माझे शेल्फ
अॅन आय फॉर अॅन आय
श्रीलंकेत जन्मलेल्या बंडुला चंद्ररत्ना यांनी सौदी अरेबिया आणि इंग्लंडमधील हॉस्पिटलमध्ये काम केले आहे. त्यांची पहिली कादंबरी ‘मिराज’ इंग्लंडमध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीतील कथानक ‘अॅन आय फॉर अॅन आय’ या कादंबरीत चालू राहते. मिराज कादंबरीच्या वेळी थोड्या कारणासाठी त्यांचे बुकर पुरस्काराच्या यादीत नाव येणे हुकले असले, तरी कमिटीतील अनेक परीक्षकांना या कादंबरीने भुरळ घातली. २०००मध्ये लंडनच्या एका मोठ्या प्रकाशकाने जेव्हा या पुस्तकाची पेपरबॅक स्वरूपातील आवृत्ती काढली, तेव्हा ती त्या वर्षीच्या समीक्षकांच्या दृष्टीने सर्वाेत्कृष्ट कादंबरी ठरली. सौदी अरेबिया येथील हॉस्पिटलमध्ये काही वर्षे काम करत असताना बंडूला चंद्ररत्ना यांनी पाहिलेले, अनुभवलेले आखाती देशातले जनजीवन तिथली राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, सामाजिक रूढी, चालीरीती हे अतिशय अस्सलपणे आणि अपरिहार्यपणे त्यांच्या लेखनात आलेले आहे. अनेक लोक आखाती देशात नोकरी धंद्यानिमित्त, पर्यटनासाठी जाऊन येतात. त्यांच्याकडून आपल्याला तिथल्या जीवनाबद्दलचे तुटक तुटक तपशील समजत असतात, पण तिथे राहून प्रत्यक्ष अनुभव घेऊन, नंतर त्याकडे अलिप्तपणे पाहून ते कादंबरी रूपात आपल्यापुढे आल्यामुळे, सर्व काही सुसंगत समजल्यासारखे वाटते. मुख्य कथा आहे सौदी अरेबियातील न्याय पध्दतीची व त्यामुळे होणा-या परिणामांची कोर्टाची सुनावणी होऊन लतीफाला व्यभिचारी ठरविण्यात आले. हुसैन हाशमीला रंगेहाथ पकडले होते. लतीफला जाहीरपणे दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा देण्यात आली होती. हुसैन हाशमीला शिरच्छेदाची शिक्षा ठोठवण्यात आली. त्यांची अंमलबजावणी होणार होती आणि ते पाहण्यासाठी अथांग जनसमूह लोटला होता. हुसैनने आपला मित्र सईदचा विश्वासघात केला होता. त्याचीच शिक्षा त्याला शिरच्छेदाच्या रूपाने मिळत होती. अब्दुल रेहमानच्या आजोबांच्या मते, हाशमी जमातच वाईट वर्तणुकीची कचराच ही जमात म्हणजे मूळ रक्तातच खराबी असलेली. लतीफाला दगडांनी ठेचून मारण्याच्या शिक्षेचाही अंमलबजावणी झाली आणि तिचा पती सर्वार्थाने कोसळून गेला. लतीफाच्या मुलीला लैलाला-सईदच्या दयाळू अंत:करणाचा मित्र, अब्दुल मुबारकने सांभाळले आहे. अलफौजींचा विश्वास आहे की चांगले हे नेहमीच वाईटावर विजय मिळवते. अब्दुल मुबारक त्यांना अरबांचे औदार्य आणि प्रेमळपण यांचे मूर्तिमंत आदर्श प्रतीक वाटतो. त्यांना वाटते आपले राज्यकर्ते जर त्यांच्यासारखे असते तर... पण ते सगळेच स्वार्थी आहेत. संपूर्ण अरब देशाला लागलेला कलंक आहेत ते. सईदचा बालपणीचा मित्र यासेर त्याला भेटतो आणि त्याच्या सांगण्यावरून सईदचे मन बायकोच्या वधाचा सूड घ्यायच्या कल्पनेने पेटून उठते.यासेरच्या मते, मानवी संस्कृतीच्या संपूर्ण इतिहासात घडला नसेल असा दुराचार आणि नीतिभ्रष्ट व्यवहार आपल्या इथे चालू आहे. व्यसनाधीन बादशहा आणि त्यांचे शेकडो नातेवाईक जनतेची संपत्ती लुबाडत आहेत. सगळीकडे झोपडपट्ट्या वाढत चालल्यात. मुतव्वा म्हणजे सरकारचे नोकर आहेत. आता तुझा न्याय तू स्वत:च मिळवला पाहिजेस. त्या झोपडपट्टीतल्या ज्या लोकांनी तुझ्या बायकोवर झालेल्या अन्यायाचा बदला घे. सईद, लक्षात ठेव. ‘अॅन आय फॉर अॅन आय’, असे ओरडत यासेरने तो खंजीर उंचावला. हवेत नाचवला आणि मग सईदच्या हातात दिला. विचारांच्या भोवNयात आवार्त घेणाऱ्या मनानेच सईदने खंजीरासह मुतव्वाच्या झोपडीकडे प्रयान केले. मुतव्वा वयस्कर चेहरा, पांढरी दाढी आणि लाल चौकड्यांचा गन्ना सईदला स्पष्ट दिसला. सईदने खंजिराचा हात वर उचलला आणि आता धावत जाऊन खंजीर खुपसणार, तोच पाठीमागून एक मुलगी धावत आली. त्याला घराकडे ओढू लागली. सईदने खंजीर म्यानात घालून खिशात ठेवला. पुढे गेल्यानंतर खंजिराच्या साहाय्याने खड्डा खणला. आणि खंजीर खड्ड्यात पुरून टाकला. घरी गेल्यावर मित्राला म्हणाला, ‘हो, आता मी आनंदात आहे.’ सौदी अरेबियातील अमानुष उपचार पध्दती, वेशभूषा, खान-पान चाली रीती या सर्वांचे दर्शन अनेक लहान मोठ्या प्रसंगातून कादंबरीत चित्रित झाले आहे. एक मोठा अॅल्युमिनियमचा थाळा, त्यात भाताचा मोठा ढीग आणि चिकन रस्सा होता. ते सगळेजण त्या एकाच थाळ्यातून सावकाश, शांतपणे जेवत होते, हे आज वाचतानासुध्दा विचित्र वाटते. लेखकाची साधी सोपी भाषा, कुठलेही अलंकार घालून न सजवता वाचकांपुढे येते. पण त्यातून अधोरेखित झालेले वास्तव अचंबित करते. विचार करायला भाग पाडते आणि वाटते हेच या कादंबरीचे बलस्थान आहे. याच कारणाने सुनंदा अमरापूरकर यांना या कादंबरीचा अनुवाद करण्यास प्रवृत्त केले आहे.
यावर अधिक संशोधन आपण पुढे चानू ठेवायला हवे. भविष्यकाळात अनेक रोगांवर उपाय करण्याचे सामर्थ्य त्यात आहे. बटलरची सहकारी कॅरोल म्हणते, ‘मला बटलरची जागा मिळाली तर मी त्यासाठी सर्व मदत करीन. एखाद्या वैद्यकीय तंत्राचे वा नव्या शोधाचे अमेरिकन शैलीतले संशोधन, त्याचे व्यापारी तत्वावरचे उत्पादन, त्याचे हॉस्पिटलमधील प्रात्यक्षिक यावर प्रकाश टाकणारी ही कथा थरारकथेच्या अंगाने विकसित करताना कसकशी नाट्यपूर्ण वळणे घेते याचा एक रोमांचकारक नमुनाच येथे पहायला मिळतो.