माझे शेल्फ
अभोगी
आयुष्यभर कितीही सुख मिळालं तरी भुकेला असतो, तो कलावंत. कारण खऱ्या कलावंताची सुखाची व्याख्या काहीतरी वेगळीच असते ना.. त्याच्यासाठी कलेतून मिळणारे दाम नाही तर कलेला मिळणारी दाद महत्त्वाची असते, तीच त्याची भूक असते. ती भूक जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत कलावंत जिवंत असतो. कलावंताचा जन्म तेवढा सोप्पा नव्हे, याची प्रचिती येते ती रणजित देसाईंच्या या कादंबरीतून... प्रेमात झुरण्यापेक्षा कलेसाठी झुरून मरणारे कलाकार पाहायला मिळतात ते या कादंबरीत... प्रत्येक कलावंताने वाचावी अशी कादंबरी.घराणं आणि आविष्कार जन्मतो गायकाच्या गळ्यातून! महत्त्वाचा असतो, तो सूर! आवाज! आणि त्या कलावंतांची फेक! एकाच घराण्याच्या दहा गायकांची गाणी ऐकली, तर नव्या माणसाला ते घराणं कळेल का? काहीतरी गोंधळ होतो. काही समजत नाही. सुरानं बद्ध झालेली. तीन सप्तकांच्या पलीकडे जाता येत नाही. वाटतं! त्या पलीकडे जावं. नवे सूर, नवे अंदाज गाठावेत. नवे राग जन्माला यावेत. पाठीमागच्या लोकांनी घोटण्यासाठी नव्हे. त्यांनी तसंच काहीतरी निर्माण करावं, म्हणून! ते नवं शोधायला नवे पंख हवेत. सुरवंट आपला कोश बांधतं. आणि नंतर त्यातून फुलपाखरू जन्मतं. या फुलपाखराचा जन्म कलावंताला लाभत नसला, तर त्या कलावंताच्या जीवनाला अर्थ काय? सगळं सुख भोगायला असूनही ‘अभोगी’ राहिलेल्या कलावंताची रणजित देसाईंनी रेखाटलेली भावपूर्ण कथा.