मुखपृष्ठ
बाजिंद

माझे शेल्फ

बाजिंद

इंग्रजी शीर्षक
Bajind
सारांश

गुप्तहेर संघटना म्हटले तर सर्वात अगोदर आपल्याला मोसाद आठवते .. इस्त्राईल हा छोटासा ज्यू लोकांचा देश पण त्यांच्या गुप्तहेर संघटनेमुळे तो बलाढ्य मानला जातो. याच इस्त्राईलने त्यांची संघटना शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर संघटनेच्या आधारावर मोसाद बळकट केली. बहिर्जी नाईक म्हणजे स्वराज्याचे गुप्तहेर. असामान्य व्यक्तिमत्व, अलौकिक बुद्धिचातुर्य आणि अमर्याद धाडस..शत्रुच्या गोटात जाऊन शत्रुच्याच पोटातुन माहिती काढुन आणणे हे कौशल्य बहिर्जी नाईकांच्य अंगी होते. इस्त्राईल च्या अभ्यासक्रमात भारताचा इतिहास, शिवाजी महाराज शिकवले जातात. इस्त्राईलच्या मोसाद संघटनेचा आत्मा म्हणजे ...बहिर्जी नाईक. बाजिंद ही एक ऐतिहासिक रहस्यकथा आहे. बहिर्जी नाईकांच चातुर्य ,पराक्रम आणि स्वराज्यनिष्ठा यांच अत्यंत साध्या ,सोप्या शब्दात लेखकाने चित्रण केलं आहे. धनगरवाडीचा कारभारी सखाराम आपल्या तीन सहकाऱ्यांसह एक फिर्याद घेऊन शिवाजी महाराजांकडे रायगडावर जायला निघतो. रस्त्यात गुप्तहेर बहिर्जी नाईकांचा चेला असलेल्या खंडोजीशी नाट्यमयरीत्या झालेली त्यांची भेट, या चौघांना रायगडावर प्रवेश मिळवून द्यायचं त्यानं दिलेलं आश्वासन, खंडोजी आणि सावित्रीची प्रेमकथा, शिर्के – बेरड वैर, बहिर्जी नाईकांनी शिर्क्यांवर केलेला हल्ला, तसेच बाजी आणि मुघल सरदार हुसेनखानची कथा, बाजीला अवगत असलेली पशू-पक्ष्यांची भाषा, मृत्युसमयी त्याने आपल्या वंशजाला ‘बाजिंद’ला त्या भाषेचा दिलेला वारसा, . थरारक, धक्कादायक आणि नाट्यमय घटनांनी, वळणांनी ही कादंबरी पुढे सरकत राहते. नाट्यमय वळणं घेत, रहस्यमयतेने शेवटपर्यंत वाचकांची उत्कंठा ताणून धरणारी ही कादंबरी बहिर्जी नाईकांच्या बुद्धिचातुर्याची साक्ष देते आणि शिवरायांचं स्वराज्य हे सुराज्यही होतं, याचंही दर्शन घडवते. युद्धाचा थरार, भावनांची गुंतागुंत आणि प्रखर राष्ट्रप्रेम याचं अद्भुत रसायन म्हणजे ‘बाजिंद’ ही कादंबरी.एकूणच कादंबरी वाचल्यावर वाचक बहिर्जी नाईकांचा जबरा फॅन बनतो . बहिर्जी नाईक यांची कुशाग्र बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टी यांना मनोमन सलाम करतो . एक जबरदस्त आणि तुफान अनुभव हवा असल्यास नक्की वाचावी " बाजिंद

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी
समुदायाने जोडले
बंद