माझे शेल्फ
आणखी एक पलायन
युद्धात ओढल्या गेलेल्या आणि सतत पलायनाचा प्रयत्न करीत पकडला जाणारा व्यायामपटू एरीक प्लेझंट याची कथा डॉ. रविकांत पागनीस यांनी 'आणखी एक पलायन' मधून सांगितली आहे. एरिकचा जन्म इंग्लंडमधील नॉरविच या छोट्या गावात राहणार्या सर्वसामान्य ब्रिटीश कुटुंबात झाला. लहानपणापासून व्यायामाची आवड असल्याने त्याचे शरीर पिळदार झालेले होते. कुस्ती, मुष्टियुद्ध हे त्याचे आवडते खेळ.
घरातून बाहेर पडल्यावर अनेक प्रकारची कामे करीत असताना चा संबंध दुसर्या महायुद्धाशी आला. जर्मनीने त्याला अटक केली. सुटकेसाठी त्याने जर्मनीच्या एस. एस. ग्रुपमध्ये प्रचारकाचे काम केले. पण जर्मनीचा पराभव झाल्यानंतर रशियाने त्याला बंदी बनवून २५ वर्षांची शिक्षा दिली.
त्या वेळच्या कुप्रसिद्ध संघटनांनी त्याच्या ताकदीचा फायदा उठविला. अपमान, शिक्षा, एकांतवास, अमानवी कृत्य असे जीवन जगात असताना शत्रूच्या तावडीतून पलायन करण्यासाठी त्याने काय दिव्य पार केली हे या आत्मकथेतून अनुभवायला मिळते. पत्नी अॅनालीसा व आई-वडिलांच्या आठवणींनी त्याला आत्महत्येपासून बचावले व जगण्यासाठी बळ दिले. या सर्व काळातील आठवणी, थरारक प्रसंग वाचताना एरिकच्या आत्मबळाला दाद द्यावीशी वाटते.