माझे शेल्फ

अर्थाच्या शोधात

इंग्रजी शीर्षक
Arthachya Shodhat
सारांश

आज आपण सर्वजणच जीवनाच्या अर्थाच्या शोधात आहोत. त्यामुळे "अर्थाच्या शोधत" या मथळ्यानच लक्ष वेधताच मलाही पुस्तक वाचल्याशिवाय राहवलं नाही. डॉ. व्हिक्टर फ्रॅन्कल या न्यूरॉलॉजिस्ट आणि सायकिऍट्रिस्ट असलेल्या व्यक्तीला (लेखकाला) दुसऱ्या महायुद्धादरम्यान तो केवळ ज्यू असण्याच्या अपराधा बद्दल पकडण्यात आले. नाझींच्या छळछावण्याच्या यातनातळांवर (कॉन्संट्रेशन कॅम्प) मध्ये फ्रॅन्कल यांनी जी 3 वर्षे घालवली त्या अनुभवांचे सखोल वर्णन या पुस्तकाच्या पूर्वार्धात आहे. फ्रॅन्कल यांच्या बरोबर पकडण्यात आलेल्या 90 टक्क्यापेक्षा जास्त लोकांना विषारी वायूकक्षात अथवा विधुत भट्टीत घालून ठार मारण्यात आले. उरलेल्या लोकांकडून उपाशीपोटी, युरोपातील गारठ्यात, अपुऱ्या वस्त्रानिशी कष्टाची कामे करून घेतली. अशा बिकट आणि भयानक परिस्थितीतीतून जात असतानाही फ्रॅन्कल यांनी आपला आशावाद ढळू दिला नाही. आपल्या ध्येर्याचा त्याग केला नाही. फ्रॅन्कल यांनी माणुसकी जपलीच, पण त्या भयंकर वातावरणातही माणुसकी शोधण्याचं औदार्य उरी बाळगलं. सभोवती हाहाकार माजला असताना तो स्वतःला प्रश्न विचारात राहिला, जीवनाचा अर्थ शोधत राहिला.ज्याला "का" जगायचे ह्याचा उलगडा झाला कि त्याला "कशाही" परिस्थितीत जगता येते हाच जीवनाचा अर्थ शोधता यावा, जीवनातील अर्थाचा शोध घेणारी उपचार पद्धती #लोगोथेरपी हा या पुस्तकाचा उत्तरार्ध आहे. बुद्धिबळाच्या खेळात सर्वात चांगली किंवा फक्त चांगली चाल अशी कुठलीच चाल नसते. त्या वेळच्या प्याद्द्यांनुसार, पटावरील त्यांच्या स्थानानुसार आणि प्रतिस्पर्ध्याच्या व्यक्तीमत्वानुसार सर्वात चांगली चाल कुठली ते ठरवावे लागते. जीवनाचेही तसेच आहे प्रत्येक व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यातील ध्येय शोधायला आणि त्याच्या पूर्तीसाठी असलेली जबाबदारी पेलायला शिकते तेव्हाच ती जीवनातील प्रत्येक उत्तर शोधायला सज्ज होते. दररोज, दर तासाला, दर मिनिटाला स्वतःच्या वागण्यासंबंधी निर्णय घेण्याची संधी समोर येत असते. तुमच्या अस्मितेचा नाश करणाऱ्या, तुमचे मनोबल हिरावून घेऊ पाहणाऱ्या शक्तींना शरण जायचे कि नाही हे पदोपदी ठरवावे लागते. तुम्ही केवळ नियतीच्या हातातील खेळणे बनता कि नाही हे तुमच्या निर्णयावर अवलंबुन असते. तुम्ही जर जीवनाचा अर्थ शोधण्याच्या तयारीत असाल तर हे पुस्तक निश्चितच दिशादर्शक ठरेल.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी