परीक्षण
विंदांचे काव्य
परीक्षण मजकूर
पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती:
विंदा करंदीकरांचा काव्य संग्रह. हे तुजला सांगू कसे सारख्या काव्यातून अगदी वैयक्तीक तर कधी ती जनता अमर आहे! सारख्या कवितेतून सामाजिक असणारे विंदांची कविता यात पाहायला मिळते. मला सर्वात आवडणारी कविता म्हणजे स्वप्नांमध्ये रचिल्या ओळी. शब्दांचे फक्त भारवाही असणे याची जाणीव करून देणारी ही कविता माझी आवडती आहे. विंदा शब्दांशी खेळतांना कधी यमकातून तर कधी मुक्तछंदातून फार काही अर्थगर्भ सांगून जातात. धोंड्या न्हावी सारख्या कवितेतले साधे शब्द असले तरी त्यातला भाव मनात एक एक पदर उलगडत जातो. जितका त्यांच्या काव्यावर विचार करावा तेव्हढे गहन अर्थवाही आहे असे मला वाटत जाते.
तर यातीलच यंत्रावतार ही विंदांची अत्यंत आवडती कविता माझी नावडती आहे.
आपला
गुंडोपंत
अभिप्राय
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 9 Jul 2010 - 09:08
वा! कवितासंग्रहाचे हे पुविवरचे पहिलेच लेखन असावे बहुतेक.
असो. अजून विस्ताराने आवडले असते..
पुविवर स्वागत
गुंडोपंत
गुंडोपंत · Fri, 9 Jul 2010 - 09:13 · उत्तर
हो पण मी जरा ते पुस्तक आधी यादीत घालणे आणि नंतर लेखन करणे या प्रक्रियांमध्ये गोंधळलो होतो. काय करतो आहे तेच कळेनासे झाले होते.
मग डोक्यातून जे लिहायचे होते तेही गेलेच. :(
असो, अजून लिहू.
यशोधरा
यशोधरा · Fri, 9 Jul 2010 - 13:05
अजून विस्ताराने लिहायला हवे होते... जमले तर भर घालण्याची विनंती.
गुंडोपंत
गुंडोपंत · Fri, 9 Jul 2010 - 13:12 · उत्तर
वेळ काढून, मला जमेल तसे नक्की लिहितो.
आनंदयात्री
आनंदयात्री · Sun, 11 Jul 2010 - 07:07
वरच्यांसारखेच म्हणतो. अजुन वाचायला आवडले असते. पुस्तकविश्ववर कवितासंग्रहाचा परिचय हा पहिलाच. अजुन लिहा, पुन्हा लिहा, नक्की आवडले.
>>शब्दांचे फक्त भारवाही असणे याची जाणीव करून देणारी ही कविता माझी आवडती आहे
फार सुंदर कल्पना आहे.
गुंडोपंत
गुंडोपंत · Mon, 12 Jul 2010 - 07:34 · उत्तर
अरे लिहायचे आहे, पण नेमके काय झाले की हे परिक्षण लिहितांना त्यावर (म्हणजे त्या पुस्तकावर! :) ) पाणी सांडले.त्यामुळे पाने चिकटली आहेत. आता ते वाळायची वाट पाहतो आहे.
ते पाणी वाळले की लिहितो, तोवर थांबा. :)
आपला
गुंडोपंत
यशोधरा
यशोधरा · Tue, 13 Jul 2010 - 21:04 · उत्तर
नक्की सांडलेय तरी असे कितीसे पाणी? की पुस्तकच सांडलेय पाण्यात? :)
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Wed, 14 Jul 2010 - 08:34
बाभ, विंदा आणि या मालेतील कवींवर लिहा.