माझे शेल्फ
अंतराळवीर सुनीता विल्यम्स
प्रकाशक एखाद्या ताज्या घटनेवर किती झटपट पुस्तकं काढतात याचे उदाहरण म्हणजे सुनीता विल्यमचे चरित्र, अवघ्या तीन आठवड्यात ते प्रसिद्ध झाले. अंतराळात १९४ दिवंस १८ तास १५ मिनिटे राहून विक्रम करणारी सुनीता विल्यम्स ही २२ जून २००७ रोजी पहाटे १ वाजून ११ मििटांनी कॅलिफोर्नियातील एडवर्डस एअर बेसवर सुखरुप उतरली; तेव्हा जगभराच्या लक्षावधी चाहत्यांना हायसे वाटले असणार! या आधी पेâब्रुवारी २००३ मध्ये कल्पना चावला अंतराळात राहून पृथ्वीजवळ पोहोचली; पण कोलंबिया अवकाश यान पेटून तिचा इतर सहा अंतराळवीरांसह अंत झाला होता. त्यामुळे सुनीताच्या बाबतीत तसे काही घडू नये अशी सर्वांच्याच मनात धाकधूक होती. तिचे अटलांटिस अवकाश यान फ्लोरिडामध्ये उतरणार होते; तेथे त्यावेळी ८००० पुâटांवर ढगांची दाटी असल्याने उतरविणे शक्य नव्हते; तेव्हा चोवीस तासांनी ते कॅलिफोर्नियात उतरविण्यात आले आणि १३ जुलैला सुनीताचे चरित्र मराठीतही आले. प्रकाशकांच्या तत्परतेची ही एक अभिनंदनीय झलकच होय! या विक्रमी अंतराळकन्येबद्दल भारतीयांना आत्मीयता वाटणे स्वाभाविकच आहे. कारण तिचा जन्म अमेरिकेत झाला असला आणि ती सध्या अमेरिकन नागरिक असली तरी तिचे वडील डॉ.दीपक पंड्या हे भारतीयच आहेत गुजरातमधील अहमदाबादजवळचे मंगरोळ हे त्यांचे गाव. डॉ. दीपक पंड्या यांनी १९५८ मध्ये इंग्लंडला प्रयाण केले. तेथून ते अमेरिकेतील आहायो येथील युक्लीड हॉस्पिटलमध्ये उमेदवारी करुन अमेरिकेतच स्थायिक झाले. डॉ. दीपक पंड्या यांचे बोनी उर्सालिन त्यालोकार या स्लोव्हेनिअन मुलीवर प्रेम बसले. त्यांचा विवाह झाला मिळवून ‘नेव्हल एव्हिएटर’ म्हणून ती काम करु लागली (१९८९). त्याआधी नेव्हल अॅकेडमीमध्येच तिच्या बरोबर असणारा वर्गमित्र मायकेल विल्यम्स याच्याशी तिचे लग्न झाले. हेलिकॉप्टर पायलट म्हणून तिने काम सुरू केले. एअरक्राफ्ट हँडलर, असिस्टंट एअर बॉस ही पदेही तिने भूषविली, परंतु अंतराळवीर बनण्याचे तिचे स्वप्न होते. १९९८ मध्ये २३०० फ्लाइट तासाच्या उड्डाणांचा अनुभव गाठीला बांधून ती अंतराळवीर म्हणून ‘नासा’मध्ये पोहोचली.... अवकाश प्रकलपासाठी तिची निवड झाली. ९ डिसेंबर २००६ रोजी स्पेसशटलने तिने उड्डाण केले; डिसेंबर २००६ रोजी अवकाश स्थानकांत ती पाहोचली. सहा महिन्यांवर तेथे ती राहिली, सुखरुप परत आली . सुनीता विल्यम्स हे पुस्तक तसे छोटे आहे. ११ ऐंशी पृष्ठांचा मजकुर. ३२ पृष्ठे छायाचित्रे.पत्रकारितेच्या अंगाने त्याचे लेखन झाले आहे. त्यात सुनीताचे वडील दीपक पंड्या, सुनीताचा भाऊ जय (बोनी) पंड्या, पती, सासू, वृत्तपत्रातील बातम्या, इंटरनेट वगैरेंच्या मदतीने बरेच तपशील दिले गेले आहेत. कॅप्टन एस. शेषाद्री आणि अराधिका शर्मा यांनी मूळ इंग्रजी पुस्तक ‘रुपा प्रकाशन’ साठी तयार केले. चित्रा वाळिंबे यांनी मराठी अनुवाद केला आहे.सुनीता विल्यम्स ही आजच्या तरुणतरुणींना महत्त्वाकांक्षेचे क्षितिज विस्तारण्याचा संदेश देते. ‘साहसी बना, उत्तम आरोग्य ठेवा. सातत्याने नवीन गोष्टी आत्मसात करा. पुढे जात रहा.’ अंतराळ स्थानकावर राहताना तिला काय जाणवले? ‘पृथ्वी विशाल आहे. सुंदर आहे. तिला सीमा नाहीत. कुंपणं नाहीत. एखाद्या विशिष्ट भूप्रदेशासाठी लोक का भांडतात, लढाया करतात हेच अनाकलनीय वाटते. त्यामुळेच हे पुस्तक प्रेरणादायक आणि प्रबोधनपर वाटेल.