मुखपृष्ठ

माझे शेल्फ

असाध्य ते साध्य

इंग्रजी शीर्षक
Asadhya Te Sadhya
सारांश

मन, शरीर आणि जिगर १५ जुलै, २००७. लुईस गॉर्डन पग उत्तर धु्रवावरील समुद्रात बर्फावर उभा होता. त्याच्या अंगावर फक्त गॉगल्स आणि ‘स्पीडो’ म्हणजे पोहण्याची चड्डी होती. ज्या पाण्यात तो उडी मारण्याच्या तयारीत होता, त्या पाण्याचे तापमान होते उणे १.७०से. जगातील सर्वांत थंड पाण्यात मारली जाणारी ही एक ‘डुबकी’ नव्हती. त्याचा त्या पाण्यात एक कि.मी. अंतर पोहून जायचा इरादा होता. हे साहस म्हणजे साक्षात मृत्यूला निमंत्रण होते.लेखकाने ब्रिटनच्या स्पेशल एअर सर्विस मध्ये पाच वर्षे सेवा केली .त्या काळात त्यांनी अनेक दुर्गम भागात गिर्यारोहण आणि धोकादायक ठिकाणी पोहण्याचे विक्रम केले .उत्तर ध्रुवावरील समुद्रात उणे १.७ से. पाण्याच्या तापमानात एक किलोमीटर पोहून जाण्याचा विक्रम त्यंनी १५ जुलै २००७ रोजी केला . हा केवळ एक विक्रम नव्हता तर साक्षात मृत्यूला मारलेली मिठी होती . पृथ्वीवरील सर्वात थंड पाण्याच्या समुद्रात एक किलोमीटर अंतर पोहून जायला साधारण वीस मिनिटे लागतात . केवळ शारीरिक ताकद नाही तर उत्तम मानसिक तयारीची गरज होती . आपले ध्येय कितीही अडथळे आले तरी कसे पूर्ण करायचे ते हे पुस्तक वाचून कळते . अतिशय सुंदर आत्मचरित्र .

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2015
पृष्ठसंख्या
380
भाषा
मराठी
किंमत
395.00
ISBN
9788184987942
समुदायाने जोडले
बंद