माझे शेल्फ
आगे बढो
गणितात प्रावीण्य मिळवायचे व हार्वर्डची पदवी मिळवायची असे ध्येय लहान असतानाच ठरवलेल्या एका मुलाला काही कारणांनी एका जहाजावर साधा हिशेबतपासणीस म्हणून काम करावे लागते. जहाजावरच्या या प्रवासाला तो त्याच्याकडे असलेल्या अल्पज्ञानाच्या जोरावर खलाशांना अनेक गोष्टी शिकवतो व स्वत:ही शिकतो. अनुभवाच्या जोरावर ज्ञानाचे भांडार वाढवत जातो. अखेर नौकानयनशास्त्रात इतका प्रवीण होतो, की त्यात तो आपल्या अनुभवी ज्ञानाने नवी भर टाकतो. त्याला मान्यता मिळते व हार्वर्डची पदवी अगदी चालत त्याच्याकडे येते. स्वप्नपूर्तीचा हा आनंद प्रेरणादायी असाच आहे. तेंडुलकरांच्या ऐन उमेदीतील हे अनुवाद आहे, मात्र कुठेही त्यात करून टाकू असे म्हणत उरकले असल्याचे जाणवत नाही. मेहतांनी पुस्तके जुनी असूनही दिमाखात काढली आहेत. मूळ अमेरिकन लेखक व तेंडुलकार यांचा छायाचित्रांसहित परिचय वाचकांची उत्सुकता शमवतो. मूळ लेखक जुन्या पिढीतील आहेत. त्यांच्या लेखनावर जुन्या अमेरिकेची छाप आहे. ती अनुवादातही डोकावते, मात्र रसभंग करत नाही तर रस निर्माण करते. अनुवाद आवडणारा एक स्वतंत्र असा वाचकवर्ग आहे मराठीत. त्यांच्यासाठी ही एक भेटच आहे.
आदिलशहाने दिलावरखानाला वजिरी देण्याचे मधाचे बोट लावून त्याला भेटीला बोलावले. भविष्याची मोठी स्वप्ने पाहात विजापुरला दिलावरखान आला. शहाने प्रथम त्याचे डोळे काढले आणि तुरुंगात पेटवून दिले. आदिलशहाने दिलावरखानाला वजिरी देण्याचे मधाचे बोट लावून त्याला भेटीला बोलावले. भविष्याची मोठी स्वप्ने पाहात विजापुरला दिलावरखान आला. शहाने प्रथम त्याचे डोळे काढले आणि तुरुंगात पेâवूâन दिले. आदिलशहाने चिडून नगरकडे फौजा वळवा, यावर तह करताना निजामशहांना नवीन बांधलेला किल्ला पाडण्याची अट आदिलशहाने घातली. शाहजादा मुराद दक्षिणेत चार वर्षे निजामशाही बुडवण्यासाठी मुक्काम ठोकून राहिला. तो अयशस्वी झाला. चांदबिबीने बालराजाच्या नावाने उत्तम कारभार केला. पण अंतर्गत बंडाळी व असहकार यामुळे ती अयशस्वी ठरली. पुढे तर तिची हत्या झाली. या सगळ्यांमुळे आणि त्यात सतत दोन वर्षे दुष्काळ पडल्याचे केवळ जगण्यासाठी वीस हजार माणसे विजापूरला गेली. मालोजीराजे हताश झाले. ते अतिशय दयावत्सल होते. श्री गोंद्याजवळ वाड्यासाठी पाया खोदताना त्यांना गुप्तधनाचे हंडे मिळाले. या धनातून त्यांनी घृष्णेश्वर मंदिराचे नूतनीकरण केले. सूफी साधू शेख महंमद बाबांना मठ बांधून दिला. शिखर शिंगणापूर इथे तळे बांधले. ओसाड गावे पुन्हा नांदती केली. शेतीला उत्तेजन दिले. डॉ. प्रमिला जरग यांनी ऐतिहासिक ढंगाची भाषा निवेदनात वापरली आहे. करीणा, बितपशील, सुक्रांना नमाज, निहाल होणे, सुलतानढवा, तजुबी, गौर, बगावत, सर्पâराजी, शुक्रगुजार, फिकरमं, हिफाजत, वल्द, रिश्ता, पैगाम, फरमानवाडी, खद्याल, तरक्की, अमन, इत्तेफाक असे उर्दू अरबी फारसी शब्द लोकांच्या तोंडी रूळून गेले होते. शिया, सुनी, मेहदवी यांच्यात वैर धुमसायचे. खंडेनवमी, नवरात्र, दसरा असे सण साजरे होत. फराह, बाग, ई रहुजा हाश्त बहिश्त या बागा नगरमध्ये होत्या. भिंगार खेड्याजवळ कुत्रे कोल्ह्यांचा पाठलाग करीत असता चिडलेल्या कोल्ह्याने कुत्र्यांवर चाल केलेली शहाने पाहिली तेव्हा ही जागा शकुनाची समजूत भिंगारला अहमदनगर वसवले. प्रसिद्ध मुलुख मैदान तोफ रुमीखानने घडवली. कोल्हापूरला तेव्हा २१ तळी होती. युवराज मुराद विजयी झाला तर दिल्लीला त्याचे वजन वाढेल म्हणून त्याचे सरदार वेढा अंगचोरपणे लढतात, अशी आवश्यक माहिती लेखिका देते. डॉक्टर, प्रमिला जरग पंधराव्या आणि सोळाव्या शतकाचे शब्दचित्र काढतात. या कादंबरीतला लेखिकेने कन्सिव्ह केलेला तिला स्पुâरलेला एक प्रसंग मला कळसाध्याय वाटतो. मालोजीराजे यांचे लग्न दीपाशी झाले तेव्हा ती केवळ आठ वर्षाची होती. वेरूळला सासरी आली होती. आजेसासूबाई पुजेला बसल्या होत्या आणि ही उमा पूर्वेकडून भिंतीवर पडणारे, नाचणारे तेजाचे पट्टे हातात धरू पाहात होती. तिचा पती मालोजी, त्याचे आजोबा मालकर्ण जुझात लढता लढता मारले गेले तेव्हा मालोजीचे वडील बाबाजी केवळ तीन वर्षांचे होते. उभा जन्म वैधव्यात करपलेल्या, कर्तव्यकठोर आऊसाहेब मुठीत सूर्याचे तेज पकडू पाहाणार्या नातसुनेला म्हणतात, मुली, आपल्या हातातून तेज निसटते. ते मुठीत पकडता येत नाही. त्या तेजाला प्रपंचात जखडून ठेवता येत नाही...’ आणि पुढे तेच घडते. जुझात मालोजी मारला जातो. उमाच्या मुठीतून तेज निसटते. सरलष्कर उर्फ सर गु-हो ही शाही, अति दुर्मिळ किताबत निजामशहाकडून मिळवलेले मालोजी राजे शहाजी व शरीफजी या बालकांना आणि उमेला पकडून ठेवता आले नाहीत. मला हा प्रसंग स्वामीच्या शेवटी रमा सती जाते. या प्रसंगाच्या व त्यातील शेवटच्या वाक्याच्या उंचीचा वाटतो. मेहता पब्लिशिंगने राजहंसच्या द्रोहपर्व नंतर लगेचच एक उत्तम ऐतिहासिक कादंबरी पेश केलीय.