मुखपृष्ठ
अॅना आणि सयामचा राजा

माझे शेल्फ

अॅना आणि सयामचा राजा

इंग्रजी शीर्षक
Anna Ani Siamcha Raja
सारांश

ही मार्गारेट लॅन्डन यांची कादंबरी १९४४ साली प्रसिद्ध झाली आणि अल्पावधीत जगभरात तिच्या लक्षावधी प्रती विकल्या गेल्या. वीसपेक्षा अधिक भाषांमध्ये तिची भाषांतरे झाली. या कादंबरीचा मराठी अनुवाद ‘अॅना आणि सयामचा राजा’ या नावाने माणिक फाटक यांनी केला आहे व ेहता पब्लिशिंग हाऊसने तो प्रकाशित केला आहे. ही कादंबरी म्हणजे एका वेगळ्या काळातील आणि वेगळ्या जगाची अद्भुत सत्यकथा होय. १८६० साली अॅना लिऑनओवेन्स दरबारात गव्हर्नेस म्हणून गेली. राजाच्या अनेक राण्या आणि त्यांची सदुसष्ट मुले यांना शिकवणे, याशिवाय राजाचा इतर देशांशी चाललेला पत्रव्यवहार पाहणे, तसेच अनेक मोठ्या मेजवान्यांची तयारी करणे अशी अनेक कामे ती करत असे. अॅना पाश्चात्त्य संस्कृतीत वाढलेली, मानवतावादी मूल्ये जपणारी स्त्री. सयामसारख्या (आताचा थायलंड) बुरसटलेल्या, व्यक्तिास्वातंत्र्यावर गदा असलेल्या, रूढी-प्रथांना महत्त्व देणा-या गुलामांच्या देशात जुळवून घेणे तिला फार जड जाते. सुरुवातीची अनास्था, अनिश्चितता, नंतर कामाचे ओझे, अधूनमधून होणारे उद्रेक, महिनोनमहिने साचत जाणारी भीती आणि अनेक अगम्य विरोधकांशी सतत लढत राहणे फार थकवणारे होते. मात्र सुस्पष्ट विचार, तत्त्वनिष्ठ-निर्भय वागणं, उदार अंत:करण, शोषितांबद्दलची अपार करुणा, अन्यायाविरूद्ध उभे ठाकण्याची वृत्ती या गुणांच्या सहाय्यानं अॅनानं अनेकांच्या मनात आदाराचं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं स्थान मिळवलं.राजा व राजपुत्रही या गुणांमुळे प्रभावित झाले. सयाममध्ये स्त्रीवरील अन्याय अत्याचाराचं फार भयानक स्वरूप अॅनाला दिसलं... ते विद्रूप वास्तव ‘ला ओर’च्या रूपानं समोर आलं, तेव्हा न राहवून तिनं या क्रूरपणाला तोंड देत ती गुलामांसाठी ‘गोरी देवता’ ठरली. मात्र या घटनेचे त्याचवेळी तिच्यासाठी शाही घराण्यात अनेक शत्रू निर्माण झाले. राजाच्या अनेक राण्या, रखेली, राजकन्या, राजपुत्र, त्या सर्वांच्या गुलाम स्त्रिया या सर्वांच्याच हकिगत अजब आहेत. राजाच्या लहरीने कोणावर कधी कोणता प्रसंग ओढवेल, कोणाला कधी अत्यंत अमानुष क्रोर्याला सामोरे जावे लागेल याचा काही अंदाजच बांधता येत नाही. गुलाम आणि आश्रितांनी दरबारात कायम गुडघे आणि कोपर टेवूâन, डोवंâ खाली घालून बसायचं, तसंच सरपटत मागे पुढे करायचं हे सगळं फार विचित्र वाटतं. जेमतेम १६ वर्षांची, कोमल सुंदर तपतीम ही रखेल, तिच्यावर ओढवलेला अनवस्था प्रसंग, आपल्या चुकांबद्दल तिनं केलेलं अत्यंत स्पष्ट, विचारपूर्ण, ठाम आणि प्रांजल निवेदन आणि आपण पाप मात्र केलेलं नाही हे सत्य निग्रहानं मांडण्याचं तिचं धैर्य अचंबित करतं. राजवाड्यातलं अनेक प्रकारचं आणि अनेक स्तरांवरचं राजकारण, स्वत:चं काम चोख करत असतानाही अॅनावर ओढवलेले दुर्धर प्रसंग, हे सर्व तिच्या सहनशीलतेचा अंत पाहणारंच! पण चुला लाँग कोर्ण आणि इतर विद्यार्थी यांच्यात नवविचार रुजविण्यात तिला आलेलं यश आणि तिची विद्यार्थीनी असलेली राणी सोन क्लीन हिला, तिच्या सर्व गुलाम स्त्रिया, पुरुष, मुलं यांना मुक्त करण्याची तिच्या शिकवणुकीतून मिळालेली प्रेरणा हे फार समाधान देणारं! तिथून निघून जाताना अॅनाला सर्वांच्या प्रेमाचं आणि आदरभावनेचं जे दर्शन घडलं ते अभूतपूर्वच होतं. त्याने ती हेलावून गेली आणि राजाने स्वत: तिच्याबद्दल भावना बोलून दाखवल्या, तेव्हा तिचे डोळे भरून आले. त्यांचे संबंध मालक-नोकर असे नव्हते, तर सर्व मतभेदांपलिकडे जाऊन एका मित्रत्वाचं नातं जुळलं होतं. पुढे राजपुत्र चुला लाँग कोर्ण, राजा म्हणून नियुक्त झाल्यावर राज्यात अनेक बदल केले. हळूहळू सयाममधील वेठबिगारी आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टींचे पूर्णपणे उच्चाटन केले. हे अॅनाच्या प्रयासांचे, कष्टाचे फळ होते. ही कादंबरी वाचणे हा निश्चितच एक विलक्षण अनुभव आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद