मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अस्मानी

इंग्रजी शीर्षक
Asmani
सारांश

‘अस्मानी’ या कथासंग्रहात रंजक विज्ञानकथांचा समावेश करण्यात आला आहे. गवत खाऊन काम करणाऱ्या यंत्रमानवाची गंमत ‘बकाबक’ या कथेत दिसते. वंशशस्त्राच्या घोडदौडीत निर्माण होऊ शकणारी शक्यता ‘मार्जिनल्स’ या कथेमध्ये आढळते तर कालप्रवासाचा उपयोग करणारे चोर-पोलीस‘कालचतुराची चित्तरकथा’मध्ये भेटतात. भविष्यातील शक्यतांमध्ये संभाव्य मानवी भावनांचं चित्रण करणाऱ्या या कथा आहेत. अस्मानी या शीर्षककथेमध्ये एका शेतकऱ्याची कथा चितारली आहे. या शेतकऱ्याच्या शेतात एके दिवशी अचानक भूकंप होतो. नंतर दररोज ठरलेल्या वेळी असा भूकंप होतो. या दरम्यान त्याच्या शेतातील पिकांची वाढ राक्षसी वाटावी अशी होते आणि एक दिवस सारं शेत उद्ध्वस्त होतं. रोज ठराविक वेळी होणाऱ्या या भूकंपाचं रहस्य काय हे शोधून काढण्यासाठी मंत्र-तंत्राबरोबरच पोलिसांचीही मदत घेतली जाते. अखेर जमिनीला बसणारे हे धक्के म्हणजे भूकंप नसून जमिनीत गडप झालेल्या आणि उड्डाण करू इच्छिणाऱ्या एका यानाची ती करामत असल्याचं लक्षात येतं. या साऱ्या कथांची मांडणी गोगटे यांनी त्याचे तपशील अगदी तर्काला पटतील, असे दिले आहेत. सामान्य वाचकालाही सहज खिळवून ठेवतील अशा या कथा आहेत. बारीकसारीक तपशिलामुळे जणू आपण तो अनुभव घेत आहोत अशी जाणीव कथा वाचताना होते.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2016
पृष्ठसंख्या
228
भाषा
मराठी
किंमत
180.00
ISBN
9788184980493
समुदायाने जोडले
बंद