माझे शेल्फ

आलो-आँधारी

इंग्रजी शीर्षक
Alo-andhari
सारांश

अवघ्या १३व्या वर्षी आई झालेली एक मुलगी नवऱ्याच्या छळाला कंटाळून घर सोडते काय...,मोलकरीण म्हणून काम करते काय ...,तिथं पुस्तकांचा सहवास लाभून ‘बेस्ट सेलर ‘ आत्मचरित्र लिहते काय आणि लेखिका बनते काय , सगळंच अतर्क्य ! पण हे प्रत्यक्षात घडले आहे ,आताच्य नामवंत लेखिका बेबी हालदार यांच्या बाबतीत. काश्मीरमध्ये जन्मलेल्या बेबी यांचे जीवन जितके संघर्षमय ,तितकेच प्रेरणादायी आहे वयाच्या चौथ्या वर्षी आई घर सोडून निघून गेली. वडील आणि सावत्र आई यांचा जाच सहन करत बेबी यांचे बालपण गेले . आर्थिक अडचणीमुळे बेबी यांना इयत्ता सहावीत शाळा सोडावी लागली. दुप्पट वयाचा माणसाशी त्यांचे लग्न लावून देण्यात आले .तेराव्या वर्षी त्यांच्या पदरात पहिले मूल होते आणि काही वर्षांतच आणखी दोन मुलांना जन्म दिला . नवराच्या जाचाला कंटाळून एके दिवशी २५ वर्षांची बेबी तीन मुलांसह घराबाहेर पडली . घराबाहेर पडल्यानंतर बेबी यांनी मोलकरीण म्हणून काम स्वीकारले . मुन्शी प्रेमचंद यांचे नातू प्रबोध कुमार यांचाकडे त्या काम करू लागल्या . त्यांनी बेबी यांची पुस्तकांविषयी असणारी आवड हेरली . एके दिवशी त्यांनी बेबी यांच्या हातात तस्लीमा नसरीन यांचे ‘आमार मायेबेला’ हे पुस्तक दिले आणि वही-पेन देत तिलाही लिहण्यास प्रवृत्त केले . इतक्या वर्षं सहन केलेल्या घुसमटीला त्यांनी पानांवर वाट करून दिली आणि त्यांच्या ‘आलो अंधारी’ आत्मचरित्राचा जन्म झाला . प्रबोध कुमार यांनी बेबी यांनी लिहलेल्या लिखाणात थोडया –फार सुधारणा सुचवल्या . त्यानंतर पुस्तक प्रकाशनासाठी धडपड सुरु केली . प्रकाशनानंतर अवघ्या काही महिन्यांतच हे पुस्तक बेस्ट सेलर ठरलं . १२ भारतीय आणि १३ जागतिक भाषांमध्ये ‘आलो अंधारि’ चा अनुवाद करण्यात आला .

आपण पाप करीत आहोत असे मला वाटत नाही. ‘आपल्या देहाचा वापर होऊन दुसऱ्याचा प्राण वाचणार असेल तर त्याला मी आनंदाने तयार होईन...’ सत्तर दिवसांनी या प्रवाशांकडे बाह्य जगाचे लक्ष जाते. त्यांची सुटका होते... १२ डिसेंबरला तिघेजण सांतियागोला पोहोचतात. २० डिसेंबरला उर्वरित चौदा जणांना घेण्यासाठी हवाईदलाचे विमान येते. सांतियागोला ते पोहोचते. दहा आठवडे केवळ बर्फावर हे तरूण जिवंत राहणे शक्य नाही हे तेथील डॉक्टरांचे मत... ते चौकशी करतात, ‘शेवटी तुम्ही काय खाल्ले?’ इन्शियाटें उत्तर देतो, ‘माणसाचे मांस.’ एक फारदर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मुलाखती टेप करतात. एका दैवी चमत्काराचे प्रतीक म्हणून त्यांचे कौतुक होते. वृत्तपत्रात याबद्दलच्या बातम्या झळकतात. जगभर टीव्ही-रेडिओद्वारे त्या जातात. उरुग्वेमध्ये मात्र या बातम्या कोणी छापत नाही. पत्रकार परिषदेत एक निवेदन देण्यात येते. ‘उंच बर्फाच्छादित शिखरांवर भव्यदिव्य सृष्टीच्या सान्निध्यात असताना आपण एकाकी आहोत याची जाणीव होते... आपण आणि परमेश्वर असे दोघेच आहोत असे वाटते. आपण परमेश्वराच्या जवळ आहोत, तो आपल्या प्रत्येकात आहे अशी जाणीव होते... जे घडणार आहे, जे घडते ते परमेश्वराच्या इच्छेनुसार... आमच्याकडे खाण्यासाठी काही उरले नाही तेव्हा आम्हाला येशूचे स्मरण झाले. येशूने आपले मांस आणि रक्त लोकांना दिले तसे आपण का करू नये असे वाटले. त्या दृष्टांतामुळेच आज आम्ही आपल्यापुढे दिसत आहोत... त्याबद्दल काही विचारवंताना आमच्या या भावनांची आपण कदर करावी एवढीच प्रार्थना आहे.’ त्या ४५ प्रवाशांपैकी फक्त १६ जण उरले होते. जिवंत परतले होते. अर्तुरो नोगिराचे वडील वृत्तपत्रांना पत्र पाठवतात. ‘या सोळा वीर मुलांचे कौतुक करतो. त्यांनी दाखवलेली एकजूट, श्रद्धा, धारिष्ट्य यासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी अपघातानंतर आपल्या सहकाऱ्यांच्या केलेल्या सेवेसाठी प्रत्येकाने त्यांच्यापासून धडा घ्यायला हवा. आपला अहंपणा, आपली स्वार्थी आणि संकुचित विचारसरणी बदलायला हवी.’ ‘अलाइव्ह’द्वारे एक विलक्षण अनुभवमालिका आपल्यापुढे उभी राहते.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी