माझे शेल्फ
अश्रू
अश्रू लेखक- वि.स.खांडेकर अश्रु ही जणु आपलीच कहाणी आहे असं भासणारी एक अप्रतिम कांदबरी. पुस्तक हातात घेतलं अन् सुरवातीला उमा, शकंर या पात्रांची स्थिती जाणवली मग असं झालं की केव्हा एकदाचं पुस्तक संपवतो. कहाणी जरी स्वातंत्र्योत्तर सुरवातीच्या काळातल असली तरी आजही एकविसाव्या शतकातील मध्यमवर्गीय कुटुंबात घरोघरी घडणारी घटनेसारखी वाटते. प्रत्येक पात्र हे आपला ठसा उमटवणारी आहे. उमा व शकंर सारखी पात्र आजही आपल्या अवतीभवती महागाईच्या विळख्यातुन प्रामाणिकपणे संसाराचा गाडा ओढतांना आपल्या स्वप्नांचा चक्काचुर करत पुढे चालतांना दिसतात. राजकारण व व्यवस्थेचा बळी ठरणारे दिंगबर व अरविंद सारखी तरुण आपल्या कुटुंबातसुद्धा दिसतात.अरविंदच्या माध्यमातुन आजही राजकारणात प्रवेश करु ईच्छिणा-या सतरंजी व झेंडा उचलणा-या तरुणासाठी सणसणित चपराक आहे. सुमित्रा सारख्या काॕलेजला जाणाऱ्या मुलींना प्रेम म्हणजे सर्वस्व वाटणाऱ्यांना सुद्धा शेवटी प्रेम जरी आंधळ असलं तरी आशा ही वेडी ठरते हे कळतं. सर्वच प्रेमकहाण्या रोमियो-ज्युलीयट सारख्या नसतात याची जाणिव करुन देतात. दिंगबर व शकंरची मैत्री ही रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नातं श्रेष्ठ ठरवणारी ठरते. पण उमा व शकंरचे प्रामाणिकपणे संसार करत असतांना एकमेकांवरचे निस्वार्थी प्रेम ,संसारातील सुखदुःखाची समान वाटणी , कुटुंबाप्रती आपुलकी , जिव्हाळा, प्रेम व त्याग खुपच आदर्श ठरतात.