माझे शेल्फ
आंधळ्या बाईचे वंशज
कटुता रेंगाळत ठेवणारी कलाकृती… ‘द ब्लाइंड लेडीज डिसेंडंट्स’ या अनीस सलीम यांच्या कादंबरीचा ‘आंधळ्या बाईचे वंशज’ या नावाने श्यामल चितळे यांनी मराठीत अनुवाद केला असून, तो मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. ही एका कुटुंबाची गुंतवून टाकणारी कथा आे. त्यात एका भारतीय मुस्लीम कुटुंबाच्या रोजच्या आयुष्यातील धडपड, भीती आणि महत्त्वाकांक्षा रंगविल्या आहेत. तसंच कुटुंबाचं पूर्ण अध:पतनही वर्णन केलं आहे. कारुण्याला विनोदाचा साज चढवून गुंतवून ठेवणाऱ्या या कादंबरीची कथा एखाद्या उमरावकथेच्या थाटात उलगडत जाते. अमर हम्साचा जन्म एकमेकांशी अबोला धरलेल्या आणि कायम युद्धाच्या पवित्र्यात असणाऱ्या पालकांच्या पोटी झाला. आपलं आयुष्य दुर्घटना आणि बदनामी यांनी भरलेलं असणार, असं त्याला नेहमी वाटायचं आणि त्याच्या मनात येणाऱ्या उदास कल्पना खऱ्याच ठरल्या. सव्विसाव्या वर्षी तो कल्पनेतल्या श्रोत्यांना आपली कहाणी ऐकवायचं ठरवतो आणि बंगल्यातल्या प्रत्येक कपाटातून बाहेर येऊन भुतं नाचायला लागतात. कादंबरीत लेखकानं त्या कुटुंबातील रोजच्या जीवनाचे तपशील बारकाईनं टिपले आहेत.करुण विनोदानं भरलेली ही कादंबरी वाचकाला गुंतवून ठेवते.नायकाने ही कथा सांगताना विनोदाचा साज चढविला आहे . त्यामुळे त्यांचे संवाद वाचताना खूप हसू येते . "द हिंदू "चे २०१३ सालचे पुरस्कार प्राप्त सर्वोत्कृष्ट पुस्तक .
आपल्यातली परस्परांची दुश्मनी या प्रसंगापुरती विसरून कामाला लागलं तरच! ज्याच्या ज्याच्या गँगच्या हाताला जे लागेल ते त्याचं.`` मग हे तरुण गटागटानं शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरून पैसे– मदत गोळा करतात. लोकही कमी-जास्त मदत करतात. धान्य, कपडे, भांडी, ब्रेड, पैसे– निवडणुकीतले उमेदवारही साड्या, चादरी वाटतात. मताला शंभर रुपये भाव देतात. प्रत्येक टोळी प्रमुखाला उमेदवार गणपा दहा-दहा हजार रुपये देतो. मते न आणली तर मात्र जिवंत ठेवणार नाही असा दमही भरतो. गणपा दारूवाला निवडून येतो. ब्लॅकने तिकिटे विकताना रमेशची आणि अरुणची मारामारी होते. नऱ्याही रमेशला मारतो. रमेश कसाबसा पळत घरी येतो. आई त्याला हळद मलमपट्टी करते. रमेश रात्री नऱ्याला रस्त्यात गाठून त्याच्यावर चाकूचे वार करतो. त्याच्याबरोबरचे सुनील व अकबर पळ काढतात. पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून रमेशही पळ काढतो. आपण पोलिसांच्या हाती सापडलो तर अंधारकोठडीत डांबले जाणार; नाहीतर झोपडपट्टीत लपून राहून अंधाराचे वारसदार म्हणून दिवस काढणार. आपल्या जीवनाला लागलेले हे भेसूर भयानक वळण; त्यातून आपली सुटका नाही. या विचाराने तो त्या भेसूर अंधारात रस्ता दिसेल तिकडे धावत सुटतो... त्याची सगळी स्वप्ने उद्ध्वस्त झालेली असतात. झोपडपट्टीत राहण्याची पाळी आलेल्या तरुणांना जी संगत मिळते ती त्यांना गुन्हेगारीकडे आणि व्यसनांकडे नेते आणि शेवटी त्यांना अंधाराचे वारसदार बनवते. दादासाहेब मोरे यांनी या झोपडपट्टीतील गरीब रहिवाशांच्या आयुष्यातील परवड वेगवेगळ्या संदर्भासह वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. रमेश हा नायक म्हणून प्रामुख्याने त्यांनी रंगवला आहे. नऱ्या हा खलनायक. सुनील व इतर गँगवाले, रमेश व सुनील यांची कुटुंबे व त्या झोपडपट्टीतील एकमेव धनिक गणपा दारूवाला– या मोजक्या पात्रांनिशी झोपडपट्टीतील लोकांच्या सुख-दु:खाची एक झलक या कादंबरीत मोरे यांनी दाखवली आहे. तटस्थपणे झोपडपट्टीवासीयांच्या ससेहोलपलटीचे भिन्न-विभिन्न प्रकार मोरे पेश करतात; गुन्हेगारी जगाचाही फेरफटका घडवून आणतात. क्रौर्याला सामोरे जाताना मोरे हे काहीसे दचकत दबकतच पुढे जातात. फार खोलात जाण्याचे टाळतात. झोपडपट्टीबद्दल लिहितानाही त्यांना आपण अप्रिय कर्तव्य करत आहो असे काहीतरी जाणवत असावे. त्यात तसा त्वेष नाही. चीड नाही. असहाय अगतिकता आहे. साक्षीभावाने सगळे अध:पतन बघताना या जीवनाचा भेसूर भयानक शेवट होणार ही खंत त्यांना सर्वाधिक सतावते. ``उद्याच्या भेसूर जीवनाची कल्पना कोणीतरी आपल्याला वेळीच द्यायला हवी होती`` अशी पश्चात्तापाची भावना रमेशमध्ये शेवटी जागी होते. पण आता ती निरुपयोगी असते. सरळ रेषेत जायचे कितीही मनात असो, अंधारात वाट वाकडी-तिकडी होण्याची शक्यता अंधाराच्या वारसदारांबाबत विशेषच राहते असा इशारा ही कादंबरी देते.