माझे शेल्फ

छत्रपती संभाजी : एक चिकित्सा

इंग्रजी शीर्षक
Chatrapati Sambhaji : Ek Chikitsa
सारांश

छत्रपती संभाजी महाराज एक चिकित्सा " आत्तापर्यंत तुम्ही छावा किंवा संभाजी कांदबरी वाचली असेल परंतु अस्सल कागदपत्रे आणि पुरावे यांनी संभाजी महाराजांचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल नक्कीच हे छोटेखानी पुस्तक तुम्हाला उपयोगी पडेल. खालील काही बाबींवर त्या प्रकाश टाकण्यात आला आहे. १) संभाजी महाराजांच्या आयुष्यातील गोदावरी, थोरतांची कमळा वगैरे पात्र पूर्णपणे काल्पनिक आहेत. २) चिटनीसी बखर ही मल्हार रामराव चिटणीसाने त्याच्या पूर्वजांना हत्तीच्या पायी दिल्याच्या रागातून फक्त संभाजी महाजांची बदनामी करायला लिहिली. ३) संभाजी महाराजांसमोर राज्य विभाजनाचा प्रस्ताव जेव्हा थोरल्या महाराजांनी ठेवला तेव्हा त्यांनी तो फेटाळून लावत आम्ही आपल्या पायाशी दूध भात खाऊन राहू असे सांगितले ४) संभाजी महाराज त्यांना डावललं जात असल्याचा भावनेतून दिलेरखनास जाऊन मिळाले ही त्यांची एकमेव चूक ५) छत्रपती झाल्यानंतर औरंगजेबाशी ९ वर्ष प्रखर संघर्ष एकाच वेळी पाच शाह्यांवर वर्चस्व ६) पित्यासारखे संपूर्ण निर्व्यसनी ७) शिर्क्यांसारखे आपलेच माणसं फितूर झाल्याने घात. ८)पकडले गेल्यावरही बाणेदारपणे औरंगजेबाला सामोरे गेले. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पुस्तकातून मिळतील.रूढार्थाने हे पुस्तक संभाजी महाराजांचे चरित्र नाही. ही संभाजी चरित्राची कागदपत्रांच्या आधारे केलेली चिकित्सा आहे. म्हणूनच संभाजी महाराजांची निर्माण झालेली (की केलेली?) विकृत प्रतिमा‚ तिची कारणमीमांसा‚ युवराज संभाजीराजांची जडणघडण‚ त्यांचा पित्याशी झालेला संघर्ष‚ त्यांच्यावरील दुर्वर्तनाचे आरोप व त्याची शहानिशा‚ रायगडावरील सोयराबाई व प्रधानांची कटकारस्थाने‚ त्यांना झालेल्या शिक्षा आणि शेवटी संभाजी महाराजांची कैद व हत्या अशा संभाजी चरित्रातील अनेक वादग्रस्त विषयांची चर्चा येथे अधिक खोलात जाऊन केली आहे.

पुस्तकाची माहिती

भाषा
मराठी