मुखपृष्ठ
बंजाऱ्याचे घर

माझे शेल्फ

बंजाऱ्याचे घर

इंग्रजी शीर्षक
Banjaryache Ghar
सारांश

यशोधरा भोसले यांचा ‘बंजाऱ्याचे घर’ हा ललित लेखसंग्रह विविध गुणांनी संपन्न आहे. प्रसिद्ध लेखिका माधवी देसाई यांच्या या कन्या. या संग्रहातील पाचही लेख यशोधरा भोसले यांचे वास्तव्य झालेल्या घरासंबंधीच्या आहेत. या लेखामध्ये स्मरणरंजन आहे. आत्मकथन आहे. त्यतून प्रकट होणारी मानसिकता खूप काही सोसून पचवलेल्या प्रगल्भ परिपक्वतेची आहे. घराशी निगडित असलेल्या त्या-त्या वेळच्या भाविश्वात घेऊन जाणारे हे लेख आहेत. आयुष्याच एकेका ठप्प्याशी रेंगाळणारे आहेत. त्या-त्या टप्प्यांवरील व्यक्तींवर लक्ष केंद्रित करणारे आहेत. लेखिकेचे हे पहिलेच पुस्तक असूनही लेखन, वर्णन, शैलीतील सहजता व सफाई लुब्ध करणारी आहे. एका स्त्रीमधून वेगळी दृष्टी या लेखांना लाभली आहे. अनेक रंग या घरांना आणि घरातल्या माणसांना लाभलेले आहेत. कलावंतांचे मन आणि नजर या लेखातील अगणित तपशीलातून दिसते. घराभोवतालच्या निसर्गाची चैतन्यशील रूपे नजरेसमोर येतात, तशीच एखाद्या चित्रकृतीची सौंदर्यस्थळेही सहजपणे शब्दरूप धारण करतात, ‘बंजाऱ्याचे घर’ मधील शेवटचे घर वगळता बाकीच्या सर्व घरांशी लेखिकेचा वैयक्तिक संबंध आल्यामुळे त्यातील तपशीलांना व्यापक संदर्भ लाभलेला आहे. चित्रतपस्वी, भालजी पेंढारकर (आजोबा), लीलाबाई पेंढारकर (आजी), माधवी देसाई-काटकर (आई), काटकर (वडील), मीरा तारळेकर (बहीण), रणजित देसाई (पितृतुल्य दादा), प्रभाकर पेंढारकर (मामा) आणि जाई (कन्या) या कुटुंबीयांसमवेत इतरही व्यक्तींचे उल्लेख येतात. पहिले घर आहे ते गावाकडचे पिढ्यान् पिढ्या पासूनचे शंभर वर्षंचे या घरात पूर्वजांच्या पिढ्या वर्षानुवर्षे वाढल्या. लेखिकेचे या घरात पाय ठेवताच सगळे ताण कमी होऊन जातात. चिडचिड् कमी होते. दुसरे घर भेटते ते माहेरचे गोव्यातले बांदोड्याचे. काटकरांशी लग्न करून गोव्यात आल्यावर येथील सुखासीन जीवनाला उबगलेल्या माधवीताई मुंबईसारख्या शहरात नशीब अजमावायला पतीसह गाव सोडतात. कल्याणजवळच्या मोहोन्याच्या कंपनीच्या क्वार्टरमध्ये चार खोल्यांत हौसेने घर सजवतात. परंतु काटकरांच्या मृत्यूनंतर आणि रणजित देसार्इंच्या कोवाडच्या घरातून बाहेर पडल्यावर, बेळगावमधल्या अल्प वास्तव्यानंतर आपल्या मूळ सासरच्या घरी गोमंतकात येण्याचा निर्णय माधवी घेतात आणि वर्षानुवर्षे बंद असलेल्या बांदोड्यातल्या देवळाच्या परिसरातल्या या घराला घरपण येते. तिसरे घर आहे ते कोवाडमधले रणजित देसाई यांचा खानदानी वाडा. काटकरांच्यानंतर रणजित देसाई लेखिकेचे वडील, गुरू, मित्र आणि मार्गदर्शकही बनतात. त्यांच्या बद्दलचे मनोभाव येथे संयतपणे प्रकट झाले आहेत. चौथे घर आहे ते चित्रकार रमेशच्या स्टुडिओमधले.’ ‘१२ ए-रेशम’ हा टेन परसेंट कोट्यातील फ्लॅट लेखिकेला मिळालेला असतो. या फ्लॅटमध्ये राहताना त्या घराचे आणि आपले सूर चांगले जुळून आल्याचे समाधान त्यांच्या लेखामधून व्यक्त होते. अशाप्रकारे एक प्रदीर्घ प्रवास या घरांद्वारे लेखिकेप्रमाणेच वाचकांनाही घडतो.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2015
पृष्ठसंख्या
192
भाषा
मराठी
किंमत
190.00
ISBN
9788177663235
समुदायाने जोडले
बंद