आहे. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याविषयी आदर, प्रेम होतेच - हे पुस्तक वाचल्यावर ते वाढलेच आहे! :)

अभिप्राय

कैवल्य

कैवल्य · Tue, 4 May 2010 - 13:22

अगदी स्फुर्तीदायी व्यक्तीमत्व आहे.
धन्यवाद रे मनिष! केवळ पुस्तकच नव्हे, तर ते लिहिणार्‍या ह्या आदरास पात्र असलेल्या लेखकाचीही सोबतच ओळख करुन दिलीस त्याबद्दल.

अवलिया

अवलिया · Tue, 4 May 2010 - 15:02

वाचलेच पाहिजे पुस्तक

राजे

राजे · Wed, 5 May 2010 - 07:32

मस्त रे...

वाचायला हवे एकदा तरी...

ऋषिकेश

ऋषिकेश · Wed, 5 May 2010 - 09:07

पहिल्यांदाच ऐकले या पुस्तकाविषयी.. वाचायच्या यादीत टाकायला हवे

मनिष

मनिष · Wed, 5 May 2010 - 10:29 · उत्तर

येत्या गुढीपाडव्यालाच (१६ मार्च) पहिली आवृत्ती आली.

मनिष

मनिष · Sun, 21 Nov 2010 - 12:34

मायबोलीवर ह्या पुस्तकाविषयी खूप छान लिहिले आहे -
http://www.maayboli.com/node/20848

तिथे पुस्तकाची काही पानेही वाचता येतील!

प्रदीप०७०५

प्रदीप०७०५ · Sun, 21 Nov 2010 - 13:26

आवडला. डॉ. आनंद नडकर्णीच्या कार्याविषयी बरीच नवी माहिती समजली. पुस्तक वाचले पाहिजे असे वाटू लागले आहे.

....मग दिसते ती त्यांची अथकपणे आणि कल्पकपणे factors within control वर काम करण्याची इच्छाशक्ती आणि जिद्द.

IPH यशस्वी झाली आहे, त्यात ह्या प्रॅग्मॅटिझमचा वाटा नक्कीच आहे. जिथे तो नसतो, तिथे अपयशच हाती येते.

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Tue, 23 Nov 2010 - 13:02

परिचय उत्तम आहे. पण मला पुस्तक तितकंसं नाही आवडलेलं.
आपण करत असलेल्या कामाचं मूल्यमापन डॉक्टर अजिबातच करत नाहीत, 'मी हे केलं, मी ते केलं' अशी जंत्री देत सुटतात, अशी काहीशी भावना शेवटी शेवटी वाचताना येते. त्यांच्या कामाचं महत्त्व मला कमी नाही लेखायचं, पण पुस्तक तितकं रेखीव - विलक्षण नाही वाटलं, जितकं त्यांचं प्रत्यक्ष काम असू शकेल. पुस्तकातल्या वर्णनात एक सराईत सरधोपटपणा - सरसकटपणा (!) जाणवला.

अवांतरः एखाद्या कडवट क्षणी इतक्या निखळ सकारात्मक दृष्टिकोनाचं अजीर्ण होऊ शकतं. अवचट, नाडकर्णी आणि तत्सम लेखकांना उद्देशून 'कठीण प्रश्नांचं सुलभीकरण' अशी तुमची सररास (कडवट!) प्रतिक्रिया होत असेल, तर तुम्ही हे वाचलंच पाहिजे!

आरागॉर्न

आरागॉर्न · Tue, 23 Nov 2010 - 16:49 · उत्तर

आपण करत असलेल्या कामाचं मूल्यमापन डॉक्टर अजिबातच करत नाहीत, 'मी हे केलं, मी ते केलं' अशी जंत्री देत सुटतात, अशी काहीशी भावना शेवटी शेवटी वाचताना येते. त्यांच्या कामाचं महत्त्व मला कमी नाही लेखायचं, पण पुस्तक तितकं रेखीव - विलक्षण नाही वाटलं, जितकं त्यांचं प्रत्यक्ष काम असू शकेल. पुस्तकातल्या वर्णनात एक सराईत सरधोपटपणा - सरसकटपणा (!) जाणवला.

मला नाडकर्णींच्या बाबतीत असे कधीच जाणवले नाही. "गद्धेपंचविशी"पासून विषादयोग पर्यंत स्वतःचे आणि इतरांचे गुण-दोषांसकट यथाशक्ती मूल्यमापन त्यांनी केले आहे असे माझे मत आहे.

एखाद्या कडवट क्षणी इतक्या निखळ सकारात्मक दृष्टिकोनाचं अजीर्ण होऊ शकतं.

नाडकर्णी मानसोपचारतज्ञ असल्यामुळे त्यांच्या लेखनात नकारात्मक दृष्टीकोन असणे अशक्य आहे. हे त्यांच्या व्यवसायालाही मारक ठरेल. त्यामुळे नाडकर्णींना वाचताना ही अपेक्षा ठेवणे बरोबर नाही असे वाटते. माझ्या मते सकारात्मक दृष्टीकोनाचे अजीर्ण निदान मला तरी होत नाही. किंबहुना परिस्थिती कितीही वाइट असली तरी त्यातून सकारात्मक पर्याय निवडता येतात असे वाटते. यात साहित्यिक मूल्य कमी असेल कदाचित. टॉलस्टॉय म्हणतो त्याप्रमाणे प्रत्येक सुखी कुटुंब सारखे असते, पण प्रत्येक दु:खी कुटुंबाची कथा वेगळी असते. साहित्यिक दृष्टीकोनातून शेक्सपिअरपासून काफ्कापर्यंत दु:खी, निराश आयुष्यावर भरभरून लिहीले गेले आहे आणि त्याचा आनंद वेगळा आहे. पण रोजच्या आयुष्यात जर तोच दृष्टीकोन डोकावत असेल तर अडचणी वाढतील असे वाटते.

मनिष

मनिष · Tue, 23 Nov 2010 - 20:25 · उत्तर

मी स्वतः डॉ. नाडकर्णी यांचा विद्यार्थी, शिवाय त्यांची जी मराठी पुस्तके प्रकशित झाली आहेत, ती सगळीच वाचलीत. त्यामुळे माझा परीचय हा 'भारावलेला' वाटू शकतो, आणि तो दोष मला निश्चितच मान्य आहे. पण मी सहसा आवडलेल्या गोष्टींविषयीच लिहितो आणि तेही "hell with objectivity!" ह्याच "गुण गाईन आवडी" आवेगाने. अर्थातच मी त्यांचा चाहता असलो तरी भक्त नाही. पण स्वतः नाडकर्णी ह्यांच्याविषयी 'कठीण प्रश्नांचं सुलभीकरण' असे वाचून सखेद आश्चर्य वाटले. शिवाय हा प्रतिसाद मेघना सारख्या वाचकाकडून आलाय, त्यामुळे सविस्तर उत्तर देतोय.

पहिले निखळ सकारात्मक दृष्टिकोनाबद्द्ल - शहाण्यांचा सायकीअ‍ॅट्रीस्ट बद्द्लच बोलायचे तर त्यात खूप ठिकाणी ते स्वतःच्या निराशेबद्द्ल/वेदनेबद्द्ल लिहितात. काही उदाहरण -

वैयक्तिक आयुष्यात मात्र कठोर आणि कटू निर्णयांची अंमलबजावणी करण्याची वेळ आली. वैवाहिक जीवनाची अखेर करण्यासाठी विभक्तीकरण करण्याचा निर्णय झाला. मनाने दूर झालेला मुलगा, पत्नी आता व्यवहारातूनही दूर होणार...मोडक्या संसाराची कात टाकणं, हा प्रकार सापाची कात टाकण्यासारखा सहज आणि नैसर्गिक थोडाच असतो? किती वेदना, अवहेलना, त्रागा, आरोप असतात 'सामोपचाराने' घटस्फोटाकडे येतांना! अनेक आर्थिक व्यवहार असतात. मुख्य म्हणजे भावनेने सुरू झालेलं नातं व्यवहाराच्या आर्थिक देवघेवीवर तोलताना अनुभवणं खूप वाईट असतं. अ‍ॅडव्होकेट मित्राबरोबर बसून 'म्युच्युअल कन्सेन्ट' च्या फॉर्मवर हात फिरवतांनाचा दिवस नेमका लग्नाचा वाढदिवस निघावा? (पान : ८२-८३)

मला तर ह्यात वेदनाच दिसतेय. अशी बरीच उदाहरणं आहेत, पण मलाच टंकायचा कंटाळा आहे. अर्थातच त्यातून बाहेर पडणे ही त्यांच्यात मुरलेल्या REBT ची करामत. ते फक्त psychology शिकवत आणि practice करत नाही, तर आचरणातही. आणि कदाचित म्हणूनच त्यांचे उपचार किंवा पुस्तके इतकी परिमाणकारक आहेत. खर तर REBT ही उपचार पद्धतीपेक्षाही जीवनपद्ध्तीच आहे, आणि नाडकर्णीच्या आचरणात आणि पुस्तकातही हे जाणवते.

Politically incorrect असण्यात काहिच हरकत नाही, किंवा जे लोकप्रिअ आहे ते आवडलेच पाहिजे असेही नाही. मला तर कित्येक वेळा तसे आवडतही नाही. पण 'गुड' (ऋषिकेश मुखर्जी) आणि 'गुडी-गुडी' (सुरज बडजात्या) ह्यात फरक करावा...तो असतोच. कधीकधी कडवटपणामुळे अस्सल, नैसर्गिक गोडवाही कृत्रिम 'ग्गोड-ग्गोड' स्वाद दिलेला वाटू शकतो, तेंव्हा मग कडवटचा उगम नक्की कशात आहे त्याचा विचार करावा!

ब्लॉगवर दिलेली माझी प्रतिक्रिया (अजून प्रकाशित केली नाही) जशीच्या-तशी इथे डकवतो -

अनिल अवचट किंवा डॉ. नाडकर्णी ही माणसे जी आयुष्य जगलीत, ते माहित असल्यास ’अति सुलभीकरण’ नाही वाटणार. त्यांना आलेल्या अडचणींचा तुलनेत विचार केला, तर उगाचच frustrated राहणाय आणि लहान-सहान समस्यांना 'it's not as simple as that' म्हणणा‌र्‍यांचा जास्त वीट येतो. उठसुठ ’निळसर छटा अपरिहार्य’ किंवा ’आहे मनोहर तरी...’ सारखे दु:ख कुरवाळणार्‍या किंबहुना आवळणार्‍या पुस्तकांचा कंटाळा नाही का येत? अतिशय दुर्धर आजाराने पोटचा मुलगा आजारी असतांना कोलमडणारी आणो आयुष्यभर ती दु:खे बाळगणारे ’दु:खी आत्मे’ असतातच की, पण हे असतांनाही खूप काही कर्तुत्व दाखवणारे ’अच्युत गोडबोले’ एखादेच! तेंव्हा त्यांच्या दृष्टीकोनात ’काय करता येईल’ हा भाग ’किती अवघड प्रॉप्ब्लेम्स आहेत माझे’ ह्या पेक्षा जास्त असणार नाही का?

शिवाय ह्या लिखाणाचा काय अर्थ काढायचा?

“अगं माझ्या बायो, जर ते इतकं सुंदर आहे तर एंजॉय कर आणि गप बस की. ट्विट करून जगापाशी बोंबलतेस याचा अर्थ आतूनच काहीतरी चुकलंय!”.

असे असेल तर अनुभव लिहायचे नाही का? अखाद्या तृप्त क्षणी एखाद्याला व्यक्त व्हावेसे वाटेल तर दुसर्‍या एखाद्य़ाला गप्प रेहावेसे वाटेल. तसेच एखाद्याला अडचणींच्या काळात सगळी तगमग, वात जिथे-तिथे उद्विग्नता व्यक्त कराविशी वाटेल, तर एखादा आपल्या कोशात जाईल, गप्प बसेल. पिंडे, पिंडे मतिर्भिन्न:, नाही का?

ह्यातील <<ट्विट करून जगापाशी बोंबलतेस याचा अर्थ आतूनच काहीतरी चुकलंय>> ह्या implicit assumption विषयी काय बोलावे? rather बोलावे तरी का?

प्रेडिक्टेबल हे ज्या condescending tone मधे म्हटलय त्यावरही काय बोलावे कळत नाही, तशीच predictability कविता महाजन, गौरी देशपांडे, शाळा-कोसला वाचणार्‍यांचीही असते!

’साला, आपल्या आजकालच्या आयुष्यात एवढे complications असतांना हे अवचट-नाडकर्णी असे फारच सोपे, ग्गोड-ग्गोड काय लिहितात? असे सोपे अस्त का सगळे! भंपक आहे सगळे!’ -- असे एक ’सरसकट’ अति-सुलभीकरन ह्या लेखात केले आगे, असे मला वाटते! शेवटचे तीन शब्द मह्त्वाचे आहेत, हे ’असेच आहे’ असा अट्टहास नाही, जो ह्या लेखात मला जाणवला.

- मनिष
(अवांतर - डॉ. आनंद नाडकर्णी यांचे "देवराईच्या सावलीत" हे देवराई ह्या चित्रपटावर लिहिलेले पुस्तक अवश्य वाचावे.)

मुक्तसुनीत

मुक्तसुनीत · Wed, 24 Nov 2010 - 03:49 · उत्तर

मनिष यांचा पोटतिडिकीने दिलेला प्रतिसाद जाणवला. माझ्या मते भुस्कुटेंनी दाखवलेल्या ब्लॉगच्या संदर्भात एक वेगळा धागा काढता येऊ शकेल. त्या ब्लॉगएंट्रीमधे घाऊक स्वरूपात मूर्तीभंजन केलेले आहेसे दिसते. या मूर्तीभंजनादरम्यान, "थ्रो आउट द बेबी वुइथ द बाथवॉटर" हा प्रकार तर झाला नाही ना ? याची छाननी करता येईल. "सुक्याबरोबर ओलेही जळायचेच" हा रेकलेस् दृष्टिकोन चूष म्हणून ठीक आहे परंतु कितपत श्रेयास्पद आहे ? या सार्‍या प्रश्नांबाबत जरूर बोलता येईल.

आरागॉर्न

आरागॉर्न · Wed, 24 Nov 2010 - 06:12 · उत्तर

प्रतिसाद आवडला. नाडकर्णी यांनी वेदना मांडली आहे याच्याशी सहमत आहे मात्र आरईबीटीमुळे त्यांच्या दृष्टीकोन नेहेमी सकारात्मक राहीला आहे असे वाटते.

पण 'गुड' (ऋषिकेश मुखर्जी) आणि 'गुडी-गुडी' (सुरज बडजात्या) ह्यात फरक करावा...तो असतोच.

अगदी. मला आधीचा प्रतिसाद लिहीताना ऋषीदा/आनंद आठवले होते पण इतक्या नेमक्या शब्दात विचार मांडता आले नव्हते.

तर उगाचच frustrated राहणाय आणि लहान-सहान समस्यांना 'it's not as simple as that' म्हणणा‌र्‍यांचा जास्त वीट येतो. उठसुठ ’निळसर छटा अपरिहार्य’ किंवा ’आहे मनोहर तरी...’ सारखे दु:ख कुरवाळणार्‍या किंबहुना आवळणार्‍या पुस्तकांचा कंटाळा नाही का येत?

१००% सहमत.

आरागॉर्न

आरागॉर्न · Tue, 23 Nov 2010 - 16:40

सुरेख परिचय. पुस्तक वाचण्याच्या यादीत टाकले आहे.

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Wed, 24 Nov 2010 - 07:22

मी साहित्यिक मूल्य शोधायला गेले हे बहुतेक चुकलेच.
बाकीच्या गोष्टींबद्दल वाद संभवत नाही. मला असे असे वाटले आणि तुम्हांला असे वाटले नाही किंवा उलटे.
खेरीज आपल्याला ऊठसूट सकारात्मक विचारांचा जास्त वीट येतो की ऊठसूट निळसर विचारांचा, तेही ज्यानेत्याने आपापले ठरवायचे असते. त्यात बरेवाईट, उच्चनीच कसे ठरवणार?
पुन्हा एकदा - मला असे असे वाटले आणि तुम्हांला असे वाटले नाही किंवा उलटे.

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Wed, 24 Nov 2010 - 08:37

हेही वाचनीय आहे. मला त्यातली रैनाची मते संपूर्ण पटली.
http://www.maayboli.com/node/21386

मनिष

मनिष · Wed, 24 Nov 2010 - 12:16 · उत्तर

मेघना, प्लीज अवचट ह्यांच्याविषयीच्या ब्लॉगपोस्ट साठी एक वेगळा धागा काढ ना, इथे ते अप्रस्तुत वाटतेय!

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे · Wed, 24 Nov 2010 - 13:42 · उत्तर

आरागॉर्ननी धागा काढलेला दिसतोय. पण इथली चर्चा तिकडे कशी हलवायची? ते मला वाटतं, अ‍ॅडमिनलाच करावं लागेल.