मुखपृष्ठ

माझे शेल्फ

बिट्रेयल

इंग्रजी शीर्षक
Betrayal
सारांश

डब्लिनमधील हार्मन सुधारणागृह हा युरोपमधील सर्वात भयानक तुरुंग... डॉ. फ्रँक रयान यांच्याकडं बंदिजनांच्या आरोग्याची जबाबदारी होती. फार जोखमीचे काम होतं. ह्याआधीच्या डॉक्टरचा खून झाला होता. डॉ. रयान याने मात्र ही जबाबदारी आव्हान म्हणून स्वीकारली होती.एका पहाटे रयानला फोन करून तुरुंगात बोलविण्यात येते. सुखशय्येतील प्रेयसीचा निरोप घेऊन डॉ. रयान तडक निघतो, पण तो सापडतो एका सापळ्यात! शुद्धीवर आल्यावर त्याला वाटतं की, तो हॉस्पिस्पटलमध्ये आहे पण काहीतरी चुकतंय. परिचारिका खोलीचे दार कुलूप लावून का बंद करतेय? लिसा का भेटायला येत नाही? रयान तुरुंगात तर नाही?परस्परविरोधी आणि गोंधळात टाकणाऱ्या पुराव्यामुळे डॉ. रयान चक्रावून जातो. त्याचा माग काढताना डॉ. रयान तुरुंगातील संवेदनाशील जे कक्षापर्यंत पोहोचतो. तिथे एका गूढ व्यक्तीचे वास्तव्य आहे....एक थरारक कादंबरी.

सेबेस्टियनच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या प्रसंगापर्यंत हे कथानक येऊन ठेपते आणि ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’चा तेथे समारोप होतो. आधीच्या दोन भागांमध्ये ब्रिटिश परंपरा, नैतिक मूल्यांचे पालन करणारी पात्रे, समाज यांचे चित्रण होते. तर ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’मध्ये गुन्हेगारी, शहकाटशह, आर्थिक लोभ, द्वेष यांचे दर्शन घडते. गाइल्सची घटस्फोटीत पत्नी व्हिक्टोरिया, सेबेस्टियनच्या जीवलग मित्राचा पिता डॉन पेड्रो मार्टिनेझ, शाळेत असतानापासून हॅरीचा द्वेष करणारा मेजर अॅलेक्स फिशर ही पात्रे क्लिफ्टन-बॅरिग्टन कुटुंबासमोर नवीन आव्हाने, अडचणी उभ्या करतात. त्यातून ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’चे कथानक उभारी घेते. खरंतर ही दोन्ही कुटुंब पूर्णत: काल्पनिक आहेत. मात्र आर्चर यांनी अशाप्रकारे त्यातील पात्रे उभी केली आहेत की, हा सारा खराखुरा इतिहास असावा इतपत वाचक भारून जातात. कथाकथनामध्ये आर्चर यांचा हातखंडा आहे आणि ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’मध्ये पानोपानी तो दिसून येतो. एका गोदी कामागाराच्या मुलाच्या आयुष्यापासून सुरू झालेले हे कथानक तस्करीच्या जाळ्यात पसरलेल्या त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत कसे येऊन ठेपते, हे जाणून घ्यायचे असेल तर ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’ वाचायलाच हवे. जेफ्री आर्चर यांच्या मूळ कादंबरीतील सहजसोपी शैली लीना सोहोनी यांच्या अनुवादातूनही जाणवते. इंग्रजी लेखकाने हटकून वापरलेल्या शब्दांचा अचूक अर्थ निवडून त्या प्रसंगात चपखल बसतील अशा शब्दांचा वापर सोहोनी यांनी केला आहे. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर होताना अनेकदा अचूक शब्दांच्या अभावामुळे किंवा अनुवादकाच्या मर्यादांमुळे मूळ कादंबरीचा रसभंग होतो. सुदैवाने ‘बेस्ट केप्ट सीक्रेट’चा अनुवाद वाचताना तो अनुभव येत नाही.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2012
पृष्ठसंख्या
212
भाषा
मराठी
किंमत
220.00
ISBN
9788184983357
समुदायाने जोडले
बंद