मुखपृष्ठ
Amazon

माझे शेल्फ

अॅमेझॉन

इंग्रजी शीर्षक
Amazon
सारांश

स्मार्टफोनवर केलेल्या एका क्लिकसरशी घरबसल्या हवी ती वस्तू खरेदी करता येऊ शकेल याचा आपण कधी स्वप्नात तरी विचार केला होता का? अर्थातच नाही… पण द्रष्ट्या जेफने हेच स्वप्न उराशी बाळगून १९९४ मध्ये ई कॉमर्स व्यवसायात पदार्पण केलं.

त्यावेळी वार्षिक २३०० टक्क्यांहून अधिक वेगानं वाढणारं इंटरनेट हेच जगाचं भविष्य असणार आहे हे अचूक ओळखणारी जेफ ही जेमतेम २५ वर्षांहून कमी कालावधीत पृथ्वीतलावरील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरली.

हवं तेव्हा Amazon च्या व्हर्चुअल ट्रॉलीत पाहिजे ती वस्तू टाकणाऱ्या जगाच्या कानाकोपऱ्यातील कुणाही व्यक्तीसाठी आता जेफ हे नाव अनोळखी नाही.

याच नावानं किंडल, Alexa अशा असंख्य नवीन शब्दांना जागतिक शब्दकोशात मानाचं स्थान मिळवून दिलं. आपल्या द्रष्ट्या कामगिरीने पृथ्वीवर राज्य करणारा जेफ सध्या ‘ब्लू ओरिजिन’ या आपल्या महत्त्वाकांक्षी कंपनीद्वारे अंतराळ पर्यटनाचं स्वप्न मानवी कवेत घेऊ पाहतोय. त्याशिवाय संपूर्ण मानवजातीसाठी अतिशय महत्त्वाच्या ठरू शकणाऱ्या कित्येक नवनवीन गोष्टींवर त्याचं सातत्यानं काम सुरू आहे.

Amazon च्या झंझावाती वाटचालीची कहाणी सांगणारं हे पुस्तक जेफ बेझोसच्या व्यक्तिमत्त्वाचे असे कित्येक पैलू सविस्तरपणे मांडतंच; पण त्याचबरोबर त्याच्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ग्राहकाकडे पाहण्याची नवी दृष्टीही प्रदान करतं.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
112
भाषा
मराठी
किंमत
104.00
ISBN
978-93-86118-95-0