मुखपृष्ठ

माझे शेल्फ

ब्लास्फेमी

इंग्रजी शीर्षक
Blasphemy
सारांश

चीड,राग,संताप आणणारी सत्य घटनेवर आधारित कादंबरी...... एखादा मनुष्य(?) किती हैवान होऊ शकतो? सैतान कोणाला म्हणतात? या प्रशांची उत्तरे पाकिस्तानातील एक धर्मगुरू ‘पीरसाई’ याच्याबद्दल वाचल्यावर मिळतात. ही कादंबरी एका हिर नावाच्या सुंदर तरुणीची करुण कहणी आहे. तिच्या स्वप्नांचा चुराडा होऊन तिला किती अनन्वित अत्याचाराला बळी पडावं लागते हे वाचल्यावर मनाचा थरकाप उडतो. धर्माच्या नावाखाली किती निचपणा केला जातो हे या कादंबरीत समजते. पाकिस्तान सारख्या धर्मांध राष्ट्रात धर्मगुरूविरुद्ध एखादं पुस्तक लिहणे व धर्माच्या नावाने कोणते काळे धंदे होतात हे जगापुढे आणण्याचे धाडस तेहमिना दुर्रानी यांनी केले त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे एवढे थोडेच आहे. भारती पांडे यांनी केलेला अतिशय उत्तम असा अनुवाद वाचकास जागच्याजागी खिळवून ठेवतो. पुस्तकाच्या सुरवातीला पुस्तकाबद्दल थोड्यात माहिती आहे ती खालीलप्रमाणे:- ही कादंबरी दक्षिण पाकिस्तानमध्ये घडते. एका सत्य घटनेतून स्फुरलेली ही कादंबरी पराकोटीच्या दुष्टत्वाचे कठोर दर्शन घडवते. रक्तपिपासू धर्मनेत्यांनी भ्रष्ट केलेल्या इस्लामचे स्वरूप कोणतीही लपवाछपवी न करता वाचकांपुढे ठेवण्याचे धाडसाचे काम ही कादंबरी करते. हीर नावाच्या एका सुंदर तरुणीची करुण कहाणी लेखिकेने अत्यंत उत्कटतेने, प्रभावशाली भाषेत सांगितली आहे. वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी या अलौकिक सुंदरीचा विवाह तिच्याहून अठरा वर्षांनी मोठ्या असलेल्या पीरसाई या धर्मगुरुशी होतो. हीरवर अनन्वित अत्याचार करत पीरसाईने हीरला अध:पतनाच्या अंतहीन खाईत नेऊन ठेवले आहे. परंतु ज्या भयंकर दुःस्वप्नामध्ये हीर कैद झालेली आहे, ते दुःस्वप्न तिचे एकटीचे नाही; पीरसाईशी, धर्माशी एकनिष्ठ असणाऱ्या त्या साऱ्या जमातीचेच ते दुर्दैव आहे. पीरच्या हवेलीमध्ये रोज दिवस-रात्र वर्णन करता येणार नाहीत, अशी भयंकर क्रूर कृत्ये केली जातात - हे सारे अल्लाच्या नावाने केले जाते. तिच्या धन्याने निर्माण केलेल्या या रौरवामध्ये ओढली गेल्यावर हीरची आत्मप्रतिष्ठा, तिचे स्वातंत्र्य तर नष्ट होतेच, परंतु तिच्यामधील उपजत माणुसकीही संपून जाते....अखेर एका भयंकर निर्णयाने हीरला आपले अस्तित्व गवसते. एक संतप्त आणि धाडसी कादंबरी. या कादंबरीने उपखंडातील आघाडीच्या साहित्यिकांमध्ये तेहमिना दुर्रानी यांची प्रस्थापना केली आहे. या कादंबरीचे मुखपृष्ठ तेहमिना दुर्रानी यांचेच आहे. ‘अ मिरर टू द ब्लाईंड’ हे अब्दुल सत्तार एढी यांचे चरित्र हे दुर्रानी यांचे दुसरे पुस्तक. ‘ब्लास्फेमी’ ही त्यांची पहिली कादंबरी. तेहमिना दुर्रानी पाकिस्तानामध्ये लाहोर येथे राहतात.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
252
भाषा
मराठी
किंमत
260.00
ISBN
9788177665017
समुदायाने जोडले
बंद