माझे शेल्फ
अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम
#पुस्तकाचं शीर्षक वाचूनच अस वाटलं की यात काहीतरी वेगळं असेल...म्हनून वाचायला घेतलं ...सुरुवात रावणाच्या युद्धा तील अंताने होते...नंतर फ्लॅशबॅक ने (मराठी शब्द सापडला नाही ) कथा पुढे जाते ...रावण हा राक्षस कुळातील असला तरी महर्षी विश्रवाचा पुत्र आणि मर्षी पुलस्तीचा नातू असल्याने ज्ञानी होता..त्यामुळे युद्धाच्या शेवटी रावण मरणोन्मुख अवस्थेत असताना रामाने लक्ष्मणाला सांगितले की,दशाननाचा शिष्य होऊन त्याच्यापासून ज्ञान प्राप्त करून घे,नाही तर आपला जन्म वाया गेल्या सारखे आहे...त्याच्या बरोबर त्याचे ज्ञान लुप्त झाले तर आपण अपराधी ठरू,त्याचे ज्ञान समग्र मानव जातीला वंदनीय आहे, म्हणून लक्ष्मण रावणाकडे गेला आणि त्याला ज्ञान सांगण्यास सांगितले ,पण रावणाने ज्ञान सांगण्यास नकार दिला,लक्ष्मण परत रामकडे आला तेव्हा रामाने विचारले की,"तू कुठे उभा होतास" लक्ष्मण म्हणाला रावणाच्या चेहर्या जवळ,"नाही ज्ञान घेताना गुरुपदी लिन व्हावे म्हणून तू त्याच्या पायथ्याकडे उभा रहा आणि विनंती कर"त्याप्रमाणे धर्मानुसार लक्ष्मण याने हातात दर्भ घेतला आणि दशननाचा पायथ्याशी उभे राहून ज्ञान देण्याची विनंती केली,तेव्हा रावणाने धर्मनीती,अर्थनीती,आणी राजनीती याबद्दल ज्ञान सांगितले... रावणाची ही दुसरी स्वच्छ बाजू याच पुस्तकात वाचायला मिळाली नाहीतर आपण सीतेला पळविणारा दुष्ट रावणा बद्दल वाचलेले आहे 🌼🌼 #१) #राजनीती हाच मूलभूत सिद्धांत आहे की,जोवर देहात जीव आहे,तोवर शत्रुत्वाचा अंत झाला असे समजणे भोळेपणाचे ठरेल ... कधीही कोणावरही विश्वास ठेवायचा नसतो...हाच राजनीतीचा सर्वात पहिला पाठ आहे...पिता, पुत्र,भ्राता हे एकही नाते विश्वास ठेवण्याजोगे नसते #सुग्रीव हा वालीचा भ्राता होता आणि बिभीषण हा रावणाचा,पण दोघानि भावांना दगा देऊन राज्य सिहासन मिळविले.. राजनीतीमध्ये स्वहिता पलीकडे दुसरे काहीच नसते, आणि त्या हिताच्या रक्षणा साठी जे काही केले जाते तोच धर्म तोच न्याय,तीच नीती ठरते 🏵️🏵️ 2)#अर्थनीती श्रीलंका सोन्याची आहे,जेव्हा की रावण राक्षस होता, अधर्म,अन्याय,अनितीचा अवतार होता...पण राम हा न्यायाने वागणारा होता,मग अयोध्या गरीब कशी काय?समृध्दीला काही कारण लागत नाही...लक्ष्मी अति चंचल असते,ती केव्हा कुठे वास करील आणि केव्हा तिथून निघून जाईल हे कोणीच सांगू शकत नाही, लक्ष्मी चंचलतेचे उदाहरण म्हणजे आपल्या बुद्धी कौशल्यामुळे आणि अविश्रांत परिश्रमामुळे लक्ष्मीची प्राप्ती झाली असे जे मानतात ते निव्वळ बुद्धीहीन,गर्विष्ठ असतात ... उलट आपल्या दुर्भाग्यमुळे लक्ष्मी प्राप्त झाली नाही असे म्हणणारे निषफलता झाकण्याचा दुर्बळ आणि निर्बुद्ध प्रयत्न करतात, कोणीही ,कधीही लक्ष्मीचा स्वामी होवू शकणार नाही...देवाच्या संपत्तीचा कुबेर जसा देवलोकच्या कल्याणासाठी वापर करतो,स्वतः त्या संपत्तीचा उपभोग घेत नाही, तसेच समाजातही समृद्धी जपणार्यांनी तिचा विनियोग "बहुजन हिताय , बहुजन सुखाय "या पद्धतीने केला पाहिजे...रावणाने सांगितलेले हे ज्ञान मात्र आत्ताच्या काळात पुरेपूर लागू होते,लंकेने ही नीती अनुसरली होति म्हणून लंका सोन्याची होती 🌷🌷 #रावणाचे हे ज्ञान लक्ष्मणाच्या कल्पने पलीकडचे अतर्क्य होते, रावण महान योद्धा होता, शिवभक्त होता, लंकेत रोज प्रभातकाली यज्ञवेदीमध्ये मंत्रोच्चारासह आहुती दिली जात असे ३)#तिसरे ज्ञान धर्मनीती -निर्भेळ असा धर्म आजपर्यंत कोणाला उपलब्ध झाला नाही,स्वतःचा प्रत्येक हेतू न्याय्य ठरविण्यासाठी आणि व्यापक जनसवर्धन मिळवण्यासाठी समर्थ माणूस धर्माचा आश्रय घेत असतो,धर्माचा अर्थ केवळ एकच, माझ्या कार्यात ज्यावेळी मला हे साहाय्यभूत ठरेल त्याचे समर्थन शोधून काढणे म्हणजे धर्म। 💐💐 #४)#मनुष्यनीती एक व्यक्ती एकाच माणसाशी एकदा जसा व्यवहार करते,ती दुसऱ्या वेळीही अगदी तसाच व्यवहार करेल असे मानणे व्यर्थ आहे,येथे कोणी कोणाचा स्वजन नाही. खरे तर माणूस स्वतःही स्वतःला ओळखू शकत नाही...आपण सदैव एकाच प्रकारचे वर्तन करू असे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही ही झाली मनुष्यनीती 🌸🌸 #सुमाली हा राक्षस कुळातील होता त्याने विश्वकर्मा कडून सोन्याची लंका तयार करून घेतली ,परंतु देवांना ते आवडले नाही,त्यांनी लंकेवर स्वारी करून ती उध्वस्त केली,सुमाली वनात राहायला लागला,तेव्हा वनात फिरत असताना त्यांना महर्षी विश्रवा यांचा आश्रम दिसला,आपल्या मुली साठी हे योग्य वर आहेत असा त्यांचा मनात विचार आला,त्यांची मुलगी केकसी हिने विश्रवाना विनांती केल्यावरून त्यांनी तिच्याशी विवाह केला...त्यांची पहिली पत्नी देववर्णीचा पुत्र वैश्रव ण होता,आता केकसी पासून त्यांना एक मुलगा झाला...तो जन्मला तेव्हा त्याच्या बारशाच्या दिवशी महाराणी चित्रदेवी भेटायला आली, तिच्या गळ्यात नवरत्नजडीत हार होता तो तीने बाळाच्या गळ्यात घातला,त्याक्षणी त्या रत्नांची प्रभा बाळाच्या मुखावर पडून प्रत्येक रत्नांचे