माझे शेल्फ

चौघीजणी

इंग्रजी शीर्षक
Chaughijani
सारांश

लुईसा मे अल्कॉट" या अमेरिकन लेखिकेचे "लिटल वुईमन" या पुस्तकाचा "शांता शेळके "यांनी केलेला अनुवाद म्हणजे "चौघीजणी".लुइसा अल्कॉट या अमेरिकेन लेखिका.१८६८ साली त्यांनी ही कादंबरी लिहीली.तिला अफाट लोकप्रियता लाभली. जगातील बहुतांश भाषांमध्ये ती अनुवादितझाली. हॉलिवूडमध्ये तिच्यावर दोन चित्रपटही निघाले. खरंतर अनुवादित पुस्तके.. त्यातही इंग्लिश पुस्तकांचे अनुवाद मी वाचलेच नाही कधी. त्या वातावरणाशी आपण एकरुप होऊ शकु की नाही ही एक शंका असायची मनात. जॉन म्हणाला.. मेरी म्हणाली.. अश्या वाक्यांमधुन पुढे पुढे जाणारे लिखाण वाचायला नको वाटायचे. चौघीजणी बद्दल खुप ऐकलं होतं.वाचायला तर घेतली. एवढी जाडजूड सहाशे पानांची कादंबरी आपण वाचु शकु का..मुख्य म्हणजे त्याच्याशी एकरुप होऊ शकु का ही शंका होती. सुरुवातीला दहा वीस पानं जरा अडखळलो..पात्रांची नावे..त्यांचे एकमेकांशी असलेले नाते..अमेरिकन वातावरण हे जसंजसं परीचीत होत गेलं..तसं तसं त्यात गुंतत गेलो. दिडशे वर्षापूर्वीचे कथानक. मार्च कुटुंब.. आई,वडील, आणि चौघी बहिणी. मेग..बेथ..ज्यो..आणि एमी.चौघीजणी वेगवेगळ्या स्वभावाच्या.. तसं म्हटलं तर हे एक गरीब कुटुंब.पुस्तक वाचत जातो..तसं आपण त्यांच्या घरामधले एक होऊन जातो.त्यांचे स्वभाव.. आशाआकांक्षा.. त्यांची स्वप्नं..आणि समस्याही ह्या आपल्या होऊन जातात. उत्तम व्यक्ती चित्रण..वेधक संवाद.. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कौटुंबिक भावबंध.. त्यातली उत्कटता कमालीच्या सुंदरपणे रेखाटली आहे. बहिणी बहिण मधील प्रेम..शेजारच्या लॉरीशी जमलेला स्नेह..मेगचं लग्न.. तिचे..वैवाहिक जीवन.. संसार असे कितीतरी ह्र्दय स्पर्शी प्रसंग जागोजागी रेखाटले आहेत. खरंतर कळत नकळत आदर्श नीतीमुल्यांचे संस्कार. वाचकांवर घडवले जातात. हे पुस्तक कुठेही कंटाळवाणे होत नाही. तत्कालीन अमेरिकन जीवन.. तेथील रुढी, परंपरा, जीवनशैली आपल्याला समजत जाते. कादंबरीच्या उत्तरार्धात एमी युरोपला जाते. मग आपल्या समोर अजुन एक नवीन जग उलगडत जातं.फ्रान्स..इटली, जर्मनी.. स्वित्झर्लंड येथील त्या काळातील वातावरणाशी आपण समरस होऊन जातो.तेथील शहरी जीवन..आणि सुंदर, स्वच्छ निसर्ग आपण अनुभवतो.एमी आणि लॉरी यांच्यातले भावबंध.. त्यांचं एकत्र येणं..अमीर,उमराव घराण्यातील पार्ट्या.. त्यांची वेशभुषा.. चालीरिती सगळं सगळं आपल्या डोळ्यासमोर उभं रहातं. लिटल् वुईमेन ही लुउसा अल्कॉट यांची मुळ कादंबरी.१८४३ साली जन्म झालेल्या लेखिकेने खरंतर यातील व्यक्ती रेखा आपल्या स्वतःच्या कुटुंबावरुनच रेखाटल्या आहेत. यातील ज्यो हे लेखिकेचेच प्रतिरूप आहे. असं म्हणतात की मुळ पुस्तकापेक्षा त्याचा अनुवाद जास्त सुंदर आहे. आणि अर्थातच त्याचे श्रेय शांता शेळके यांचे. शांता शेळके यांनी या पुस्तकात काय आहे हे एका ओळीत सांगितले आहे. मुग्ध शैशवातील कोवळी सुखदुःखे खरंच.. चौघी बहीणींचे हे कोवळ्या शैशवातील जीवन साध्या सच्चेपणामुळे आपल्याला अखेरपर्यंत गुंतवून ठेवते.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी