माझे शेल्फ
ब्लॅक लिस्ट
इंग्रजी शीर्षक
Black List
सारांश
वास्तव कल्पनेला भिडणारी कादंबरी... गुप्तहेरांच्या जगात संवेदनशीलतेने हाताळणाऱ्या कामगिऱ्यांना ब्लॅक ऑपरेशन्स म्हणतात. यावर आधारित लेखन करणारे अमेरिकन रहस्यमय कादंबरीकार ब्रॅड थॉर यांची ‘ब्लॅक लिस्ट’ ही आणखी एक दहशतवादावरील चित्तथरारक कादंबरी. हेरगिर, विश्वासघात आणि कटकारस्थाने यांच्या काळ्याकुट्ट पटावर अमेरिकेत या कादंबरीची कथा घडते. अमेरिकन सरकार गुप्तपणे एक यादी बनवत असते. त्या यादीत एखाद्याचे नाव आले, की ते कधीच काढले जात नाही, अगदी त्याचा मृत्यू झाला तरी, त्या यादीत दहशतवाद्यांविरुद्ध लढणाऱ्या एजन्ट स्कॉट हॉर्वाथ याचेच नाव घातले जाते आणि एक धावत्या घटनांचा सिलसिला सुरू होतो. अन मग त्यात गुंफलेल्या वेगवान घटना आणि साहसे यांचे अनोखे मिश्रण वाचताना अखेरच्या पानापर्यंत कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते.
पुस्तकाची माहिती
भाषा
मराठी