माझे शेल्फ

चेहऱ्यामागची रेश्मा

इंग्रजी शीर्षक
Cheharyamagchi Reshma
सारांश

चेह-यामागची रेश्मा ---रेश्मा कुरेशी सहलेखक ःः तानिया सिंग अनुवाद ःः निर्मिती कोलते काही पुस्तकं का वाचली जावीत याची कारणं बरीच असतात,पण हे पुस्तक मी प्रत्यक्ष खरेदी करुन विचायचं एकमेव कारण आहे की याचा अनुवाद करणाी माझी मैत्रीण आहे !! अॕसिड हल्ल्यातून सावरुन जगाला प्रेरणा देणा-या सामान्य मुलीची असामान्य गोष्ट हे पुस्तक पाच दिवसात मी वाचून संपवलं. (इथे आपण खाऊन म्हणूयात) त्याला कारण फक्त हेच की याचा अनुवाद -- निर्मितीने केलाय. हे तिचं पहिलंच अनुवादाचं काम आहे. मुखपृष्ठावरच रेश्माचा चेहरा आहे, तो बघूनच आधी चर्र होतं. हि काय कहाणी असेल या कुतूहलानं, बघता-बघता दोन ते अडिच तासात मी पहिली सात प्रकरणं वाचून काढली होती. या पुस्तकाची मांडणी इतकी सुरेख आहे की टप्प्या--टप्प्याने तिच्या गोष्टी चित्ररुपाने समोर तरळतात आणि रेश्मा आपल्या समोर उलागडत जाते. तिचे इंग्रजी पुस्तक मी वाचलेले नाही पण हा मराठी अनुवाद आपण वाचतोय असे कुठेही वेगळे जाणवले नाही, हे निर्मितीचे पहिले यश आहे असे मी म्हणेन.!! पुस्तकातील प्रकरणे आधी उत्तम क्रमाने मांडली गेली आहेतच पण त्याचा अनुवाद करताना कुठेही ते कंटाळवाणे होत नाही, त्यातील काही ठिकाणी तिच्या आयुष्यातल्या घटनांशी रेश्माची असलेली भावनिक गुंतवणूक दाखवताना खूप समर्पक मराठीचा वापर अनुवादकाने केला आहे. रेश्माचा स्वभाव नेहमीच अन्याया विरूद्ध आवाज उठवण्याचा असल्याने असेल अथवा हे सगळं घडलं तेव्हा ती फक्त सतरा वर्षांची होती त्यामुळे तो वयाचा परिणाम दिसून येतो. काही प्रसंगातील तिची बंडखोरी चपखल मांडली गेली आहे. आपण या अॕसिड हल्याच्या बातम्या फक्त वाचतो आणि हळहळतो. आपल्यात एक म्हण आहे त्याप्रमाणे ज्याचं जळतं, त्याला कळतं तसंच हा प्रसंग ओढावल्यावर रेश्माच्या कुटुंबातील सर्वांनी जे काही सहन केलंय याची आपण कल्पनाच केलेली बरी !! तिला हाॕस्पिटलमधे मिळालेली वागणूक, पोलिसांचा कारभार, बर्न वाॕर्डमधे गेल्यावर तिला वाटलेली भीती, नातेवाईकांनी तिच्याबद्दल घेलतलेला संशय या अन् अशा अनेक प्रसंगातून स्वतःला सावरत राहणं किती कठीण झालं असेल याचा वाचताना अंदाज येतो. आपल्याकडे लोकं बघू ही शकत नाहीत इतका विद्रुप चेहराघेऊन वावरणारी रेश्मा जेव्हा नैराश्यानं ग्रासली जाते तेव्हा, तिच्या मनस्थितीची जाणीव आणि त्यानंतरची तिची भरारी हा प्रवास खूप सहजतेने मांडला गेला आहे. अनुवाद करताना नक्कीच एक उंची यातील ओघवत्या भाषेने गाठलेली आहे. ती आपल्याला वाचताना जाणवते. रेश्माला मिळालेला मित्र परिवार आणि संवेदनशील कुटुंब यांना हॕट्सआॕफ!! पुस्तकात शेवटी अमेरिकेत जाऊन आल्यावर इतर तिचे काम सांगितले आहे पण, सद्य परिस्थितीत ती काय करते?त्यांनी इतरांना मदत करण्यासाठी जमवलेल्या निधीचे काय केले गेले? तिच्यावर हल्ला केलेल्यांना शिक्षा झाली की नाहिच ?? हे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात.शिवाय आजवर इतकी प्रसिद्धी मिळालेली असताना शेवटी काही निवडक अभिप्राय दिले गेलेत ते अजूनही देता आले असते असं वाटून गेलं. हि एक सत्यघटना आहे, अशा अनेक रेश्मा आपल्या आजूबाजूला असतील त्यांना आपण एक माणूस म्हणून मान्य करु शाकतो का? त्यांचे प्रश्न सोडवता नाही आले तरी, त्यांना काही छोट्या गोष्टीतून मिळणारा आनंद तरी देऊ शाकतो का? त्यांची सत्य कहाणी काय आहे हे जाणून घेऊ इच्छितो का? हे असे अनेक प्रश्न माणूस म्हणवून घेताना मनात येत राहिले आहेत. पण एक मेंदूला झिणझिण्या आणणारे हे वास्तव वाचून असे इतरही मोठे --मोठे अनुवाद आपल्या भाषेत निर्मितीकडून वाचायला मिळोत, अशी आशा व्यक्त करुन..पुढच्या लेखनासाठी मनापासून शुभेच्छा देऊन थांबते!! --------- चिन्मयी चिटणीस १७/१२/२०१९.

दुर्लक्षिले जेव्हा आम्ही साहित्यिकांना या अशा मैफलीही जागजागी रंगल्या जेव्हा अशा जेव्हा कुठे कीर्ती प्रियाही हासूनी आली पुढे नुसतीच ना आली तशी गालही केला पुढे.`` असा भाऊसाहेबांचा अनुभव. वपुंना ते समानधर्मी वाटावेत यात नवल काय? चिअर्स मधील सर्वात वाचनीय लेख कुठला असा प्रश्न पडला तर त्याचे उत्तर मिळेल– निगुडकर. तुम्हाला प्रश्न पडेल हे काय प्रकरण आहे? हे नाव तर काही आमच्या परिचयाचे नाही. मग या व्यक्तीवरचा लेख सर्वात वाचनीय असे का म्हणताय?... निगुडकर म्हणजे वपुंच्या सौभाग्यवती. आता कोणीही पुरुष आपल्या बायकोवर लिहितो तेव्हा तो मजकूर वाचनीय असणारच! तर वपु कधीकाळी म्हणे घरोघर जाऊन साड्या विकण्याचा व्यवसाय करीत होते. त्यात या निगुडकर ची गाठ पडली. ती म्हणे रोज एक साडी ठेवून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी हिचा रंग पसंत नाही, म्हणून दुसरी साडी बदलून घ्यायची. असा हा सिलसिला दीर्घकाळ चालू राहिला. वपुंनाही तिच्या घरी राजरोस रोजरोज जायला निमित्त मिळत राहिले. तिचे भाऊ डोळ्यांत तेल घालून पहारा करीत असतानाही वपुंनी हा किल्ला सर केला. ``निगुडकर वस्तादच. लग्न होईतो निगुडकरांच्या नावानं एकाही साडीसाठी आम्हाला पावती फाडता आली नाही``, वपु कबुली देतात. निगुडकर म्हणे, ``मी यांच्या केसावर भाळले.`` वपु म्हणत, ``मी हिच्या गाण्यावर भाळलो.`` कालांतराने वपुंचे केस गेले; निगुडकरचे गाणेही गेले. अशा खूप गमती-जमती या लेखात आहेत. वपु स्वतःच्या फिरक्या घेत त्या सर्व सांगतात. वपुंना-निगुडकरला सून येते; नातवंडांची चाहूल लागते. सव्वीस वर्षांच्या सहवासाने एकमेकांचे स्वभाव सही न् सही समजले आहेत. असे कोणालाही वाटते. पण निगुडकर बोलून जाते, ``तुमच्या काळ्यांच्या घरात टिकणं ही एक अवघड गोष्ट आहे.`` सव्वीस वर्षे काळ्यांच्या या घरात राहूनही तुमचं काळ्यांचं घर ही भाषा उरतेच. चिअर्सची झिंग थोडीफार उतरायलाही अशी काही निरीक्षणे उपयोगी ठरतात.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी