माझे शेल्फ
आय डेअर
एक पोलिस अधिकारी म्हणून आपल्या संपूर्ण कारकिर्दीत डॉ. किरण बेदी यांनी प्रवाहाविरुद्ध पोहण्याची आणि कामाची नेहमी नवीन क्षेत्रं स्विकारण्याची हिंमत दाखवली. पोलिसांनी केवळ गुन्हा शोधून काढण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय आणि सुधारणांना सर्वाधिक महत्त्व द्यवे, या आपल्या मताचा त्यांनी सतत पाठपुरावा केला. सरकारमधील तसेच त्याबाहेरच्याही अनेक मोठमोठ्या प्रस्थांना त्यांनी हादरा दिला. आपल्या कामाला विशाल आणि व्यापक परिमाण देण्याची किरण बेदी यांची वृत्ती सत्तेवरील लोकांनाही दिसून आलेली होती. डॉ. किरण बेदी यांची अभिनव कार्यपद्धती आणि त्यातून निर्माण झालेली वाद-वादळे यांमुळेच सर्व प्रसारमाध्यमांनी त्यांना सतत केंद्रस्थानी ठेवले. हे त्यांना त्यांच्या कामातील पारदर्शकतेचे मूल्यमापन वाटते, तर इतर काही जणांना मात्र तो प्रसिद्धीच्या हव्यास वाटतो. सामान्य जनतेला मात्र किरण बेदी मसिहा वाटतात. देशात तसेच परदेशातही अनेकांनी त्यांचा आदर्श समोर ठेवला आहे.तथापी नाण्याची दुसरी बाजू म्हणून बघता, एखाद्याला असेही वाटू शकेल की त्यांच्याबद्दल प्रसृत झालेल्या त्यांच्या मूळच्याच आत्मप्रेमी प्रवृत्तीत ही आणखी एक भर आहे. किरण बेदी कोणत्याही पदावर काम करित असोत, कामावर रुजू होण्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्या कारकिर्दीचा आलेख चढताच असतो.काही काळानंतर त्या अशा काही वादळात सापडतात की त्यांचे ते पदच जाते. त्यांना दिल्लीच्या बाहेर पाठवले आले, त्यांनी मिझोराम सोडावे म्हणून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, गोव्यातून फरार म्हणून घोषित करण्यात आले आणि तिहार कारागृहाची सुरक्षिता धोक्यात आणली असा त्यांच्यावल आरोप देखील करण्यात आला. फक्त किरण बेदी आय् डेअर! असं म्हणू शकतात. त्या असं का म्हणू शकतात याचा शोध घेणारे हे पुस्तक.