मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अँबिग्युअस लॉस

इंग्रजी शीर्षक
Ambiguous Loss
सारांश

न उमजलेलं दु:ख घेऊन जगायचं कसं, त्याची शिकवण देणारं पुस्तक म्हणून ‘अँबिग्युअस लॉस’चा उल्लेख करण्यात आला आहे. डॉ. पॉलिन बॉस यांच्या या पुस्तकाचा अनुवाद सुनंदा अमपूरकर यांनी केला आहे. छुपेपणाने माणसाचं मन आणि जीवन ग्रासून टाकणाऱ्या, नकळत होणाऱ्या, कितीकाळ भोगावं लागणार तेही नक्की नसणाऱ्या, अटळ अशा दु:खासंबंधी डॉ. पॉलिन बॉस या अमेरिकन विदुषीने अनेक वर्षे संशोधन, अभ्यास केला. त्याचं फलित म्हणजे तिचा ‘अँबिग्युअस लॉस’चा शोध. या शोधाबद्दल जनसामान्यांना सांगण्याच्या जिव्हाळातून हे पुस्तक आकाराला आलं आहे. अत्यंत सोप्या भाषेत लिहिण्यात आलेल्या या पुस्तकाचा मराठी अनुवादही तेवढ्याच सोप्या पद्धतीने करण्यात आला आहे. ‘अँबिग्युइटी’ म्हणजे अनिश्चितता आणि लॉस म्हणजे काही तरी गमवाणं. अँबिग्युअस लॉस’ या नावामध्ये ती सहजपणे एकमेकांमध्ये मिसळली आहे. प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा अँबिग्युअस लॉस अनुभवावा लागतो. त्यावेळी काही तरी निश्चित, स्पष्टपणे कळायला हवं, असं आपल्याला वाटत राहतं. तसं झालं नाही तर हे विचित्र, धूसर, उलगडा न झालेलं नुकसान, हे दु:ख घेऊन जगावं तरी कसं असा प्रश्न माणसांना अस्वस्थ करुन सोडतो. आपल्या परीने शोधताना प्रत्येकाची उत्तरं वेगळीच असतात. पण अँबिग्युअस लॉस पुस्तक वाचल्यानंतर येणारं उत्तरंही प्रश्नांपेक्षा सोपी वाटतात. हेच या पुस्तकाचं यश म्हणता येईल.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
152
भाषा
मराठी
किंमत
280.00
ISBN
9788184980608
समुदायाने जोडले
बंद