माझे शेल्फ
अंतराळ स्पर्धा
आता अंतराळात जाण्यासाठीचं तंत्रज्ञान पुष्कळ अद्ययावत झालं आहे; पण सुरुवातीला अंतराळात उपग्रह आणि मानवाला पाठविण्यासाठी शास्त्रज्ञांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. शास्त्रज्ञांच्या त्या अथक परिश्रमांचं सखोल चित्रण अतुल कहाते यांनी त्यांच्या ‘अंतरा स्पर्धा’ या पुस्तकातून केलं आहे. रॉकेटनिर्मितीचं तंत्रज्ञान, त्याची उपयुक्तता, रॉकेटनिर्मितीच्या बाबतीत आणि त्याद्वारे मानवाला, उपग्रहाला अंतराळात पाठविण्याच्या बाबतीत सोव्हिएत रशिया आणि अमेरिकेमध्ये लागलेली चढाओढ, केवळ राजकीय चढाओढीसाठी काम न करता प्रचंड ध्येयासक्तीतून रॉकेटनिर्मितीमध्ये विविध प्रयोग करणारा रशियाचा कोरेलियॉव्ह आणि मूळ जर्मन असणारा, पण अमेरिकेसाठी काम करणारा फॉन ब्राऊन यांचं रॉकेटनिर्मितीच्या क्षेत्रातील अभूतपूर्व योगदान आणि त्यांना करावा लागलेला पराकोटीचा संघर्ष, अनंत अडचणींचा करावा लागलेला सामना या सगळ्याचं व्यापक दर्शन कहाते या पुस्तकातून घडवतात. रॉकेटसंबंधित तंत्रज्ञानाचं अगदी सोप्या भाषेत विवेचन केल्यामुळे आणि त्याला जॉन फाऊलर आणि कोरेलियॉव्ह या दोघांच्या प्रेरणादायक यशोगाथेची साथ मिळाल्यामुळे हे पुस्तक अतिशय रोचक आणि वाचनीय झालं आहे.
आपण पाप करीत आहोत असे मला वाटत नाही. ‘आपल्या देहाचा वापर होऊन दुसऱ्याचा प्राण वाचणार असेल तर त्याला मी आनंदाने तयार होईन...’ सत्तर दिवसांनी या प्रवाशांकडे बाह्य जगाचे लक्ष जाते. त्यांची सुटका होते... १२ डिसेंबरला तिघेजण सांतियागोला पोहोचतात. २० डिसेंबरला उर्वरित चौदा जणांना घेण्यासाठी हवाईदलाचे विमान येते. सांतियागोला ते पोहोचते. दहा आठवडे केवळ बर्फावर हे तरूण जिवंत राहणे शक्य नाही हे तेथील डॉक्टरांचे मत... ते चौकशी करतात, ‘शेवटी तुम्ही काय खाल्ले?’ इन्शियाटें उत्तर देतो, ‘माणसाचे मांस.’ एक फारदर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मुलाखती टेप करतात.. एका दैवी चमत्काराचे प्रतीक म्हणून त्यांचे कौतुक होते. वृत्तपत्रात याबद्दलच्या बातम्या झळकतात. जगभर टीव्ही-रेडिओद्वारे त्या जातात. उरुग्वेमध्ये मात्र या बातम्या कोणी छापत नाही. पत्रकार परिषदेत एक निवेदन देण्यात येते. ‘उंच बर्फाच्छादित शिखरांवर भव्यदिव्य सृष्टीच्या सान्निध्यात असताना आपण एकाकी आहोत याची जाणीव होते... आपण आणि परमेश्वर असे दोघेच आहोत असे वाटते. आपण परमेश्वराच्या जवळ आहोत, तो आपल्या प्रत्येकात आहे अशी जाणीव होते... जे घडणार आहे, जे घडते ते परमेश्वराच्या इच्छेनुसार... आमच्याकडे खाण्यासाठी काही उरले नाही तेव्हा आम्हाला येशूचे स्मरण झाले. येशूने आपले मांस आणि रक्त लोकांना दिले तसे आपण का करू नये असे वाटले. त्या दृष्टांतामुळेच आज आम्ही आपल्यापुढे दिसत आहोत... त्याबद्दल काही विचारवंताना आमच्या या भावनांची आपण कदर करावी एवढीच प्रार्थना आहे.’ त्या ४५ प्रवाशांपैकी फक्त १६ जण उरले होते. जिवंत परतले होते. अर्तुरो नोगिराचे वडील वृत्तपत्रांना पत्र पाठवतात. ‘या सोळा वीर मुलांचे कौतुक करतो. त्यांनी दाखवलेली एकजूट, श्रद्धा, धारिष्ट्य यासाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी अपघातानंतर आपल्या सहकाऱ्यांच्या केलेल्या सेवेसाठी प्रत्येकाने त्यांच्यापासून धडा घ्यायला हवा. आपला अहंपणा, आपली स्वार्थी आणि संकुचित विचारसरणी बदलायला हवी.’ ‘अलाइव्ह’द्वारे एक विलक्षण अनुभवमालिका आपल्यापुढे उभी राहते.