मुखपृष्ठ

माझे शेल्फ

बारी

इंग्रजी शीर्षक
Bari
सारांश

बारी- लेखक : रणजित देसाई प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठ संख्या :180 " स्वामी"कार रणजित देसाई यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ही एक अप्रतिम कादंबरी. कोल्हापूर ते बेळगाव दरम्यानचा जगंलातील दाट झाडींनी वेढलेला रस्ता म्हणजेच बार ! दरम्यान सुतगट्टी नावाच गाव. बेरड जमातीची वस्ती असलेले. या जमातीचा नायक देग्या याचा हा जीवन प्रवास. तारुण्यातील चिरतरुण उत्साह, कर्तृत्व ते वृद्धपकाळातील हतबल अवस्थेच सुंदर वर्णन येथे वाचावयास मिळते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंग वाचताना अगदी 60-70 च्या दशकातील मराठी सिनेमातील प्रसंग आठवतात. नायक म्हणून पूर्ण वस्तीची जबाबदारी पेलणं,दिलेल्या शब्द पाळण्यासाठी केलेला त्याग हे वाचताना तत्कालीन ग्रामीण संस्कृती, परंपरा अनुभवायास मिळते. कथा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळातील आहे, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर समाजात प्रगती होण्या ऐवजी झालेली वाताहत, त्याचा समाज व लोकजीवनावर झालेला परिणाम तितकाच अभ्यासपूर्णरित्या वाचकां समोर मांडला आहे. लेखक देसाई यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी वास्तववादी आहे. "बारी" एक अप्रतिम कलाकृती प्रत्येक वाचनप्रेमीने वाचावी अशी !

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
120
भाषा
मराठी
किंमत
120.00
ISBN
9788177664188
समुदायाने जोडले
बंद