मुखपृष्ठ
आकाश बदलताना

माझे शेल्फ

आकाश बदलताना

इंग्रजी शीर्षक
Aakash Badaltana
सारांश

लंडन शहरात राहणाऱ्या एका तरुण जोडप्याची ही कहाणी. मूल होण्यासाठी चाललेली त्यांची धडपड आणि त्यामागची मानसिकता याचं सखोल वर्णन उज्ज्वला गोखले यांनी ‘आकाश बदलताना’मध्ये केल आहे. झोई जेनी या लेखिकेच्या ‘द स्काय इज चेंजिंग’ ही मूळ कादंबरी आहे. क्लेअर आणिअँथनी यांची ही गोष्ट. क्लेअर जर्मनीमध्ये वाढलेली तरुणी. उत्कृष्ट बॅले नर्तिका असते. करियर करण्यासाठी ती लंडनमध्ये आली असताना एका अपघातामुळे तिचं नृत्य मागे पडलेलं आहे. ती सध्या ‘स्वीमिंग इन्स्ट्रक्टर’ म्हणून काम करतेय. अँथनीही एका चांगल्या फर्ममध्ये काम करतोय. शहरातल्या मध्यवस्तीत ते राहताहेत. त्यांना एकच दु:ख आहे ते म्हणजे मूल नसणं. ते होण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे. अशी सरळ, साधी सोप्पी कथा. लेखिका झोई जेनी हिने या कथेमध्ये विशेष: क्लेअरची मानसिकता विस्तृतपणे मांडली आहे. क्लेअरचे तिच्या कुटुंबाशी, बहीण अॅनशी असलेले संबंध आणि बहिणीला मूल झाल्यानंतर नकळत केलेली तुलना आहे. आई-वडिलांच्या प्रश्नांना म्हणजे मूल होण्यासंबंधी असलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायला नको म्हणून त्यांच्याशी जेवढ्यास तेवढे ठेवलेले संबंध, मित्र-मैत्रिणींशी असलेले नाते आणि त्याचा प्रत्येक वेळी मूल नसणं याच्याशी लावलेला संबंध याचं सखोल वर्णन लेखिकेनं केल आहे. त्यात अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जोड आहे. त्याचप्रमाणे क्लेअरचं तिची लहानगी विद्यार्थिनी नोरा हिच्याशी जुळलेले भावबंध यांचंही वर्णन आहे. एकंदरच मूल नसणं आणि त्यासाठी आस लावून बसणं, त्यामागची तगमग ही सगळीकडे सारखीच आहे, असं हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहतं.आपल्या अतिरेकी जखमांवर फुंकर घालणारे एक अशांत शहर व आर्थिक, सामाजिक व मानसिक तणावांनी ग्रासलेली एक विवाहिता ह्यांचे दहशतवादाच्या पाश्र्वभूमीवरील मनोवेधक चित्रण.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2013
पृष्ठसंख्या
152
भाषा
मराठी
किंमत
160.00
ISBN
9788184984439
समुदायाने जोडले
बंद