मुखपृष्ठ
आय अॅम अ टॅक्सी

माझे शेल्फ

आय अॅम अ टॅक्सी

इंग्रजी शीर्षक
I Am A Taxi
सारांश

ही गोष्ट आहे अवघ्या बारा वर्षाच्या दिएगोची, पण त्याची गोष्ट सांगता सांगता लेखिका डेबोरा एलिसने अमली पदार्थांची तस्करी करणाऱयांच्या जगाची झलकच वाचकांना दाखवली आहे. कोकेनची तस्करी केल्याचा आळ येऊन त्याचे आईवडील तुरूंगात जातात. दिएगोची रवानगीही आईबरोबर तुरूंगात होते आणि मग तिथे तो कैद्यांचे निरोप पोहोचवणे, वस्तू आणून देणे अशी कामे करायला लागतो. अशी कामे करणाऱ्याला तिथे टॅक्सी म्हणतात. खूप पैसे मिळवण्यासाठी तो एक दिवस काही माणसांबरोबर जंगलात जातो. तिथे त्याला आणि त्याच्या मित्राला कोकेनच्या भट्टीत काम करायला सांगितले जाते. तिथून सुटण्याचा दिएगोच्या प्रयत्नांविषयी हे पुस्तक सांगते. कोकेनचे उत्पादन, त्याची बाजारपेठ, अमेरिकी सरकारचा अमली पदार्थांविरोधी लढा आणि त्यात होत असलेली कोकच्या पानांचे पारंपरिकरित्या उत्पादन घेणाऱ्या बोलेवियन माणसाची फरफट असा सगळा या कादंबरीचा पट आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद