माझे शेल्फ
अंतर्नाद
सकारात्मकतेचं महत्त्व अधोरेखित करणारा कथासंग्रह....कधी बाजीरावसारख्या बिल्डरला ‘अंतर्नादातून मिळते आत्मशक्ती...तर कधी महादेवसारख्या सद्वर्तनी व्यक्तीमुळे कळते एखाद्या गुन्हेगारालाही चांगुलपणाची किंमत...कधी एखादे आजोबा ‘धर्म’ या विषयावर बोलतात अतिरेक्यांशी...तर कधी श्रीयशसारख्या जीवनाबद्दल निराश झालेल्या इंजिनअरला युद्धामुळे हानी झालेल्या गावातून मिळते स्फूर्ती...तर कधी सदानंदसारख्या कॉम्प्युटर तज्ज्ञाला निर्णयाची चतु:सूत्री कॉम्प्युटरला फीड केल्यानंतर मिळतात आश्चर्यकारक रिझल्ट्स...तर कधी श्रीकांतसारखा एखादा प्रामाणिक अधिकारी जगदाळेसारख्या कामचुकार, राजकारणी सुपरवायझरवर उलटवतो त्याचा डाव...तर अनेक माणसं, त्यांच्या अनेक समस्या...माणसाच्या मानसिकतेतून उद्भवलेल्या...माणसाने जर मू्ल्यं अंगी बाणवली, सद्विचारांची कास धरली, संयम राखला तर तो निश्चितच त्या समस्येवर मात करू शकतो, असाच काहीसा संदेश देणार्या कथांचा हा संग्रह आहे.
शास्त्रज्ञांची विधाने स्पष्ट करण्यासाठी आवश्यक तेथे आकृत्या, शुक्र, मंगळ, सूर्य व आकाशगंगा यांची छायाचित्रे यामुळे या पुस्तकाची मनोरंजकता वाढली आहे. डॉ. कार्ल सॅगन व अन्य काही शास्त्रज्ञांची छायाचित्रे दिली असती तर अधिक बरे झाले असते. तळटीपा व परिशिष्टे यामुळे या पुस्तकाला मौलिकता प्राप्त झाली आहे. काही ठिकाणी गोष्टीरूप विवेचन तर काही ठिकाणी काव्यपंक्तींचा दाखला यामुळे सर्वसामान्यांची ‘विज्ञान जिज्ञासा’ निश्चित वाढीस लागेल.