माझे शेल्फ
बारबाला
बारबालेचं आत्मचरित्र- बारच्या झगमगाटीमागील धगधगीत वास्तव ``कुणी स्वखुशीने वेश्याव्यवसाय किंवा बारबाला बनत नाही`` हे आपण नेहमी ऐकतो. मग असं काय घडतं की मुली या अनैतिक व्यवसायाकडे वळतात. या प्रश्नाचे उत्तर खुद्द बारबाला असलेल्या वैशाली हळदणकरच्या आत्मरित्रातील मिळतं आणि बारच्या झगमगाटामागिल विदारक वास्तव उघड होतं. कलावंत वडील, अभिजन वर्गातील आई अशी पार्श्वभूमी असलेली मुलगी का बारबाला बनते, काय आय़ुष्यात घडतं ते पुस्तकात वाचायला मिळतं. अविश्वसनीय वाटावे असे प्रसंग एकामोगामाग एक उलगडत जातात. सिंगर पासून नबारबाला ते फ्री सर्व्हिस असा वैशालीचा प्रवास तिने प्रामाणिकपणे आणि उलगडला आहे. बारबालांवर अनेक सिनेमे, पुस्तकं आहेत. परंतु बारबालेचं आत्मचरित्र दुर्मिळच. बारबालांच जीवन कसं असतं, त्यांना कुठल्या कुठल्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं ते आत्मचरित्रातून कळतं. बारसंस्कृतीची इत्यंभूत माहितीही वाचकांना होते. वैशाली हळदणकराचं आयुष्य शोकांतिकाच. आत्मचरित्रात अनेक गोष्टी दडवलेल्या असतात. परंतु वैशालीने अगदी बेधडक सर्व काही लिहिलंय. पुरूषी मानसिकता, ढोंगी समाज दिसून येतो. अनेकदा अंगावर काटा यावा असे हे प्रसंग वाचायला मिळतात. मुंबईसह परदेशातील डान्सबार मध्ये वैशालीने काम केलं. तिच्या आय़ुष्यात आलेले पुरूष, तिच्यावर झालेले लैंगिक अत्याचार याची तिने कसलीही भीडभाड न बाळगता माहिती दिलेली आहे. वैशालीचं आत्मचरित्र तिचं असलं तरी ते बारबालांच्या जीवनावचा पट प्रातिनिधिक स्वरूपात उलगडतो. बारबालांची संघटना बांधणाऱ्या वर्षा काळे यांनी वैशालीला आत्मचरित्र लिहिण्यास प्रवृत्त केलं आणि एक माहितीपुर्ण दस्तावेज पुस्तकाच्या रुपात वाचकांना उपलब्ध झाला आहे.