माझे शेल्फ

अज्ञात

इंग्रजी शीर्षक
Adnyat
सारांश

अज्ञात..... एक विस्तृत परीघ ..... डॉ. छाया महाजन ह्यांचा नवा कथासंग्रह वाचनात आला. वाचक कितीही सर्वश्रुत असला, सर्वज्ञानी मानला, तरीही मानवी मनाचे अनेक कंगोरे/विषय त्याला अज्ञातच राहतात. असं का व्हावं ह्या प्रश्नाला त्याच्याकडे उत्तर नसतं अशया अनेक जाणिवांना, विषयांना स्पर्श करणाऱ्या कथा, ह्या कथा संग्रहात आहेत. काही कथांचे विषय जरी पूर्वी इतर लेखकांच्या कथांमधून वाचनात आलेले असले तरी लेखिकेचा असा स्वतःचा दृष्टीकोन, त्या कथांना स्पेशल करून टाकतो. सावलीचा दाह कथेतील वृद्ध आईच्या वाट्याला सून-मुलांकडून येणारी त्रयस्थ-तिरस्कृत वागणूक अनेकदा कथांमध्ये येऊन गेली असली तरी छायाताईंनी, मुलानं विचारलेल्या परतफेडीला एनी लिमिट? ह्या प्रश्नावर काढलेला तोडगा , वेगळा व स्पेशल आहे. प्रत्येकाचा भोग व प्रारब्ध वेगळं, जे ज्याचं त्यालाच भोगू द्यावं - हे गुरूंनी सांगितलेलं वाचन तिला संसाराच्या मायेतून अचानकपणे मोकळं करतं, मुक्त करतं ती कुठेहि जायला राहायला तयार होते. निचरा मधील देवदासींच्या मुलगी मोठी कलावंत होते, पण आपल्या भूतकाळापासून तिला फारकत घेता येत नाही. भूतकाळाची लाज वाटू द्यायची नाही गोष्टी सोप्या होतात, हा उपाय कथेतील रामबाण ठरवत. उत्कृष्ट उतरलीये ती वेदना चिरेबंदी घरातल्या विधवा सुनेचा उपभोग , घरातल्याच जेष्टांनी घेणं, ह्या एकेकाळच्या परिस्थितीवर खूप लिखाणं झालं. पण छायाताईंनी त्या कथेत रंगवलेलं दुर्दैवं व वेदना, सबंध कथाभर वाचकांच्या मनाच्या चिंध्या करत राहत. अज्ञात कथेतला भविष्य सांगणारा पोपट पत्र आलंय मधला परदेशातल्या मुलाचं येऊ नका म्हणणारं पत्र लपवणार बाप सूरास्त मधील शेजाऱ्याच्या लहानग्या नोकराचे नातवांप्रमाणे लाड करणारा वृद्ध अस्मिता मधील कामाच्या बदल्यात उपभोग घेऊ इच्छिणाऱ्या पीचडी च्या गाईडचं गलिच्छ वास्तव , ( त्या विरुद्ध तडफेने उभी राहिलेली विद्याथीनी ) , प्रतीक्षा मधील नोकरी करणारी त्यामुळे मुलाच्या अपेक्षेनुसार पारंपरिक कर्तव्य पार न पाडणारी आई मोकळं आकाश मध्ये सरकारं गुंड घालून मारपीट करून जमीन काढून घेतलेला हतभागी शिवाप्पा व सगळ्यात शेवटी वास्तव घटनेवर बेतलेली कुष्ठरोग्यांवरची कथा वास्तव लेखिकेचे सूक्ष्म निरीक्षण शक्तीतर जाणवतेच पण स्वतःला पटतील असे निष्कर्षही त्या काढतात. ते सर्व वाचकांना पटतील , भावतील अशीही काळजी घेतात. प्रवाही भाषेत लिहिलेला , स्वतःबरोबर घेऊन जाणारा हा मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशित संग्र्ह वाचून लॉकडाऊनच्या काळात आलेली मरगळ एका झटक्यात दूर झाली. म्हणून वाचकांकरता हे छोटस परीक्षण डॉ. छाया महाजन ह्यांची विद्वत्ता नाव ख्याती लेखन, सर्वच समृद्ध आहे प्राचार्य म्हणून जरी त्या रिटायर झालेल्या असल्या तरी सर्वदूर ऑनलाईन कार्यक्रम करण्यातील त्यांची तडफ जाणवण्यासारखी आहे. दरवर्षी अनेक दिवाळी अंकातून त्या वाचकांच्या भेटीला यायच्याच . आता ह्या वर्षी दिवाळी अंक कोणत्या स्वरूपात निघताहेत व त्यातून त्या आपल्या भेटीला काय आणताहेत हे बघायचं.

ज्याने संगच केला नाही, ते फक्त प्रेम असा नकुल पितृत्त्व स्वीकारतो. शारीरिक गरजांवर शाश्वत प्रेमभावना (इथे प्लेटो आठवतो प्लेटॉनिक लव्ह ही संज्ञा आठवते) मात करून जाते. या प्रवाशांबरोबर वाचकदेखील एका उंच कड्यावर जाऊन मोकळा श्वास घेतो शुद्ध हवेत! आपल्या अवतीभवतीच्या शकडो, हजारो, लाखो माणसांचं प्रतिनिधित्व करणारे हे पाच प्रवासी एकेका चक्रव्यूहातून आपली अलवार सुटका करीत जातात. अभिमन्यू ते की आपण हेही कळत नाही. तशी प्रत्येक माणसाची विचार करण्याची पद्धत एक असते. पण कुवत मात्र सारखी नसते. त्या त्या वेळच्या भावना आपल्या कृतीला वेगवेगळ्या दिशा देतात. हा नव्या दिशेचा शोध आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. जाणीवा जागवणारा, चैतन्य फुलविणारा. कारण वेगवेगळ्या कारणाने आपल्या शरीरावर, विचारांवर, प्रतिभेवर चेतनेवर राख पसरत जातो. त्यामुळे आतली उष्णतेची धग असूनही नसल्यासारखी वाटते. अभिमन्यू ही राख बाजूला सारण्याचे, फुंकर मारून निखारे पेटविण्याचे काम करतो. जंगलात अस्वल मारल्यावर ध्यानात येतं तर गर्भार, पोटुशी अस्वलीण होती. इथे धरिणीतलं ममत्व पाझरतं. धारिणी धरिणी होते. तिच्या मातृत्वाचा नैसर्गिक पान्हा पाझरतो. मोठ्या कष्टानं अस्वलिणीच्या पिलाचा जन्म होतो. आई शेवटी एकच असते. प्राण्यातली, पक्ष्यातली, माणसातली! मातृत्व हे फक्त शरीराशी संबंधित नसतं. ते मनाशी, अंतरंगाशी संबंधित असतं. संग, गर्भधारणा, पालनपोषण, जीवन अन् शेवटी मरण या नैसर्गिक पायर्या.. हा एकसंध प्रवास जे निसर्गात, जे चार पायांच्या प्राण्यांत तेच माणसांत पायांच्या संख्येने काही फरक पडत नाही. माणूस हा सारखा काही तरी मिळविण्यासाठी धडपडतो. कीर्ती हवी असते. नाव हवंच असतं. इथे मला अकारण अण्णा हजारे, मेधा पाटकर अन् केजरीवाल यांची आठवण झाली. सार्यांचे उद्देश चांगले. पण कीर्तीच्या हव्यासापोटी, नावाच्या प्रसिद्धीच्या मोहापायी चांगल्याचं वांगलं होतं. काही मिळवलं की काय मिळवायचं राहिले ते कळतं. मग ते उरलं सुरलं मिळविण्यासाठी वेगळी धडपड. वेगळी पडझड धडपडीपोटी पडझड आलीच. संन्याशाचं विवेचन उत्तम. आपल्यातल्या प्रत्येकाला दृष्टी असते; पण दृष्टिकोन नसतो. शब्दांच्या या अवघड वाटा लेखिकेनं सहजरित्या ओलांडल्या. पार केल्या. हे एक शिवधनुष्य म्हणायला हवं. प्रामाणिकपणे सांगायचं तर हे वाचताना मला का कुणास ठाऊक ग्रेसची कविता वाचत असल्यासारखं वाटलं. गूढ अनाकलनीय तरीही मोहून टाकणारं, आनंद देणारं वाचनाचं समाधान देणारं. सत्य दाहक असतं. हादरविणारं असतं. हे सारं वाचताना मनाची पूर्वतयारी हवी. म्हणजे हादरे कमी बसतील. उलट आकाशपाळण्यात उंच उंच झुलण्याचं समाधान लाभेल. रेखा बैजल यांच्या परिपक्व प्रतिभेची साक्ष देणारी ही कादंबरी. अज्ञेय प्रत्येकाने वाचावी अशीच आहे. पण हे वाचण्यासाठी पेशन्स मात्र हवेत. सर्वांगसुंदर लेखनासाठी, प्रकाशनासाठी लेखिकेचे, प्रकाशकांचे मनःपूर्वक अभिनंदन.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी