माझे शेल्फ

अकूपार

इंग्रजी शीर्षक
Akoopar
सारांश

गुजरात मधील घनदाट अरण्यात एक रेल्वे स्टेशन होते. आता आजूबाजूचा परिसर, घनदाट अरण्याने वेढलेला असल्यावर आपण कल्पना करु शकतो कि, त्या स्टेशनवर जास्त गर्दि कधीच नसणार. नव्हतीही..! स्टेशनवरच कशाला, तर ज्या गावात स्टेशन आहे, तो भागही दुर्गम व विरळ वस्तीचा.दिवसभरात मोजून पंधरा-वीस माणसाचं दर्शन व्हायचा, ऐवढा निर्मनुष्य. दिवसातून एक रेल्वेगाडी यायची व तीच परत जायची. अशाच एका छोट्याशा रेल्वेस्टेशनला एक केरळचा मनुष्य स्टेशनमास्तर ह्या पोस्टवर येतो. साहजिकच सर्वात मोठी अडचण होते ते भाषेची..! एक तर त्याला मल्याळम व इंग्रजीसोडुन काही येत नव्हत, अन त्या गावातल्या आदिवासीला गुजरातीही नीट येत नव्हती. ते त्यांच्याच स्वत:च्या भाषेत बोलायचे. मग ह्या दोघांत संभाषण कसं होणार...? शिवाय, साप विंचवासोबत खेळणारे आदिवासी लेकर ह्या सुटाबोटातील माणसाला पाहीले कि पळून जायचे. ते रेल्वे स्टेशन होत सिंहासाठी आजही प्रसिद्ध असलेल्या गिर अभयारण्यात. मध्यवर्ती भागात.!! ह्या एकांतवासात जीवन कसं जगायच..? ह्यावर त्याने एक उपाय काढला. तो जास्तीत जास्त प्राण्यां सोबत मैत्री करु लागला. प्राण्यांच्या आवडी निवडी जाणू लागला. त्यांच्यासाठी त्याने स्टेशनवरच एक पाणवठा तयार केला. अक्षरक्ष: चित्ता देखील त्याचा मित्र झाला. अरण्याला खेटुन असणाऱ्या समुद्रात एका विशिॆष्ट मोसमात परदेशातून ,लांबून मासे येत असत. ईथे ते फक्त प्रजनन करण्यासाठी यायचे. स्थानिक मासेमारी करणारे ते मासे पकडुन जास्तीत जास्त उत्पन्न करत असत. परंतु त्या माश्याचा नैसर्गिक पर्यावरणावर, समु्द्री जीवनावर कसा वाईट परिणाम होतो ह्याची त्या मच्छमाऱ्याच्या प्रमुख असलेल्या स्त्रिला कळत, तेव्हा " ते मासे म्हणजे बाळांतपणासाठी माहेरी आलेली माहेरवाशीण असते. अशा माहेरवासीणीला मारुन आपण दोन जीवाचा बळी घेत आहोत." अस म्हणून ती इतरांना समजावून सांगते. तेव्हा ते आपल्या मोठ्या उत्पन्नावर पाणी सोडतात. रोज दोन वेळेस येणाऱ्या रेल्वेमुळे आपल पंगु पोरगं चालायला लागल, म्हणून रेल्वेच्या इंजिनालाच देव मानून त्याची मनोभावे पूजा करणाऱ्या आदिवासी बाया... विदेशातून आलेल्या अभ्यासु पर्यटकासोबत फिरताना स्थानिक गाईडचं वागण, वेळप्रसंगी जीवही धोक्यात घालण... गिरमध्ये सिंहाबरोबरच, सिंह ज्या प्राण्यावर जीवन जगतो ते प्राणी जगले पाहीजे. त्यासाठी मर्यादित क्षेत्राच्या पलिकडे कोणीही आपली म्हैस, गाय चरायला न्यायची नाही. तिकडील कुरण हे जंगली हरिण, निलगाय ह्यासाठी राखीव ठेवणारे आदिवासी..स्थानिक राजाकडुन गिरला काही त्रास होऊ नये, त्यांनी काही हस्तक्षेप करु नये म्हणून, दोन टेकड्यांच लग्न देखील लावतात. हि कथाही वाचनीय आहे. गिरच जंगल हे स्वत:मध्येच एक अद्भूत जीवन आहे. त्याला त्याची वेगळी भाषा, संस्कृती आहे.. गिरच्या जंगलात राहणारे आदिवासी, त्यांची जंगलाकडे पाहण्याची नजर, सिंहाबद्दल प्रेम, आपुलकी, निसर्गाबद्दलच ज्ञान , ह्या सर्वाबद्दल श्री धुव्र भट्ट ह्यांनी आपल्या "अकुपार" ह्या कांदबरीमध्ये वर्णन केल आहे. अस वाचनीय पुस्तक "अकुपार" पर्यावरण, मनुष्य आणि इतर प्राणी ह्यांच्यामधील संबध ह्यांच्यासंबधी विचार करायला लावणारी एक गुढकथा...!! ज्यात, आपल्याला कथानायक कथा सांगत असतो. पण शेवटपर्यंत त्यांच नाव आपल्याला कळत नाही. दुसरी महत्वाची लेखकाबद्दल गोष्ट म्हणजे, हे लेखक कथा जरी काल्पनिक लिहीत असले तरी त्यांच्या कथेमध्ये वर्णन केलेल्या भागात ते वर्षानुवर्ष राहतात. त्याचा अभ्यास करुनच लिहतात. त्यामुळे कथेमध्ये वास्तवतेच दर्शन वाचकाला होत असत.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी