माझे शेल्फ
भल्या दिलाचा माणूस
पाहुण्या माणसाची गोष्ट... ‘भल्या दिलाचा माणूस’ या पुस्तकचे लेखक आहेत जॅक शॅफिर. एका लहान मुलाच्या घरी एक जण पाहुणा म्हणून येतो. त्याच्या घरावर आलेल्या संकटांचा यशस्वी सामना करतो व कालांतराने त्या लहान मुलाच्या व ते लहान मूल त्याच्या भावविश्वाचा एक ाग होऊन जातात. प्रभावी कथा, वेगवान घटनांची मालिका तसेच जुन्या अमेरिकेच्या ग्रामीण भागातील वातावरण या सगळ्यामुळे ही कादंबरी रम्य झाली आहे.
सातेक वर्षांच्या बिट्टूच्या घरी एक दिवस अनोळखी पाहुणा अवतरतो. भारदस्त शरीरयष्टी आणि डोक्यावर रूबाबदार हॅट असणारा घोडेस्वार (शेन) बिट्टूच्या घरच्या पाहुणचाराने जणू कुटुंबाचा सदस्यच होऊन जातो. पण तरीही त्याच्याभोवतीचं गूढ वलय तसंच असतं. हा पाहुणा त्या घरच्या सुखदु:खांसोबत तिथली संकटंही स्वत:च्या खांद्यावर पेलतो. बिट्टूच्या कुटुंबाच्या जमिनीवर डोळा ठेवणाऱ्या जमीनदाराची त्या कुटुंबप्रमुखावर मारेकरी घालण्याची योजना तो हाणून पाडतो आणि त्या जमीनदारालाही संपवतो. बिट्टूसोबत तर त्याचं खास जिवाभावाचं नातं जडतं. अभिजात अमेरिकन साहित्यातील सर्वांत रोमॅन्टिक हिरो ठरलेला हा शेन आणि बिट्टूच्या कुटुंबाच्या नितळ स्नेहाची ही हृद्य कहाणी... मनाला भिडणारी.