मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अपूर्व, अलौकिक, एकमेव

इंग्रजी शीर्षक
Apurva, Aloukik, Ekmev
सारांश

आयुष्यात लहानपणापासून अनेक व्यक्ती येत असतात. त्या व्यक्तींचा प्रभाव कळत नकळत आपल्या जीवनावर पडत असतो. अनेकविध पैलूंमुळे त्या व्यक्ती मनात घर करतात. कधी चांगल्या आठवणींमधून आपल्याला सतत आठवत राहतात, तर कधी त्यांची आठवण आपल्याला व्याकूळही करून सोडते. लेखिका यशोधरा काटकर यांनी त्यांच्या जीवनावर प्रभाव पाडलेल्या, त्यांना जीवनाच्या विविध टप्प्यांवर भेटलेल्या अशाच व्यक्तींचा धांडोळा घेतला आहे. या व्यक्ती त्यांच्या घरातल्या, नात्यातल्या, व्यवसायातल्या आणि अन्य काही कारणास्तव त्यांच्या संपर्कात आलेल्या आहेत. या व्यक्ती अपूर्व, अलौकिक आहेत आणि म्हणूनच एकमेवही असाव्यात. ही सर्व मंडळी वलयांकित (नावाजलेली, प्रसिद्ध असलेली) आहेत. यातील काही जण तर त्यांचे जन्मापासूनचे साथीदार आहेत. मुखपृष्ठावरची त्या व्यक्तींची छायाचित्रे पाहून पटकन वाटते, की चित्रपट कलावंतावरच्या जीवनकहाण्याच असाव्यात कदाचित, पण तसे नाही, हे पुस्तक वाचताना जाणवते. या व्यक्तींमधील वेगळेपण त्यांनी शोधून काढले. त्यांचा आपल्या जीवनावरचा प्रभाव किंवा त्या व्यक्ती का भावल्या ते त्यांनी या लेखांमध्ये व्यक्त केले आहे. अर्थात हे सर्व लेख हे वेगवेगळे दिवाळी अंक, वृत्तपत्रांच्या पुरवण्या यामध्ये प्रकाशित झालेले आहेत. तरीही ते एकत्रित वाचताना त्यातील गोडवा जराही कमी होत नाही, उलट त्यांचा संग्रह केल्याने ते वाचताना मन गुंतून जाते. लेखिकेच्या जीवनात आलेल्या या व्यक्तींनी तिला काही न मागता आयुष्याचे संचित दिले आहे. हे संचित दुर्मीळ रत्नांसारखे असून त्याने आपले जीवन संपन्न केले आहे, असे त्यांना वाटते. त्यांना कधी निराशा आली किंवा अत्युच्च आनंद झाला तर त्या आवर्जून या रत्नांच्या संचिताची पोतडी उघडतात आणि त्यात गुंतून जातात. त्यांना नवी ऊर्जा मिळते आणि त्या पुन्हा नव्याने कार्यरत होतात. भालजी पेंढारकर, त्यांच्या तीन पत्नी यांच्याविषयी लिहिताना लेखिकेला तिचे बालपण आठवत राहते. आपल्या आजीची माया आठवते. प्रिया तेंडुलकरसारखी मैत्रीण तिला त्या दोघींमधलं साधम्र्य आठवाला लावते. लेखिकेच्या जीवनावर ज्यांचा प्रभाव नेहमीच राहिला आहे. त्या तिच्या जन्मदात्यांपासून (पप्पा) दुसरे वडील (दादा-रणजीत देसाई) आणि सासरे (पपा) यांच्या आठवणी लिहिताना लेखिका सहजपणे भावुक होऊन जाते. नव्या पिढीचा लेखक म्हणून ज्याची ओळख आहे, त्या राही अनिल बर्वेची ओळख करून देताना त्याच्यातील एक प्रकारची अबोलता, संपूर्ण समाजावर आतून दाटून आलेली चीड आणि त्यामुळेच निर्माण झालेली अस्वस्थता हे लिहिताना गूढ ग्रेस वाचतोय असे वाटल्याखेरीज राहत नाहीत. लेखिका निर्मलाबाई देशपांडे यांच्या घराशी लेखिकेचे वेगळेच नाते आहे. या नात्यात एक गंमतही आहे. निर्मलाताईंची मुलगी यशोधरा देशपांडे यांच्याशी असलेल्या नामसाधर्म्यामुळे त्यांची मैत्री अधिक घट्ट झालीच, पण त्या दोघांच्या नात्यामध्ये आणखी एक साम्य आहे ते म्हणजे त्यांच्या मुलींचीही नावे सारखी आहेत. या नामसाधर्म्यामुळे त्या दोघींना झालेला आनंद वाचताना वाचकालाही मनामध्ये खुसखुशीत वाचताना आनंद अनुभवता येतो. जुन्याजाणत्यांबरोबर लेखिकेने नव्या पिढीच्या प्रतिनिधींनाही आपल्या लेखामध्ये मानाचे स्थान दिले आहे. समृद्धी केरकर असेल नाही तर शर्वरी पेढकर... अशा नवोदित कवींच्याही कवितांवर त्यांना आपले मत व्यक्त करावेसे वाटले आहे. आईने केलेल्या संस्काराची शिदोरी लेखिका अलगदपणे उघडते तेव्हा त्यांच्या कणखरपणाचे रहस्य उलगडते. अभिनेता प्रशांत दामले यांचे शेजारीपण त्या सहजपणे सख्खे शेजारी म्हणून स्वीकारतात तेव्हा वाचताना शेजारी असावेत तर असे... असे वाक्य सहज ओठावर येते. डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा अंतिम प्रवास आणि त्याबरोबरच त्यांच्या जीवनाशी असलेली नात्याची ओळख वाचताना डोळे कधी पाणावतात हेच कळत नाही. साहित्य, चित्रपट आणि अन्य क्षेत्रातील व्यक्तींची ओळख लेखिका यशोधरा काटकर यांनी इतकी सहज करून दिली आहे, की त्यामुळे हे पुस्तक वाचताना त्यांच्या संचितामध्ये आपणही सहज गुंतून जातो.

या चित्रांतील रेखांकनामुळे लेखकाला जे सांगावयाचे आहे त्या माहितीचे आकलन वाचकाला अगदी सहजपणे होते. विविध विषयांच्या विभागवार मांडणीमुळे वाचनाची लयही चांगली सांभाळली गेली आहे. उत्कृष्ट छपाई, चंद्रमोहन कुलकर्णींचे विषयाला अनुरूप असे आकर्षक मुखपृष्ठ ही पुस्तकाची आणखी एक जमेची बाजू. दर्जेदार प्रकाशनासाठी प्रसिद्ध असलेल्या मेहता प्रकाशनाने साप्ताहिक मार्मिकमधील निरंजन घाटे यांची ही वाचकप्रिय लेखमाला पुस्तकरूपाने प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद! मार्मिकमधील निरंजन घाटे यांची ही लेखमाला न वाचलेल्या वाचकांना या पुस्तकामुळे वेगळ्याच वाचनानंदाचा लाभ होईल!

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2021
पृष्ठसंख्या
200
भाषा
मराठी
किंमत
260.00
ISBN
9789391151041
समुदायाने जोडले
बंद