मुखपृष्ठ
अमेरिकी राष्ट्रपती

माझे शेल्फ

अमेरिकी राष्ट्रपती

इंग्रजी शीर्षक
Ameriki Rashtrapati
सारांश

अमेरिका हा जगातला सर्वांत शक्तिशाली देश! या देशाचा सर्वांत शक्तिशाली नागरिक म्हणजे या देशाचा अध्यक्ष! अमेरिकेच्या अध्यक्षांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा परिणाम हा सर्व जगावर होत असतो. याकारणे अमेरिकेचा अध्यक्षांचा प्रत्येक बारीकसारीक कृतीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून असते. जॉर्ज वॉशिंग्टनपासून ते बराक ओबामापर्यंत सर्व अमेरिकी अध्यक्षांची कारकीर्द, त्यांचे खासगी आयुष्य, आयुष्यातले चढउतार याचा वेध ‘अमेरिकी राष्ट्रपती’ या पुस्तकात अतुल कहाते यांनी घेतला आहे.लेखकाच्या अवलोकनानुसार अमेरिकेची दहशतवादाच्या संदर्भातली भूमिका सातत्यानं दुटप्पी आहे. इस्राईल, पाकिस्तान, निकारागुआ, अल साल्वादोर अशा अलीकडच्या मित्रांच्या दहशतवादाविषयी अमेरिकेला फारसं दुःख होत नाही; उलट त्यांच्या कृतींचं ती सरळ समर्थनच करते. याउलट अफगाणिस्तान, पॅलेस्टाईन, सीरिया, लीबिया, इराण अशा ठिकाणच्या दहशतवादाला मात्र अमेरिका आपला शत्रू मानते. साहजिकच अमेरिकेच्या या भूमिकेचा जगभरातल्या अनेक देशांमध्ये तीव्र निषेध केला जातो आणि यातून अमेरिका आपल्या शत्रूंची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवते. म्हणूनच खरा दहशतवादी देश कोण आहे, असा विचार आपण करायला लागलो, की सगळ्या जगाच्या लोकशाहीचा, सुरक्षिततेचा आणि शांततेचा मक्ता आपणच घेतला असल्याच्या थाटात वागणार्या आणि प्रत्यक्षात बरोबर याच्या उलट पावलं टाकणाऱ्या अमेरिकेचा खरा चेहरा समोर येतो. अमेरिकेच्या धोरणांचे पडसाद जगावर खूप मोठ्या प्रमाणावर उमटत असल्यामुळे अमेरिकी राष्ट्रपतींचा इतिहास जाणून घेणं, भविष्यात काय घडू शकतं हे समजून घेण्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल, यात शंकाच नाही! हाच या पुस्तकाचा गाभा आहे.

त्या कमाईतून एक कोटी रुपयांचा एक धर्मादाय ट्रस्ट नागपूरला काढून मराठी लेखकांना आणि लोकसंख्या नियंत्रण क्षेत्रातील कार्यकत्र्यांना लाखलाखचे पुरस्कार देण्याचा उपक्रम चालू केला आहे. अमृतमध्ये डझनावारी लेख लिहून अमेरिकेतील जीवनाचे वेगवेगळे रंगढंग आणि अंतर्विरोध टिपले आहेत. लाभसेटवारांचे एक बलस्थान म्हणजे त्यांचे चौफेर निरीक्षण आणि दुसरे बलस्थान म्हणजे त्यांची मिश्किल विनोदबुद्धी. स्वत:ला विनोदविषय बनवण्यात ते कधीच हात आखडून घेत नाहीत, त्यामुळे त्यांचे लेखन हे अघळपघळ गप्पांच्या मैफलीसारखे रंगते. इ.स. २००४ मध्ये चार दिवसांचा लास वेगासचा दौरा डॉ. लाभसेटवार यांनी पत्नीसह केला. सेंट मार्वâ चौक, इटालियन स्थापत्यशास्त्राचे नमुने... चार हजार खोल्या... १९९७ ते १९९९ या दोन वर्षांत संपूर्ण बांधकाम... सभा संमेलनांसाठी १९ लक्ष चौ. फुट वातानुकूलित दालने... २.३ एकर विस्ताराचे जुगारगृह... २०० जुगार यंत्रे... आरंभी ३ हजार खोल्या (आता आणखी ३००० लोकांची भर) जगातले सर्वांत मोठे हॉटेल २.३ अब्ज डॉलर्स खर्च... या हॉटेलचा मालक शेल्डन अॅडल्सन... व्हेनिसची प्रतिकृती करण्याची कल्पना... पहिल्याच वर्षांत शेअर्स भाव वाढून अॅडल्सनचे भांडवल १४ अब्ज डॉलर्स झाले. इ. वर्णन त्यांनी मनोरंजकपणे केले आहे. व्हिनिशियन हॉटेलमध्ये चौथ्या मजल्यावर छान तलाव... त्यात केलेला जलतरणाचा कार्यक्रम... अमेरिकन स्त्रियांचा धीटपणा... जास्तीत जास्त अंगप्रदर्शन करून आपलं शरीर सौष्ठत्व उधळण्यात त्यांना वाटणारा आनंद... आपल्याकडे तरुणाचं लक्ष वेधून घेणं हाच त्यांचा उद्देश... आपल्या शरीर प्रदर्शनाकडे कुणी त्रयस्थ माणूस बघत असेल तर त्यांना त्यात काही वावगं वाटत नाही. कोणी बघत असले तरी त्याचं भान अमेरिकन नारीला नसते... स्त्रीसुलभ लज्जा व सोज्वळता अमेरिकन नारीमध्ये सापडत नाही. लासवेगासमध्ये कितीतरी प्रकारची पापं घडतात हे माहीत असलं तरी त्या एकट्याने यायला तरुण मुली भीत नाहीत. उलट ते आव्हानसारखं मानतात. त्या नगरीची अनेकविध वैशिष्ट्ये त्यामुळे लक्षात येतात. लास वेगासला भेट देण्याची ओढ लागावी अशी लाभसेटवार यांच्या लेखणीची एकूणच किमया आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
520
भाषा
मराठी
किंमत
895.00
ISBN
9789386175533
समुदायाने जोडले
बंद