माझे शेल्फ
अबीरमाती
नव्वदीनंतरचे जागतिक बदल - गावातील माणुसकीला आलेली मरणकळा - याचं वास्तव दर्शन 'अबीरमाती' या पुस्तकातील सकस कथांमधून नेटकेपणाने मांडलेले आहे.... शेती, माती, नाती, नीती, संस्कृती, अस्सल ग्रामीण जीवनाच्या जाणिवा .... पैसा, संस्कार, परिस्थिती यांचा भुलभुलैया .... कोणी अडकतो तर कोणी सुटतो .... आयुष्यभर कणाकणाने जीवन जाळत आलेल्या असंख्य ‘मीं’च्या भावभावनांच्या हळव्या कथा .... धनाच्या हव्यासापोटी सत् मार्ग हरवून गैर मार्गाला जात घरादाराला वेशीवर टांगणारी पिढी .... भावनांचे चढ-उतार .... स्वाभिमानापुढे पोटातील उसळलेल्या भुकेने दाखवलेले वास्तव .... आता प्रश्न हा की, हे सगळं शहरात होतंय का? तर नाही, शहराची व बदलाची हवा लागलेल्या गावागावात घडतंय... गावपण संपून शहरीकरणाकडे वाटचाल करणारं एक गाव, बारा बलुतेदारांचा वारसा लाभलेलं एक गाव .... आपलेपणा विसरून परकं होत जाताना ज्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं त्यांच्या भावविश्वाची कहाणी `अबीरमाती....!’